मोदींएवढा घाबरून गेलेला पंतप्रधान आम्ही पाहिला नाही : महाराष्ट्राच्या ‘ ह्या ‘ माजी केंद्रीय गृहमंत्र्यांचे वक्तव्य

By | May 17, 2018

modi accused for yavatmal suicide case

कर्नाटकामध्ये राज्यपालांनी भारतीय घटनेप्रमाणे कार्यवाही केली. सर्वांत मोठा पक्ष म्हणून भाजपाला सरकार स्थापनेसाठी पाचारण केले यात काही चूक वाटत नाही. मात्र, भाजपा बहुमत सिद्ध करू शकणार नाही. तिथे कॉँग्रेस व जेडीयूचेच सरकार स्थापन होईल. राज्यपालांनी भाजपाला सत्तास्थापनेसाठी पाचारण केले यात काही चूक वाटत नाही. मात्र, हेड काऊंटप्रमाणे काँग्रेस व जेडीयूला प्रथम संधी द्यायला हवी होती, असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शिरूर इथे बोलताना मांडले आहे.

गोवा, मणिपूर व मेघालय या राज्यांत काँग्रेसच्या सर्वाधिक जागा असताना तिथे भाजपाने तेथील पक्षाला हाताशी धरून सत्ता स्थापन केली. तो नियम कर्नाटकामध्ये का लागू झाला नाही? असे विचारले असता शिंदे म्हणाले, की ही राज्ये छोटी आहेत. तिथे भाजपाची चालबाजी लक्षात आली नाही. आता मात्र आम्ही अ‍ॅलर्ट आहोत. जेडीयूशी निवडणूकपूर्व आघाडी का नाही केली, असे विचारले असता ते म्हणाले, की आघाडीचा प्रयत्न झाला; मात्र होऊ शकली नाही. पण, देवेगौडा यांचा पक्ष सेक्युलर असल्याने ते भाजपाबरोबर जाणार नाहीत, याची आम्हाला खात्री होती. शिंदे म्हणाले, की पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून जे-जे पंतप्रधान झाले (मोरारजी देसाई, अटलबिहारी वाजपेयी, इंद्रकुमार गुजराल, मनमोहनसिंग) त्यांपैकी कोणत्याही पंतप्रधानाने राज्यांच्या निवडणुकीत दोनपेक्षा जास्त सभा घेतल्या नाहीत.

  • मोदी घाबरट पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र कर्नाटकात २३ सभा घेतल्या. एवढा घाबरून गेलेला पंतप्रधान आम्ही कधी पाहिला नाही,असा टोला देखील सुशीलकुमार शिंदे यांनी मोदी यांना मारला .कर्नाटकामधील निकालाचा महाराष्ट्रात होणाऱ्या निवडणुकीवर काही परिणाम होईल का? असे विचारले असता शिंदे म्हणाले, की महाराष्ट्राच्या जनतेला मोदींचा चलाखपणा माहीत झाला आहे. महागाई, नोटाबंदी तसेच जीएसटीमुळे जनता त्रस्त झाली आहे. देशात सामाजिक समतेच्या विरोधात वातावरण आहे.

  • एका शिराच्या बदल्यात ११ शिरे आणण्याची भाषा करणाऱ्यांचे काय झाले ?

भारताच्या सीमेचे रक्षण करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. मी गृहमंत्री असताना सीमेवर जवान शहीद झाल्यावर मला विरोधक प्रश्न विचारायचे. आता ते सत्तेत आहेत. त्यांच्या काळात चौपट सैनिक मारले जात आहेत. एका शिराच्या बदल्यात ११ शिरे आणण्याची भाषा करणाऱ्यांना कुठे गेले ती ११ शिरे, असा प्रश्न उपस्थित करून कर्नाटकामधील निवडणुकीत भाजपाच्या विरोधात वातावरण होते, तरीही निकाल असा कसा लागला? याबाबत आश्चर्य व्यक्त करताना ईव्हीएमबाबत राज ठाकरे यांनी व्यक्त केलेल्या मताशी मी सहमत आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

कर्नाटक सत्तास्थापनेत नवीन ट्विस्ट..हा ‘ राम ‘ देऊ शकतो काँग्रेसला सत्तेची चावी : उद्याची मोठी बातमी

राज्यपालांचा ‘ असा ‘ राजधर्म, येडियुरप्पा यांचा उद्या शपथविधी मात्र ? : कर्नाटक विधानसभा निवडणूक

तसं नाही तर ‘ असं ‘ ..सत्तेसाठी हपापलेल्या भाजपचा मास्टरप्लॅन : कर्नाटक विधानसभा निवडणूक

कर्नाटकच्या निकालावर राज ठाकरे काय म्हणाले ? : भाजपच घोड अडलय ‘ इतक्या ‘ सीटवर

भाजपाकडून एकही मुस्लिम उमेदवार नसताना मुस्लिम समाजाचे मतदान कोणाला ? : कर्नाटक विधानसभा निवडणूक

कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता स्थापनेकडे वाटचाल : काय आहे सध्याची ताजी परिस्थिती ?

मोदी यांच्या फेकूपणाचे नाव काय ? : दैनिक लोकमतमधून मोदी यांचे अज्ञान केले उघडे

कर्नाटकमध्ये भाजपला मिळतील ‘ इतक्या ‘ जागा : अमित शाह यांचा विश्वास

काँग्रेसच्या इंदिरा कॅन्टीनमध्ये ताव मारुन भाजपा कार्यकर्त्यांचा प्रचार : ६० वर्षे काय केले ?

लोकनिती-सीएसडीएस एबीपी न्यूजच्या एक्सिट पोलनुसार ‘ हा ‘ पक्ष सत्तेचा दावेदार ? : कर्नाटक विधानसभा निवडणूक

भाजपचा चोरटा नगरसेवक सीसीटीव्ही मध्ये झाला कैद : कुठे घडली ही घटना ?

बळीराजाच्या डोक्यावर पाय ठेवण्याची परंपरा भाजपने राखली : लाज वाटावी ‘ असे ‘ उचलले पाऊल ?

काँग्रेसने कुत्र्यांकडून देशभक्ती शिकावी , पंतप्रधान मोदी यांची भाषा घसरली

आणि भाजपाने शहीद म्हणून गौरवलेला ‘ तो ‘कार्यकर्ता चक्क जिवंत : काय आहे बातमी ?

स्टार प्रचारक आणि संस्कारी शोकांतिका : मुकेश माचकर यांचा अप्रतिम लेख

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा