फेअरनेस क्रिमच्या १५ कोटीच्या जाहिरातीची ऑफर ‘ह्या ‘ चांगल्या कारणावरून धुडकावली

By | January 13, 2018

sushant singh rajput rejects fairness cream advertisement of 15 crore

फेअरनेस क्रिमच्या रोज आपण इतक्या जाहिराती पाहतो कि कोणत्या कंपनीची क्रीम घेऊ गोंधळून जातो. अर्थात अमुक कंपनीची क्रीम लावली म्हणून गोरे झाल्याचे जाहिरातीत देखील दाखवले जाते मात्र हे १०० टक्के खरे असल्याचे आजवर सिद्ध झालेले नाही. मोठ्या मोठ्या सेलेब्रिटी या जाहिराती करतात म्हणून लोक देखील आंधळे पणाने हे गृहीत धरून चालतात .यासाठी सेलिब्रिटींना मोठ्या प्रमाणात मानधन दिले जाते, मात्र एका सेलेब्रिटीने फेअरनेस क्रीम ची जाहिरात करणार नाही म्हणून चक्क १५ कोटीची ऑफर धुडकावून लावली आहे . ह्या सेलिब्रिटींचे नाव आहे सुशांत सिंग राजपूत म्हणजे धोनीचे काम केलेला अभिनेता.

या आधी सुशांतने फेअरनेस क्रिमची जाहिरात केली आहे. त्याचा हा करार संपण्याच्या जवळ आलेला आहे म्हणून आणखी एका फेअरनेस क्रिम कंपनीने त्याला ऑफर देऊ केली होती, पण सुशांतने आपला विचार बदलला अन् तब्बल १५ कोटींच्या जाहिरातीच्या पैशावर पाणी सॊडले . अर्थात यासाठी सुशांतने जे कारण दिले आहे ते देखील तसेच आहे .

  • संबधित बातम्या

विनोदी_लेख : तैमूरला राष्ट्रीय बाळ घोषित केले तर राजकारणी काय प्रतिक्रिया देतील ?

बसल्या जागी मोबाईलला आधार कार्ड करा लिंक : ‘ ह्या ‘ सोप्या पद्धतीने

सुशांतच्या म्हणण्यानुसार फेअरनेस क्रीमच्या जाहिरातीमधून गोरे होण्याबद्दल संदेश दिला जातो. हा देखील एक प्रकारचा वर्णभेद आहे. गोरा रंग किंवा एखाद्याचा वर्ण काळा अशी तुलनाच होणं चुकीचं आहे, यामुळं वर्णभेद वाढतो व समाजात चूकीचा समज पसरवला जातो. एक अभिनेता म्हणून अशा जाहिराती न करणं माझं कर्तव्य असल्याचही सुशांत पुढे म्हणतो.

याआधी देखील अभय देओल याने देखील फेअरनेस क्रिमच्या जाहिरातीस नकार दिला होता .आवडत्या सेलिब्रिटीला लोक आपल्या प्रेरणास्थानही मानण्यास कमी करत नाहीत. त्यामुळे कलाकारांच्या प्रत्येक कृतीचा परिणाम समाजावरही दिसून येतो. त्यातीलच एक भाग म्हणजे सेलिब्रिटी करत असलेल्या जाहिराती. सेलिब्रिटी एखाद्या उत्पादनाची जाहिरात करत असेल तर ते उत्पादन चांगलेच असणार असे समजून सामान्य लोक ते उत्पादन विकतही घेतात. शाहरुख खान, सोनम कपूर, हृतिक रोशन, सुशांत सिंह राजपूत आणि अन्य काही कलाकारांनी आजवर फेअरनेस क्रीमच्या जाहिराती केल्या आहेत. पण अशा जाहिराती करून आपण समाजाची दिशाभूल करतोय किंवा वर्णभेदाला प्रोत्साहन देतोय याची जाणीव कदाचित अभिनेता सुशांत सिंह राजपूतला झाली आहे असे समजायला हरकत नाही .

  • संबधित बातम्या

लेख नक्की वाचा : जिग्नेश मेवाणी उमर खालेद आताच डोके का वर काढताहेत ?

लेख नक्की वाचा : निखिल वागळे यांच्या मुलाखतीमधून कसा खोटारडेपणा आणि लपवाछपवी

प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत लपवलेली ‘ ही ‘ गोष्ट तुमच्या लक्षात आली का ?

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा