कर्नाटकातील सत्तास्पर्धेत सुप्रीम कोर्टाने आता सुचवला ‘ हा ‘ तोडगा : कर्नाटक विधानसभा निवडणूक

By | May 18, 2018

supreme court suggest soln for karnataka

कर्नाटकमधील सत्तासंघर्ष सुप्रीम कोर्टात पोहोचला असून शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजल्यापासून सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने शनिवारी बहुमत सिद्ध करणे हाच उत्तम तोडगा असल्याचे सांगितले. मात्र, याबाबत अद्याप सुप्रीम कोर्टाने दिलेला हा फक्त सल्ला आहे निर्णय नाही.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मंगळवारच्या निकालापासून सुरू झालेले वादाचे वर्तुळ राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी दिलेले निमंत्रण, सर्वोच्च न्यायालयातील युक्तिवाद, विरोधकांची निदर्शने असे बिंदू जोडत गुरुवारी सकाळी बी.एस. येड्डीयुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतरही भाजपसमोरच्या अडचणी संपलेल्या नाहीत. बहुमताचे संख्याबळ असलेल्या जेडीएस-काँग्रेस आघाडीऐवजी सर्वाधिक आमदारांचे बळ असलेल्या भाजपला सत्तास्थापनेसाठी आमंत्रित करण्याच्या राज्यपाल वजुभाई वाला यांच्या निर्णयाला काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून, यावरील निकालानंतरच सत्तेची हमी मिळणार आहे.

राज्यपालांकडून भाजपला सरकारस्थापनेचे आमंत्रण मिळताच बुधवारी रात्री काँग्रेस- जेडीएसने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांचे रजिस्ट्रार कार्यालय गाठून तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली. येड्डीयुरप्पा यांचा शपथविधी स्थगित करावा, या याचिकेवर सुनावणी घेण्यासाठी न्या. ए. के. सिक्री, शरद बोबडे व अशोक भुषण यांचे खंडपीठ स्थापन करण्यात आले. रात्री सव्वादोन वाजता याचिकेवर सुनावणी सुरू झाली. काँग्रेस नेते व ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी बहुमत नसलेल्या पक्षाला सरकारस्थापनेसाठी बोलवण्याच्या राज्यापालांच्या कृतीस हरकत घेतली, तर भाजपची बाजू मांडणाऱ्या मुकुल रोहतगी यांनी, राज्यपालांसारख्या घटनात्मक पदाच्या निर्णयाला न्यायसंस्थांनी अडकाठी आणू नये, अशी बाजू मांडली. अखेर खंडपीठाने काँग्रेस-जेडीएसची मागणी फेटाळत शपथविधीचा मार्ग मोकळा केला. मात्र, त्याचवेळी येड्डीयुरप्पा यांनी राज्यपालांना सादर केलेल्या पत्राची प्रत सादर करण्याचा आदेश दिला व पुढील सुनावणी आज सकाळी ठेवण्यात आली होती त्यावेळी सुप्रीम कोर्टाने हा सल्ला दिला आहे .

कर्नाटकात सत्ता स्थापनेचा चांगलाच पेच निर्माण झाला असून भाजपाकडून सत्तेसाठी घोडेबाजार होत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. आपल्या आमदारांनी पक्षातून बाहेर पडू नये यासाठी काँग्रेसने त्यांना इलिंग्टन रिसॉर्ट येथे पाठवले होते. मात्र, या रिसॉर्टबाहेरील पोलिस बंदोबस्त हटवण्याचे राष्ट्रनिर्माण भाजपकडून केले गेले आणि लगेचच भाजपाचे नेते तिथे पोहोचले आणि त्यांनी काँग्रेसच्या आमदारांना पैशांची ऑफर दिल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस नेते रामलिंगा रेड्डी यांनी केला आहे.२४ तासांच्या आत बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली तर भाजपच्या समोरील अडचणी जास्त वाढणार आहेत.

कर्नाटक सत्तास्थापनेत नवीन ट्विस्ट..हा ‘ राम ‘ देऊ शकतो काँग्रेसला सत्तेची चावी : उद्याची मोठी बातमी

राज्यपालांचा ‘ असा ‘ राजधर्म, येडियुरप्पा यांचा उद्या शपथविधी मात्र ? : कर्नाटक विधानसभा निवडणूक

तसं नाही तर ‘ असं ‘ ..सत्तेसाठी हपापलेल्या भाजपचा मास्टरप्लॅन : कर्नाटक विधानसभा निवडणूक

भाजपाकडून एकही मुस्लिम उमेदवार नसताना मुस्लिम समाजाचे मतदान कोणाला ? : कर्नाटक विधानसभा निवडणूक

कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता स्थापनेकडे वाटचाल : काय आहे सध्याची ताजी परिस्थिती ?

मोदी यांच्या फेकूपणाचे नाव काय ? : दैनिक लोकमतमधून मोदी यांचे अज्ञान केले उघडे

काँग्रेसच्या इंदिरा कॅन्टीनमध्ये ताव मारुन भाजपा कार्यकर्त्यांचा प्रचार : ६० वर्षे काय केले ?

भाजपचा चोरटा नगरसेवक सीसीटीव्ही मध्ये झाला कैद : कुठे घडली ही घटना ?

बळीराजाच्या डोक्यावर पाय ठेवण्याची परंपरा भाजपने राखली : लाज वाटावी ‘ असे ‘ उचलले पाऊल ?

काँग्रेसने कुत्र्यांकडून देशभक्ती शिकावी , पंतप्रधान मोदी यांची भाषा घसरली

आणि भाजपाने शहीद म्हणून गौरवलेला ‘ तो ‘कार्यकर्ता चक्क जिवंत : काय आहे बातमी ?

स्टार प्रचारक आणि संस्कारी शोकांतिका : मुकेश माचकर यांचा अप्रतिम लेख

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा