फेरीवाला विषयावर सर्वोच्च न्यायालयाने दिला ‘ मोठा ‘ निर्णय

By | November 24, 2017

manse workers finally catches feriwala who attacked sushant malwade

एल्फिस्टन दुर्घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील फेरीवाल्यांना हटविण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली होती. मुदत संपल्यानंतर ठाणे मनसेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी सकाळीच ठाणे स्टेशन परिसरात आंदोलन केले होते . मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाणे स्टेशन परिसरात असलेल्या फेरीवाल्यांच्या स्टॉल्सची तोडफोड केली विक्रीसाठीचा माल रस्त्यावर फेकून दिला होता.

मुंबईतील एलफिन्स्टन रोड स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर राज ठाकरे यांच्या नेतृत्त्वात मनसेने ‘संताप मोर्चा’ काढला होता. मुंबईतील मेट्रो सिनेमा ते चर्चगेट असा भव्य मोर्चा काढून राज ठाकरे यांनी चर्चगेटमधल्या रेल्वे प्रशासनाला आपलं निवेदन दिले होते. 15 दिवसात पादचारी पूल आणि स्टेशनबाहेरील रस्ते फेरीवाले मुक्त करा नाहीतर १६ व्या दिवशी आम्ही रस्त्यावर उतरून कायदा हातात घेऊन कारवाई करू, असेही सांगितले होते.

एल्फिस्टन दुर्घटनेमुळे चेंगरून तब्बल 2३ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता . रेल्वे प्रशासन गाफील राहिल्यामुळे व फेरीवाल्यांच्या गर्दीमुळे ही चेंगरा चेंगरी झाल्याचा मनसेचा आरोप आहे . संताप मोर्चा मध्ये राज ठाकरे यांनी केंद्र सरकार व मोदींवर सडकून टीका केली होती.पुढे मनसे कार्यकर्त्यांवर मालाड येथे जीवघेणा हल्ला झाला. जर फेरीवाल्यांविरोधात कारवाई केली गेली नाहीतर आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ, असा इशारा मनसेने दिला होता. ज्या ठिकाणी जागा दिलेय तिथेच त्यांनी व्यवसाय करावा, अशी भूमिका मनसेकडून मांडण्यात आली होती. मात्र, काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी याला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, त्यांना झटका बसलाय.

फेरीवाल्यांच्या समर्थानात दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयापाठोपाठ सर्वोच्च न्यायालयानंही फेटाळून लावलीय. फेरीवाल्यांना वितरीत केलेल्या जागेतच विक्री करता येणार असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायलयानं दिला होता. त्यामुळं संजय निरुपमांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे फेरीवाल्यांना आता मुंबई महापालिकेनं नेमून दिलेल्या जागेतच विक्री करणे बंधनकारक असणार आहे.मात्र महापालिका जागा ठरवून देत नाही, असा संजय निरुपम यांचा आरोप आहे.

एल्फिन्स्टन पूल बांधणीसाठी केंद्रीय संरक्षणमंत्री, रेल्वे मंत्री तसेच मुख्यमंत्री आणि भाजपच्या नेत्यांनी भेट दिल्यानंतर शिवसेनेला बोलावण्यात देखील आले नाही म्हणून टाहो फोडणारे सेनेचे नेते फेरीवाल्यांच्या प्रश्नावर रस्त्यावरही दिसत नाहीत आणि ज्या पालिकेत त्यांना चौथ्यांदा सत्ता मिळाली तेथेही तोंड बंद करून का बसले आहेत, मतांसाठी कोणत्याही थराला जाणारे शिवसेना व भाजप आज अनधिकृत फेरीवाल्यांच्या मुद्दय़ावर गप्प बसून मुंबईकरांची वाट लावून दाखवत आहेत. अशीही टीका देखील बाळा नांदगावकर यांनी शिवसेनेवर ह्या विषयाबाबत मौन बाळगले म्हणून केली होती. पुढे शिवसेनेने फेरीवाल्यांची बाजू घेत सर्वांनाच चकित केले होते.

मराठी माणसाला फेरीवाल्यानं मारणं कदापि सहन करणार नाही : काँग्रेसचे ‘ हे ‘ आमदार

चौथ्यांदा सत्ता मिळाली तरी फेरीवाल्यांच्या प्रश्नावर तोंड बंद करून गप्प का ? : शिवसेनेवर हल्लाबोल

फेरीवाले देखील पेटले : मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांना जबर मारहाण

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?