‘ ह्या ‘ बाबतीत सनी लिओनी च्या पण पुढे आहे कतरीना कैफ

By | September 22, 2017

katrina kaif

सोशल मिडियावर भारतामध्ये सर्वाधिक चर्चेत अन् शोधली जाणारी व्यक्ती जरी सनी लिओनी असली तरी सध्या मात्र इन्स्टाग्रामवर तरी कतरिना कैफ जास्त पुढे आहे.

सोशल मिडियापासून कतरिना तशी लांब लांबच राहत होती,मात्र गेल्या काही दिवसांत कतरिना च्या इन्स्टाग्रामवरील तिच्या फॅन फॉलोअर्समध्ये कमालीची वाढ नोंदली गेली असून ही संख्या ५ लाखांच्या पुढे गेली आहे.

केवळ चारच महिन्यात कतरिनाला मिळालेली चाहत्यांची पसंती तिचे बॉलिवूडमधील स्थान दर्शवित आहेत. कतरिनाने आधी आपले फेसबुक आणि नंतर इन्स्टाग्राम अकाऊंट सुरु केले फक्त चार महिन्यापूर्वी सुरु केले असून , इतक्या कमी कालावधीत इतक्या मोठय़ा संख्येने फॅन फॉलोअर्स मिळवन्यात देखील तिला यश आले आहे.

आपली सुंदर फोटो, रोजच्या अपडेट तसेच इतर कोणत्या वादात न पडणे यामुळे तिचे फॉलोअर्स वाढत आहेत. आपल्या चाहत्यांसोबत दैंनदिन शेडय़ुलमध्येही आपण जोडलेले राहू शकतो, हा खास अनुभव आहे, असेही कतरीना म्हणते.

अर्थात इन्स्ताग्रामची मालकी फेसबुक कडेच असल्याने फेसबुक वरचे काही फॉलोअर्स इन्स्ताग्राम वर पण फॉलो करत असावेत असे जाणकारांचे म्हणणे आहे.

? पोस्ट आवडली असेल तर लाईक करा शेअर करा ?