फादर्स डे ला सनी लिओनीकडून घडली ‘ ही ‘ अक्षम्य चूक : सनी आणि डॅनिअल ट्रॉलर्सच्या निशाण्यावर

By | June 18, 2018

sunny leone shares memories of jism2

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीनं आपल्या मनमोहक, घायाळ करणाऱ्या अदांनी आणि परफेक्ट फिगरमुळे सिनेसृष्टीमध्ये स्वतःची वेगळी अशी जागा निर्माण केली आहे. भारतात सनी लिओनी आली काय आणि कधी बॉलीवूड ची होऊन गेली हे आपल्याला कळले पण नाही, इतक्या वेगाने सनी लिओनीने आपली छाप फिल्म इंडस्ट्री मध्ये सोडली आहे मग तो सनी लिओनीचा डान्स असो इंटिमेट सीन्स . भारतीय सौंदर्य आणि उत्तम नृत्यकौशल्याच्या बळावर सनी लिओनीने बॉलीवूड मध्ये आपलं स्थान भक्कम केलं. सनी लिओनीने काही जरी केलं तरी त्याची बॉलीवूड मध्ये धमाल प्रसिद्धी होते.

फादर्स डेच्या निमित्ताने डेनिअलने पुन्हा एक नवा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. हा फोटोही लोकांना आवडेल, असा त्याचा अंदाज होता. पण झाले एकदम उलटे. लोकांनी हा फोटो पाहिला आणि लोक भडकले. यानंतर सनी आणि डेनिअल यांच्यावर तुफान तोंडसुख घेतले. या वादग्रस्त फोटोत सनी आणि निशा या दोघीही न्यूड आहेत. त्यामुळेच या फोटोवरून वाद निर्माण झाला आहे. सनी व डेनिअल या दोघांनी गतवर्षी एका अनाथ मुलीला दत्तक घेतले होते. तिचे नाव त्यांनी निशा असे ठेवलेले आहे. हा फोटो खरोखर अत्यंत दुर्दैवी वाटावा असा असून सनीवर कारवाई केली जावी असा देखील नेटकऱ्यांचा सुर होता .

कदाचित आपल्याला माहित नसेल मात्र, सनीने बॉलिवूड चित्रपटांमध्ये आतापर्यंत जेवढे हॉट सीन दिले आहेत, ते सर्व पती डेनियलसोबत दिले आहेत. डेनियल अशाप्रकारचे सीन देण्यासाठी चित्रपटात बॉडी डबलचे काम करतो. सनी लिओन आणि डेनियल वेबर केवळ चांगले लाइफ पार्टनर नाहीत तर चांगले बिझनेस पार्टनरही आहेत. सनीने पती डेनियलसोबत २००९ मध्ये सनलस्ट पिक्चर्स नावाचे एक प्रॉडक्शन हाउस सुरू केले आहे.मात्र वेगवेगळ्या देशातील संस्कृतीमध्ये फरक असतो याचे सनीने भान ठेवायला हवे होते.