तुमच्यामुळे माझी झोप पूर्ण नाही: सनी लिओनी भडकली

By | November 26, 2017

sunny leone attacks jet airways for delay in flights

बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनी जेट एअरवेजवर भयानक चिडली आहे. कारण सनीच्या म्हणण्याप्रमाणे , जेट एअरवेजच्या विमानांची उड्डाणं रोजच उशिरा होत असल्यामुळं आम्हाला मागील आठवड्यात प्रचंड त्रास सहन करावा लागला. जेटच्या गोंधळामुळं आठवडाभर माझी झोपही पूर्ण होऊ शकली नाही.

सनीने ही टीका तिच्या ट्विटर अकाउंट वरून केली आहे.सध्या सर्वाधीक बीझी असणाऱ्या बॉलीवूड अभिनेत्रीमध्ये सनी लिओनीचे नाव घेतले जाते. सनी लिओनी म्हणते , जेट एअरवेजची विमानं जवळपास रोजच उशिरानं उडत आहेत. गेला आठवडाभर मी जेटच्या विमानांनी प्रवास करतेय आणि रोजच माझ्या विमानाचं उड्डाण किमान तासभर उशिरानं होतंय. एखाद्या दिवशी हे घडलं असतं तर ठीक होतं. पण गेला आठवडाभर रोजच हे सुरू आहे. त्यामुळं मला धड झोपही घेता आलेली नाही,’ अशा शब्दात सनीने जेट एअरवेजच्या आंधळ्या व्यवस्थापनावर ताशेरे ओढले आहेत.

अर्थात फक्त सनीच नव्हे तर सनीचा पती डॅनियल देखील जेट च्या कारभाराला वैतागलेला आहे, आठवड्याभरात चार विमानांना उशीर झाल्याचं डॅनिअलनं जेटच्या कस्टमर केअरला कळवलं. त्यावर ही चूक एअरलाइन्सची नसून विमानतळ प्रशासनाची आहे, असं उत्तर त्याला देण्यात आलं. त्यामुळं तोही चकित झाला. जेटचं हे उत्तर हास्यास्पद असल्याचं त्यानं म्हटलं आहे.

बहुतांश सेलिब्रिटी आपला वेळ वाचावा म्हणून विमानानेच प्रवास करतात, त्यांच्या बाजूने त्यांचे प्लँनिंग अचूकच असते, मात्र अशी काही अडचण तयार झाली तर पुढील सर्व नियोजन बिघडले जाते . त्यामुळे सेलिब्रिटी ह्या विमान कंपन्यांवर तोंडसुख घेतात.आता सनी लिओनी च्या ह्या तक्रारीची दखल देत एअरवेज कशी घेणार हे पाहावे लागेल.

आपल्या हॉट अंदाजामुळे सनी सध्या बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री झाली आहे . विशेष म्हणजे तिच्या लोकप्रियतेत दिवसागणिक वाढ होत आहे. सनीने आतापर्यंत बॉलिवूडमध्ये शाहरूख खान याच्यासह अनेक बड्या स्टार्ससोबत काम केले आहे. वास्तविक हे सगळ्यांनाच माहिती आहे की, सनी पोर्न इंडस्ट्रीची स्टार राहिली असून, आता ती बॉलिवूडमध्ये काम करीत आहे.

बोल्ड सीनसाठी सनी लिओनीची पहिली अट ‘ ही ‘ असते

जर तुमच्यावर लैंगिक अत्याचार होत असेल तर .. : सनी लिओनी काय म्हणते ?

‘ म्हणून ‘ सनी लिओनी आपल्या पतीला प्रत्येक कार्यक्रमात सोबत घेऊन जाते

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?