सरकार हटेना : अखेर संप कर्मचाऱ्यांवर पोलिसांचा लाठीमार

By | October 20, 2017

maharashtra government gives warning to st employees

एस.टी. संपाचा आज चौथा दिवस असून अजूनही संपावर कुठला तोडगा निघालेला नाही . मात्र प्रवाशांचे हाल सुरूच असून शासकीय पातळीवर ज्या उपाययोजना केल्या जात आहेत त्यात संपकरी कर्मचारी अडथळा अनंत आहेत . सातार्यामध्ये मात्र आज कर्मचाऱ्य़ांवर पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्याची बातमी आहे .

खाजगी ट्रॅव्हल्स गाड्या आत जाऊ नयेत म्हणून आणि सरकारची पर्यायाने प्रवाशांची अडवणूक व्हावी म्हणून,आंदोलक कर्मचाऱ्यांनी फाटकावर एसटी बसेस आडव्या लावल्या होत्या. मात्र पोलिसांनी त्या एस.टी. बसेस हलवण्याचा प्रयत्न केला, मात्र या बसेस हलवता येऊ नयेत म्हणून चाकाची हवा सोडण्याचा प्रयत्न आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला. शेवटी नाईलाजाने पोलिसांना सौम्य लाठीहल्ला करावा लागला.

त्यामुळे कर्मचारी अजूनच संतप्त झाले . संतप्त कर्मचाऱ्यांनी उद्धव ठाकरे आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या नावाने निषेधाच्या घोषणा दिल्या. संपादरम्यान खासगी वाहनांची वर्दळ वाढली असली तरी सातारा बसस्थानकात अजून तरी त्यांना आत जाऊ दिल जात नाहीये.

दरम्यान दर अर्ध्या तासाला सातारा ते पुणे, तसंच दर एक तासाला मुंबई, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूरकडे जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती, सातारा विभाग नियंत्रकांनी दिली आहे. परिवहन महामंडळाच्या नियमावलीनुसारच तिकीट दरांचं नियोजन बसस्थानकात केलं जाणार आहे.

मात्र आता चार दिवसांपासून सुरु असलेला एसटीचा संप मिटण्याची शक्यता आहे. यावर तोडगा काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेतला असल्याचे समजते . त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी ह्या विषयावर चर्चा केली असून एसटी कर्मचाऱ्यांचा आज संप मिटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

राज्यातील एसटी संपाचा ताण रेल्वे सेवेवर मोठ्या प्रमाणावर आला आहे . एसटी गाड्या नसल्याने लोकांनी रेल्वेचा आसरा घेतला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने संपामुळे प्रवाशांची वाढती गर्दी पाहून जादा डबे जोडण्याचा निर्णय घेतला.संपामुळे एसटी स्थानके ओस पडू लागली आहेत तर रेल्वेत पाय ठेवायलाही जागा नाही अशी स्थिती झाली आहे.

दरम्यान प्रत्येक ठिकाणी कर्मचारी आपले आंदोलन वेगवेगळ्या पद्धतीने करत आहेत . जळगावात किर्तनाच्या माध्यमातून सरकारचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न चोपडा बस आगार कर्मचाऱ्यांनी केला. किर्तनाच्या माध्यमातून सातव्या वेतन आयोगावर यावेळी प्रकाश टाकण्यात आला.तर औरंगाबाद आणि येवल्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी मुंडण करून राज्य सरकारचा निषेध केला. आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे. रोज १०० वेळा मारण्यापेक्षा एकदा वाघ बनून मारू , असेही काही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

ह्या संपामुळे कित्येक जणांना दिवाळीचा आनंद घेता आला नाही तर कित्येकजन लक्ष्मी पूजनाला देखील आपल्या घरी जाऊ शकलेले नाहीत. आज संप जरी मिटला तर प्रवासी मात्र आपले झालेले हाल विसरू शकणार नाहीत .

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?

 

--Ads--

Leave a Reply