मरण्याआधीच आईला स्मशानात नेऊन ठेवणारा निर्लज्ज मुलगा : महाराष्ट्रातील घटना

By | November 11, 2017

son sends her mother to amardham when she is live shocking news

स्वामी तिन्ही जगाचा भिकारी अशी एक मराठी म्हण असली, तरी डिजिटल युगात नात्यांचा कोरडेपणा दिवसेंदिवस वाढत आहे . फ्लॅट संस्कृती वाढत असून कोणाला कोणाचे घेणे देणे नाही , हे देखील एकवेळ मान्य केले मात्र जेव्हा विषय आईचा असतो तेव्हा देखील लोक इतके निर्दयी कसे होतात, याचे उदाहरण म्हणजे अहमदनगर मधील धक्कादायक प्रकार . नगरमधील अमरधाम ही एक स्मशानभूमी आहे, एका मुलाने जिवंतपणीच आईला अमरधाम इथे आणून सोडल्याची धक्कादायक घटना अहमदनगर येथे घडली आहे . रोज १०-१५ अंत्यसंस्कार जिथे होतात तिथे जिवंतपणीच वृद्ध आईला आणून सोडल्यामुळे समाजातील सर्व थरातील लोकांकडून याबद्दल संताप व्यक्त होत आहे .

ह्या दुर्दैवी आईचे नाव लक्ष्मीबाई आहुजा असे असून , बायकोशी आईचे पटत नाही म्हणून हा निर्णय त्याने घेतल्याचे समजते आहे. ‘एबीपी माझा’ने यासंदर्भात वृत्त दिले आहे . मागील तीन आठवड्यांपासून लक्ष्मीबाई आहुजा यांना त्यांच्या मुलाने आईशी पटत नाही म्हणून स्मशानभूमीत आणून ठेवले आहे. ‘मुलगा म्हणजे वंशाचा दिवा’ असे म्हणत मुलासाठी कित्येक कोवळ्या स्त्री अर्भकाचा पोटातच जीव घेणाऱ्या लोकांच्या डोळ्यात अंजन घालावी अशी ही घटना आहे .

ज्याला जन्माला घातले, स्वतःचे मन मारून लहानचे मोठे केले, स्वतःच्या हौस मौज सगळ्यांची, मुलाच्या सुखासाठी आहुती दिली.त्याच मुलाने लक्ष्मीबाईंना जिवंतपणी स्मशानात आणून ठेवले. इतके सगळे होऊनही मुलगा वाईट नाही पण सुनेशी पटत नाही म्हणून त्याने मला इथे ठेवले आहे असे लक्ष्मीबाई म्हणतात तेव्हा ऐकणाऱ्याच्या डोळ्यातून देखील पाणी आल्याशिवाय राहत नाही. आईचे काळीज किती क्षमाशील असते याची यातून कल्पना येते. त्यांचा मुलगा रोज जेवणाचा डबा आणून देतो, मात्र घरी घेऊन जात नाही. आई मात्र मुलगा आपल्याला घरी कधी घेऊन जाणार?, याची त्या वाट बघत आहेत.

सध्या,माऊली नावाच्या सामाजिक संस्थेने स्मशानात वास्तव्य करणाऱ्या लक्ष्मीबाईंची निवाऱ्याची व्यवस्था केली आहे अशीही माहिती आहे.सध्याच्या प्रचंड प्रगतीच्या वेगात माणूस माणुसकी हरवत चालला आहे. नवरा बायको, बहिण-भाऊ नात्यांमध्ये आलेला असलेला कमालीचा कोरडेपणा आता आई मुलाच्या नात्यातही येऊ लागला असल्याचेच हे उदाहरण आहे. ज्या आई वडिलांनी आपल्यासाठी खस्ता खाल्ल्या त्यांना अशा प्रकारे वाऱ्यावर सोडणे, स्मशानात ठेवणे कितपत योग्य आहे?

मोबाईलने लोक जवळ येत असले तरी नात्यांमधून ओलावा गायब होत चालला आहे . शॉर्ट टर्म मेमरी व्हावी अशी बहुतांश लोकांची मानसिकता झाली आहे . ह्या दुर्दैवी आईच्या मुलाला देव सदबुद्धी देवो अशी आपण प्रार्थना करूयात .

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?