पिच्चर चले ना चले अपनी दुकान चलती रहेगी

By | September 24, 2017

malaika arora

चित्रपटसृष्टीत प्रत्येक वेळी आपल्या नावाचं नाणं चालेलच असा नाही म्हणून काही अभिनेते आणि अभिनेत्रींनी ‘प्लॅन बी’ तयारच ठेवले आहेत. इंडस्ट्रीत येणारा प्रत्येक कलाकार फक्त आणि फक्त अभिनयातच सक्रिय असतो असा जर तुमचा समज असेल तर तसं नाही. कारण, बऱ्याच जणांचे अभिनयाव्यतिरिक्त इतरही काही व्यवसाय असतात . चला तर मग पाहूया सेलिब्रिटींचे प्लॅन बी आहेत तरी काय?

माधुरी दीक्षित-
आपल्या अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी माधुरी दीक्षित एक चांगली नृत्यांगनाही आहे. नृत्याची हीच आवड तिने व्यवसायातही रुपांतरित केली. माधुरी एक ऑनलाइन डान्स अकॅडमी चालवते.

सुनील शेट्टी-
सुनील शेट्टी हॉटेल व्यवसायात चित्रपट सृष्टीच्या आधीपासून आहे . त्याशिवाय त्याची स्वत:ची निर्मितीसंस्था सुद्धा आहे. ‘पॉपकॉर्न एण्टरटेन्मेंट’ नावाच्या या निर्मिती संस्थेअंतर्गत ‘खेल’, ‘रक्त’, ‘भागम भाग’ आणि ‘मिशन इस्तानबुल’ या चित्रपटांची निर्मिती करण्यात आली होती

लारा दत्ता-
अभिनय क्षेत्रात सध्या लारा दत्ता सक्रिय नसली तरीही ती दुसऱ्याच एका कलात्मक क्षेत्रात सक्रिय आहे. ‘छाबरा ५५५’ या क्लोथिंग ब्रॅण्डच्या साथीने लाराने तिचं साड्यांचं कलेक्शन लाँच केलं आहे. त्याशिवाय तिची स्वत:ची निर्मितीसंस्थाही आहे.

अर्जुन रामपाल-
अर्जुन रामपाल जितका चांगला अभिनेता आहे तितकाच चांगला व्यवसायिकही आहे. अर्जुन ‘चेसिंग गणेशा’ नावाची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी चालवतो.

मलायका अरोरा-
‘फिटनेस फ्रिक’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मलायका अरोरा फॅशन वेबसाइट चालवते.

अजय देवगण-
अभिनेता अजय देवगण, गुजरातमधील चारंका सौरउर्जा प्रकल्पातही भागधारक आहे. याशिवाय त्याची ‘देवगण एण्टरटेन्मेंट सॉफ्टवेअर लिमिटेड’ नावाची निर्मितीसंस्थाही आहे. या निर्मितीसंस्थेअंतर्गत ‘राजू चाचा’, ‘यू, मी और हम’ आणि ‘ऑल द बेस्ट’ या चित्रपटांची निर्मिती केली आहे.

ट्विंकल खन्ना-
ट्विंकल खन्ना एका प्रसिद्ध वृत्तपत्रामध्ये स्तंभलेखनही करते. याशिवाय ती निर्मिती क्षेत्रातही सक्रिय झाली असून, इंटेरियर डिझायनिंगमध्येही तिने स्वत:चा ठसा उमटवला आहे.

अक्षय कुमार-
खिलाडी कुमारने त्याचा ‘प्लॅन बी’ तयार ठेवला आहे. ऑनलाइन शॉपिंग चॅनलमध्ये खिलाडी कुमारने गुंतवणूक केली आहे. त्याशिवाय ‘हरी ओम एण्टरटेन्मेंट’ हा त्याची निर्मिती संस्थासुद्धा आहे.

( माहिती स्रोत इंटरनेट वरून घेण्यात आलेलं असून १०० % खरी माहिती असेल असा आम्ही दावा करत नाही )

पोस्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा .. शेअर करा