भाजपचा निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदमची जेलमधील दशा दुर्दशा : आता ठेवायचे तरी कुठे ?

By | February 27, 2018

sripad chhindam got beaten in ahmednagar jail

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधान करणारा भाजपचा निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदम सध्या नाशिक रोड कारागृहात असून इथे देखील त्याला कैद्यांकडून किरकोळ स्वरूपाची मारहाण झालेली आहे . छिंदम याला याआधी नगर इथे देखील कैद्यांनी जोरदार चोपला होता . नाशिकला त्याच्यावर सध्या बारीक लक्ष ठेवले जात असून त्याला कोणच्याही संपर्कात येऊ दिले जात नाही. छिंदम हा एकटा पडला असून स्वतःशीच संवाद करत असतो असे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे . अशा आशयाचे वृत्त सकाळमध्ये प्रकाशित झालेले आहे.

आधी छिंदमला नियमित कैद्यांच्या सोबत ठेवले होते मात्र तिथे देखील त्याला इतर कैद्यांनी चापटी मारल्या होत्या त्यामुळे त्याला इतर कैद्यांपासून दूर ठेवण्यात आलेले आहे . सध्या छिंदमबाबत वरिष्ठांना रोजच माहिती कळविली जाते. सुरवातीला त्याला स्वतंत्र कक्षात हलवावे असा विचार होता. मात्र जागेची उपलब्धता नसल्याने ते अद्याप शक्‍य झाले नाही. सुरक्षेसाठी अंडा सेल मध्ये हलविण्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्‍यक असते. तशी परवानगी नसल्याने अंडा सेल मध्ये त्याला हलविता आलेले नाही. हा विषय अतिशय संवेदनशील असल्याने कारागृह पोलिसांवर देखील मोठी जबाबदारी आहे . सध्या छिंदमचा कोणाशीही संपर्क होत नसल्याने तो अनेकदा स्वतःशीच बोलत असतो. अन्य कैदी मारहाण करतील अशी भीती त्याला सतावत असावी असे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

छिंदमला नाशिकला ठेवले असल्याने नाशिकच्या पुण्यभूमीत हा व्यक्ती नको अशी देखील बऱ्याच नाशिककरांची मनस्वी इच्छा आहे. यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच शिवसेना व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे आंदोलन झाले आहे . छिंदमसारख्या प्रवृत्ती अंदमानला हलवाव्यात. त्याला नाशिक रोड कारागृहात ठेऊ नये अशी मागणी केली. त्यामुळे कोठडी संपेपर्यंत येत्या 2 मार्चपर्यंत कारागृह प्रशासनाला छिंदमच्या सुरक्षेची मोठी काळजी घ्यावी लागणार आहे. कारागृह अधिक्षकांशी संपर्क साधला असता त्यांनी अन्य कैद्याप्रमाणेच त्याला वागणुक दिली जाते. वेगळी काहीही व्यवस्था नाही असे सांगितले आहे .

कोण हा छिंदम आणि काय आहे प्रकरण ?

अहमदनगर महापालिकेचा भाजपचा मुजोर उपमहापौर श्रीपाद छिंदम याने संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज तसेच शिवयजयंतीबद्दल बेताल व बेलगाम अपशब्द वापरत वक्तव्य केल्याची क्लिप नगरमध्ये व्हायरल झाली होती . ह्या ऑडिओ मधील अश्शील व असभ्य भाषेमुळे समस्त मराठी जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या . त्यामुळे नगर शहरातील दिल्लीगेट परिसर व शहरातील इतर भागात त्याचे तीव्र पडसाद उमटले. छिंदम हा खा. दिलीप गांधी गटाचा समर्थक होता . दिलीप गांधी हे भाजपचे नगरचे जुने नेते असून नगरच्या राजकारणामध्ये त्यांची चांगली ओळख आहे.

शिवजयंती अवघ्या तीन दिवसांवर आलेली असताना महापालिका कर्मचाऱ्याला झापत असताना छिंदम याची जीभ घसरली. त्याने शिवाजी महाराज व १९ फेब्रुवारीला होणाऱ्या शिवजयंतीविषयी देखील आक्षेपार्ह वक्तव्य केले तसेच ह्या कर्मचाऱ्यास देखील बोलताना कर्मचाऱ्याच्या जातीचा उल्लेख केला. ही क्लिप व्हायरल झाल्यावर नागरिकांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी छिंदम याच्या कार्यालयाची तोडफोड केली.

नगरच्या प्रभागातील एका कामासाठी महापालिकेच्या बांधकाम विभागाकडे कर्मचाऱ्यांची मागणी छिंदम याने केली होती. कर्मचारी पाठवले नाही म्हणून त्याने बांधकाम विभागातील कर्मचारी अशोक बिडवे यास फोन केला होता . बिडवे याच्याशी बोलताना छिंदम याची जीभ घसरली. छिंदम याच्या कार्यालयासमोर संतप्त नागरिक जमले होते . छिंदमच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या तसेच त्याच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. ही माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली . संभाजी ब्रिगेडचे गोरख दळवी यांच्यासह दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते .

शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड, दिलीप सातपुते व संभाजी कदम यांनी तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये ठिय्या देत छिंदम यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली  . भाजपने छिंदम याची उपमहापौर पदावरून हकालपट्टी केली असून त्यास पक्षातून देखील निलंबित करण्यात आलेले आहे . शिवसेना तसेच युवक काँग्रेस कमिटी , छावा मराठा युवा संघटना , राष्ट्रवादी काँग्रेस यांनी देखील छिंदम याच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत .

नोकरीचे आमिष देत बलात्कार करून सामाजिक कार्यकर्ता फरार : महाराष्ट्रातील घटना

शिक्षकाच्या पवित्र पेशाला फासला काळिंबा.. गावकऱ्यांकडून चोप :महाराष्ट्रातील घटना

सासूच्या सल्ल्याने स्वतःच्या सख्ख्या अल्पवयीन भावाला ‘ ह्या ‘ कारणावरून संपवले : महाराष्ट्रातील घटना

शासकीय कार्यालयात महिलांसमोर अश्शील चाळे करणारा समाजकल्याण विभागातील वरिष्ठ लिपिक धरला

व्हॅलेंटाइन डे ला भाजप नगरसेविकेने आपल्या पतीला भर रस्त्यावर ‘ ह्या ‘ कारणावरून दिला चोप :महाराष्ट्रातील घटना

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा