राणेंच्या स्वाभिमानाबाबत शिवसेनेचे सुभाष देसाई बोलले ‘ हे ‘ वादग्रस्त वाक्य

By | October 8, 2017

नारायण राणे यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला असला तरी शिवसेना काय त्यांचा पाठलाग सोडायला तयार नाही . राणे यांनी शिवसेना सोडली तेव्हाच खरे तर ह्या वादाची खरी सुरुवात झाली होती असे म्हणावे लागेल . रत्नागिरीमध्ये शिवसेनेचा पदाधिकारी मेळावा झाला त्यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई राणे यांच्याबद्दल बोलताना म्हणाले , ‘ गेली बारा वर्षे नारायण राणे यांना काँग्रेसवाल्यांनी सडवले. आता त्यांना भाजपावाले कुजवतील ”

भाजपच्या सत्तेसमोर झुकणाºया राणे यांचा स्वाभिमान गेला कुठे, असा प्रश्नही त्यांनी केला.

शनिवारी रत्नागिरीत शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. देसाई म्हणाले की, ज्या राणेंना सिंधुदुर्ग जिल्ह्यात थारा नाही, त्यांनी भाजपाला मिठी मारली. जो पक्ष सत्तेत आहे, त्याच्यापुढे लोटांगण घ्यायचे, हे त्यांचे कामच झालेले आहे. त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान नावाचा पक्ष काढला. त्यांचा स्वाभिमान कुठे आहे?

आता निवडणूक आयोगाकडे महाराष्ट्र स्वाभिमान हा पक्ष नोंदणीसाठी देण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने राणे यांच्या ‘ह्या’ स्वाभिमानाबाबत विचार करावा, असा टोलाही त्यांनी मारला. शिवसेनाप्रमुखांनी राणे यांना शिवसेनेतून बाहेर काढले. त्यांच्याबरोबर १० आमदार देखील शिवसेना सोडून गेले होते. आज ते आहेत कुठे, असा प्रश्न देसाई यांनी उपस्थित केला.

शिवसेनाप्रमुखांनी कोंबडी चोर म्हणून नाव ठेवलेले राणे तुमच्याकडे येत आहेत, तेव्हा भाजपावाल्यांनो आपल्या कोंबडय़ा सांभाळा, अशी जहरी टिका करताना भाजपवाले राणेंना सडवून नव्हे, तर कुजवून ठेवतील, असा टोला उद्योगमंत्री तथा शिवसेनेचे कोकण विभागीय संपर्क प्रमुख सुभाष देसाई यांनी मारला.

मात्र स्वाभिमानाच्या गप्पा करणाऱ्या शिवसेनेची देखील परिस्थिती याहून वेगळी नाही . शिवसेनेच्या मंत्र्यांना देखील सरकारात निर्णय घेताना कोण विचारत नाही ह्या गोष्टीकडे देखील डोळेझाक करून चालणार नाही .

? पोस्ट आवडली तर लाईक करा ..शेअर करा ?