‘ ह्या ‘ महत्वाच्या वेळी देखील शिवसेनेने भाजपला दाखवला ठेंगा

By | November 8, 2017

shivsena with opposition on 1st year of demonetization

नोटबंदी मुळे शिवसेनेचा झालेला थयथयाट आपण सर्वानी पाहिला होता. नोटबंदीला असलेला शिवसेनेचा विरोध जगजाहीर आहे . ८ नोव्हेंबर ला नोटबंदी ला एक वर्ष पूर्ण झाले ह्या वेळी भाजप कडून नोटबंदीचे समर्थन करणारे काही कार्यक्रम तर विरोधी पक्षाकडून विरोध करणारे निषेध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते . काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ८ नोव्हेंबर ला सकाळी आझाद मैदानात नोटाबंदीचे श्राद्ध घालून मुंडण आंदोलन केले होते. नोटाबंदीविरोधातल्या आंदोलनात विरोधी पक्षांसह मांडीला मांडी लावून सत्ताधारी शिवसेनेचा सहभाग बरेच काही सांगून जातो. मात्र सत्तेत देखील शिवसेना भाजपच्याच मांडीला मांडी लावून आणि विरोधी पक्षांच्या सोबत देखील मांडीला मांडी लावून . त्यामुळे शिवसेनेची नेमकी भूमिकाच काय हा प्रश्न आता शिवसैनिक विचारू लागले आहेत.

नोटबंदीच्या वेळी नोटबंदीच्या विरोधी काढलेल्या मोर्चात देखील शिवसेना सहभागी झालेली होती. हिंदुत्व आणि मराठी सगळे गुंडाळून ममता बॅनर्जी, केजरीवाल आणि उमर अब्दुल्ला यांच्या  सोबत दिल्लीत शिवसेनेचे एक वेगळे रूप समस्त मराठी जणांनी पाहिल होत. आता नोटबंदीला १ वर्ष झाल्यावर देखील सत्तेची फळ चाखणारी शिवसेना भाजप सोबत दिसण्याची अपेक्षा होती मात्र शिवसेनेने ती फोल ठरवली.

  • पुढे काय होऊ शकेल ?

उद्धव ठाकरे यांनी दहा दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती त्यामुळे राज्यात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्यातील राजकीय घडामोडीवर उद्धव यांनी पवार यांच्याशी चर्चा केल्याची प्राथमिक माहिती आहे.

गेल्याच आठवड्यात तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची देखील उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली होती. आजपर्यंत मातोश्री वर नेते भेटीसाठी जात असत मात्र हा पायंडा मोडीत काढत स्वतः जाऊन उद्धव ठाकरे गेले. शरद पवार यांच्या देखील घरी उद्धव ठाकरे स्वतः गेले . ही बाब देखील बऱ्याच जुन्या शिवसैनिकांना रुचलेली नाही. मात्र यातून भाजपला कोंडीत पकडण्यासाठी शिवसेनेचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले जात आहे.

भाजपविरोधी आघाडी उभी करता येईल का ? याचीही चाचपणी सुरु असल्याचे बोलले जातंय. शिवसेनेचा डबल रोल जनतेला देखील पसंत नाहीये आणि आता उद्धव ठाकरे यांची सरकारमध्ये राहण्याची मानसिकता राहिलेली नाही . मात्र पवार यांनी तुम्ही तुमची भूमिका घ्या, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आपली भूमिका ठरवेल, अशी गुगली टाकल्यामुळे, राजकीय भूकंप होण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे.

काँग्रेसला रामराम ठोकून स्वतःचा पक्ष काढलेले नारायण राणे यांनी भाजपला पाठिंबा दिलाय तसेच ते मंत्री होण्याचे देखील संकेत आहेत. त्यामुळे राज्यातील घडामोडींना वेग येणार आहे. राणेंचा सत्तेत सहभाग झाला तर नारायण राणे ह्या अस्राचा वापर करून शिवसेनेची कोंडी करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. राणेंना मंत्रीमंडळात घेण्यास देखील शिवसेनेचा विरोध आहे.

नोटबंदी ला वर्ष झाल्याच्या निमित्ताने ,डाव्या पक्षांसह विचारवंत व सामाजिक कार्यकर्त्यांनीही आझाद मैदानात जोरदार निदर्शने केली. काळा पैसा विरोधी दिन साजरा करणाऱ्या भारतीय जनता पार्टीविरोधात सर्वच विरोधकांनी नोटाबंदीवरून टीकेची झोड उठवल्याचे चित्र आझाद मैदानात पाहायला मिळाले. यावेळी देखील शिवसेनेची भाजपाला साथ मिळाली नाही, त्यामुळे सत्तेत शिवसेना आहे तरी का ? असा प्रश्न उपस्थित राहतो.

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?