गुजरातमधील शेतकऱ्यांची कर्जमाफी करू : शिवसेनेकडून आश्वासनांची गुजरातमध्ये खैरात

By | December 3, 2017

shivsena blames bjp for incoming of patidar leaders in gujarat

आम्ही सत्तेत आलो तर गुजरातमधील शेतकऱ्यांची कर्जमाफी करू या सोबतच गुजरातमध्ये सत्ता आल्यास शिवसेना शेतमालाला योग्य भाव, सिंचन प्रकल्प आणि नर्मदा योजना पूर्णत्वास नेऊन शेताला मुबलक पाणी देखील देईल असे देखील ह्या वचननाम्यामध्ये म्हटले आहे . तसेच महाराष्ट्राच्या वचननाम्यातील अनेक वचनांचाही गुजराती जनतेसाठी पुनरुच्चार केला आहे.

गुजरातच्या निकालामध्ये हिंदुत्ववाद हा कायमच एक मुद्दा राहिला आहे आणि बहुतेक वेळा गुजरात च्या जनतेचे हिंदुत्ववादी विचारसरणीलाच आपला कौल दिलेले आहे . हे लक्षात घेऊन शिवसेनेने गुजरात मध्ये आता निवडणूक लढायची तयारी सुरु केली आहे.अर्थात शिवसेनेची गुजरात मध्ये ताकद ना के बराबरच आहे मात्र हिंदुत्ववादी मतांची काही प्रमाणात फूट पडून शिवसेना भाजपाला अडचणीत आणण्याचा शिवसेना प्रयन्त करत आहे .

गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपशकुन करणार नाही असे सांगत निवडणुका न लढण्याची घोषणा करणाऱ्या शिवसेनेने घूमजाव करत निवडणुकीत ५० च्या आसपास उमेदवार उभे केले आहेत. गुजरातमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान करावे म्हणून मुंबईतील शिवसेना नेते गुजराती समाजाला विनंती करत आहेत तर इथे देखील शिवसेनेने आपला वचननामा नागरिकांच्या समोर मांडला आहे. शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी हा शिवसेनेचा वचननामा जाहीर केला.गुजराती कॉमनमैन व शेतकऱ्यांसाठी आश्वासनाची खैरातच दिली आहे असे म्हटल्यास नवल वाटू नये .

वचननाम्यातील ठळक गोष्टी

वचननाम्यात शिवसेनेने गुजरातच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, सिंचन प्रकल्प, शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव, वीज जोडणी, तरुणांना रोजगार, गुजरातच्या जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी नवीन योजना, शेतकरी नवतरुण-महिला गोरगरिबांच्या सर्वांगीण विकासाच्या योजना, प्रत्येकाला परवडेल अशी शालेय शिक्षण फी व आरोग्यसेवा, परवडणारी घरे, समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण, महिला सबलीकरण, महिला सुरक्षा, जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर राखण्यासाठी प्रयत्न, व्यसनमुक्ती, व्यापार-उद्योगात वाढ करून रोजगार वाढवणे, जीएसटी दरातील कपातीसाठी प्रयत्न, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची व्याप्ती वाढवून अधिक सुविधा पुरवण्यावर भर, गुजरात टुरिझमसाठी योजना आदी आश्वासनांची या वचननाम्यात खैरात करण्यात आली आहे. आता ह्या वचननाम्याला गुजरातची जनता कसा प्रतिसाद देते हे मात्र पहावे लागेल.

शिवसेनेच्या ‘ ह्या ‘ मास्टरप्लॅनचा भाजपने घेतलाय धसका : शिवसेना डायरेक्ट भिडणार

‘ ह्या ‘ महत्वाच्या वेळी देखील शिवसेनेने भाजपला दाखवला ठेंगा

‘ तर ‘ त्या सत्तेला लाथ मारून जाणार : उद्धव ठाकरे यांची गर्जना

मैं सचमुच चला जाऊंगा : हेराफेरीच्या माध्यमातून नितेश राणेंकडून शिवसेनेची खिल्ली (व्हिडिओ)

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?

--Ads--

Leave a Reply