आणि ‘ अशा ‘ रीतीने भाजपच्या समोर शिवसेनेची सपशेल माघार

By | November 2, 2017

shivsena-u-turn-on-book-on-corroupt-minister-from-bjp

काल फेरीवाला सन्मान मोर्चा मनसे च्या आक्रमकपणामुळे काही यशस्वी होऊ शकला नाही. मराठी माणूस आणि त्याचा कैवार घेणारी शिवसेना मात्र ह्या मोर्चाला विरोध करायचे सोडून भाजपच्या नेत्यांवर घोटाळ्यांची पुस्तिका बनवण्यात व्यस्त असल्याची लोकांची प्रतिक्रिया होती.  ‘निवडणुकांसाठी तयार राहण्याचे आदेश देखील उद्धव ठाकरे यांनी आपल्या सैनिकांना काल दिले .भाजप सरकारच्या मंत्र्यांची नावानिशी घोटाळ्याची पुस्तिका पुढे शिवसैनिकांना देण्यात आली, मात्र भाजपने ही गोष्ट सिरियसली घेत तेवढ्याच ताकतीने प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरु केली आहे . त्यामुळे शिवसेनेने सपशेल माघार घेत जबाबदारी झटकायला सुरुवात केली आहे.

काल फेरीवाला सन्मान मोर्चा च्या निमित्ताने मुंबईतील मराठी माणसाचे राजकारण ढवळून निघाले होते. मात्र आजपर्यंत शिवसेनेने फेरीवाला ह्या विषयावर बोलण्याचे देखील टाळले होते. विचार करून आमची भूमिका स्पष्ट करू असे शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आले होते . शिवसेनेची कालची मिटिंग ही फेरीवाला ह्या विषयावर असेल अशी लोकांची समजूत होती मात्र फेरीवाला हा विषय सोडून देत शिवसेनेकडून भाजपच्याच घोटाळ्यांची पुस्तिका वाटत ही मीटिंग संपली.

मात्र भाजप मंत्र्यांच्या घोटाळ्यांच्या पुस्तिकेचे हे प्रकरण अंगलट येण्याची चिन्हे दिसताच शिवसेनेनं या प्रकरणातून आपली जबाबदारी झटकण्यास सुरुवात केलीय. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्तिगत स्तरावर शिवसेनेची भाजपच्या बदनामीची खेळी गांभीर्यानं घेतल्यानं आणि त्याच ताकदीनं प्रत्त्युत्तर देण्याची तयारी सुरु झाल्यामुळे शिवसेनेची भंबेरी उडाली असल्याचं बोललं जातंय . ही पुस्तिका मंत्र्यांच्या नावानिशी व्यक्तिगत स्वरुपाची असल्याने भाजप इतक्या सहजतेने ही गोष्ट सोडून देईल असे वाटत नाही.

शिवसेनेचे नेते आणि आमदार व्यक्तिगत स्तरावर बोलताना सांगतात कि त्या पुस्तिकेशी पक्षाचा काहीही संबंध नाही. काल शिवसेनेच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांना या पुस्तिकेचे वाटप करण्यात आले असेल, पण ती शिवसेनेच्या वतीने तयार केलेली पुस्तिका नाही… ती शिवसेनेची अधिकृत पुस्तिका नाही, असं स्पष्टीकरण आता शिवसेनेकडून देण्यात येतंय. मात्र शिवसेनेच्या बैठकीत वाटली गेलेली ही पुस्तिका शिवसेनेची नाही यावर विश्वास कसा ठेवायचा, हा देखील भाजप पुढे प्रश्न आहे .

शिवसेनेच्या मते , कुणा त्रयस्थ व्यक्तीने तयार केलेली पुस्तिका बैठकीत पदाधिकाऱ्यांना वाटण्यातआलेली असू शकते. शिवसेनेचे नेते आणि मंत्री यांना सुद्धा या पुस्तिकेबाबत काही कल्पना नव्हती,त्यामुळे या पुस्तिकेच्या माध्यमातून पक्षालाच कुणी अडचणीत आणलं तर नाही ना, अशी चर्चाही शिवसेनेत सुरु झालीय.मात्र शिवसेनेच्या बैठकीत कोणी त्रयस्त येऊन अशा काही पुस्तिका वाटू शकतो का ? याचे उत्तर देखील तितकच अनाकलनीय आहे.

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?