शिवसेनेच्या कर्नाटकमधील ३७ उमेदवारांचे काय झाले ? : घ्या जाणून

By | May 17, 2018

arjun-khotkars-assembly-membership-canceled-by-high-court

कर्नाटकात नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये भाजप पहिला, काँग्रेस दुसरा तर जेडीएस तिसऱ्या नंबरचा पक्ष ठरला. पण या तीन पक्षांशिवाय निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले अन्य राजकीय पक्षाचे उमेदवार आणि अपक्ष उमेदवारांचे बहुतांश पानिपत झाले आहे . शिवसेनेने देखील आपले तब्बल ३७ उमेदवार उभे केले होते . कर्नाटकात आपलं नशीब आजमावू पाहणाऱ्या महाराष्ट्रातील शिवसेना, बिहारमधल्या जेडीयू आणि दिल्लीतील आप या पक्षांच्या सगळ्याच उमेदवारांवर ‘डिपॉझिट’ गमावण्याची वेळ आली.

२०१३ मध्ये दिल्लीमधून आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या आपला उर्वरित देशात काही फारसं यश मिळवता आलेलं नाही मात्र दिल्लीमध्ये अद्याप देखील आप ला चांगले समर्थन आहे. कर्नाटकात आपने २९ उमेदवार उभे केले होते. पक्षाचा दक्षिणेतला चेहरा मानले जाणारे पृथ्वी रेड्डी देखील निवडणूक लढवत होते. पण पृथ्वी रेड्डींना अवघी १८६१ मतं मिळाली. तर सीमाभागातील मराठी बांधवांच्या लढ्यात नेहमीच अग्रणी असणारा शिवसेना पक्षही उत्तर कर्नाटकवर लक्ष केंद्रीत करून निवडणूक आखाड्यात उतरला होता. या भागात शिवसेनेने जोरदार प्रचारही केला होता. मात्र शिवसेनेच्या ३७ पैकी एकाही उमेदवाराला ‘डिपॉझिट’ सुद्धा वाचवता आलेले नाही.

शिवसेनेप्रमाणे जेडीयूच्या २८ उमेदवारांचीही तीच गत झाली आहे. याशिवाय राज्यातील १११४ अपक्ष उमेदवारांचेही ‘डिपॉझिट’ जप्त झाले आहे.एकूण मतांपैकी एक षष्ठांश मतं मिळाली नाही तर अनामत रक्कम जप्त होते. कर्नाटकचे निकाल यावेळी काँग्रेस-भाजप-जेडीएस भोवतीच फिरल्याने बाकी पक्षांना याचा फटका बसला आहे.

असाच प्रश्न शिवसेनेने गुजरात मध्ये देखील करून पहिला होता . आम्ही सत्तेत आलो तर गुजरातमधील शेतकऱ्यांची कर्जमाफी करू या सोबतच गुजरातमध्ये सत्ता आल्यास शिवसेना शेतमालाला योग्य भाव, सिंचन प्रकल्प आणि नर्मदा योजना पूर्णत्वास नेऊन शेताला मुबलक पाणी देखील देईल असे देखील ह्या वचननाम्यामध्ये म्हटले आहे . तसेच महाराष्ट्राच्या वचननाम्यातील अनेक वचनांचाही गुजराती जनतेसाठी पुनरुच्चार केला होता मात्र गुजरात मध्ये देखील शिवसेनेला दारूण पराभव स्वीकारावा लागला होता .

गोल्डन मॅन अशी ओळख असलेल्या कुंजल पटेल या उमेदवाराला अपली अनामत रक्कमही वाचवता आली नाही.निवडणूक प्रतिज्ञापत्रातही पटेल यांनी आपल्या संपत्तीचे केलेले वर्णन पाहिले तर डोळे दिपून जातील अशी संपत्ती त्यांनी दिली होती .रमेश भाऊ वांजळे हे मनसेचे गोल्ड मॅन होते मात्र वांजळे भाऊंची स्टाईल ह्या शिवसेना उमेदवाराने कॉपी तर केली मात्र रमेशभाऊंचा विजय कॉपी करता आला नाही.

रमेशभाऊंची गोल्डमॅन स्टाईल कॉपी करणाऱ्या शिवसेनेच्या गुजरातच्या उमेदवाराचे काय झाले ?

लिलावाच्या ठिकाणी तुला जिवंत मारतो..खंडणीखोरीत मनसे तरी का मागे ? : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज

अखेर ‘ तो ‘ हल्ला मनसेकडूनच : इट का जवाब पथ्थर से मिलेगा

मनसेचे सुशांत माळवदे यांच्यानंतर दुसरा हल्ला ” यांच्यावर ” : मराठी पाट्यासाठी देत होते निवेदन

धक्कादायक: सत्ताधारी तसेच पालिका अधिकारी आणि झिरो नंबरची समांतर हफ्तेवसुली यंत्रणा

फेरीवाल्यांविरोधात मनसेचे आंदोलन आता पुण्यातही : रस्त्यावर फेकून दिला परप्रांतीयांचा माल

म्हणून आम्ही एकट्या नरेंद्र मोदींसाठी कर्ज डोक्यावर घ्यायचे का ? राज ठाकरे यांचा हल्लाबोल

अखेर नाणारच्या जमिनी गुजरात्यांनी लाटल्याचे स्पष्ट : राज ठाकरे याचा आरोप खरा ठरला

२०१९ मध्ये बॉल स्विंग होणार नाय; राज ठाकरेंच्या ‘रिव्हर्स स्विंग’ चा मोदी-शहा जोडगोळीवर हल्लाबोल

भाजपला लाज वाटत नाही का ? : राज ठाकरे यांचा सरकारवर चौफेर हल्ला

शौचालय बांधले पण पाणी आहे का ? : महाराष्ट्र दौऱ्याच्या पहिल्याच सभेला अभूतपूर्व प्रतिसाद

हवेत फुर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र……बुडबुडे सोडत मनसेने साजरा केला फेकू दिन

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा