शिवसेनेच्या ‘ ह्या ‘ मास्टरप्लॅनचा भाजपने घेतलाय धसका : शिवसेना डायरेक्ट भिडणार

By | November 9, 2017

shivsena in ground for election in gujrat will contest 40-50 seats

महाराष्ट्रात एकत्र सत्तेत असले तरी शिवसेना आणि भाजप मधील धुसफूस रोज चालू आहे. एके काळी कट्टर मित्र असलेले, शिवसेना भाजप यांचा आज एक दिवस सुद्धा एकमेकांवर टीका केल्याशिवाय जात नाही . गुजरातच्या निकालामध्ये हिंदुत्ववाद हा कायमच एक मुद्दा राहिला आहे आणि बहुतेक वेळा गुजरात च्या जनतेचे हिंदुत्ववादी विचारसरणीलाच आपला कौल दिलेले आहे . हे लक्षात घेऊन शिवसेनेने गुजरात मध्ये आता निवडणूक लढायची तयारी सुरु केली आहे.अर्थात शिवसेनेची गुजरात मध्ये ताकद ना के बाराबरच आहे मात्र हिंदुत्ववादी मतांची काही प्रमाणात फूट पडून शिवसेना भाजपाला अडचणीत आणण्याचा प्रयन्त करत आहे .

मोदींच्या विरोधात काँग्रेस, पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल तसेच ओ बी.सी. समाज देखील काही प्रमाणात एकवटला आहे. मात्र हक्काचे हिंदुत्ववादी मतदार अद्याप भाजपच्याच पाठी आहे . हे लक्षात घेऊन शिवसेनेने तब्बल ४०-५० उमेदवार रिंगणात उतरवण्याचे ठरवले आहे. गुजरातमध्ये गेल्या वीस वर्षांपासून भाजपाची सत्ता आहे , त्यामुळे सरकारच्या विरोधात असलेल्या लाटेचा फायदा शिवसेना घेऊन पाहत आहे . मात्र शिवसेनेने याआधी घेतलेल्या आपल्या भूमिकेस फारकत देत आता थेट भाजप समोरासमोर येऊन आव्हानच द्यायचे ठरवलेले दिसते आहे. या आधी शिवसेनेने हार्दिक पटेल यांना आपला पाठिंबा जाहीर केला होता .

मोदींचा विरोधात नोटबंदी, जी.एस.टी. ,आरक्षण हे मुद्धे घेऊन राहुल गांधी, हार्दिक पटेल एकवटले असून आता शिवसेना देखील भाजपच्या मदतीला न येत भाजप विरोधकांचीच एक प्रकारे साथ देत आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही . काही प्रमाणात प्रस्थापित सरकारविरोधात असलेल्या लाटेला थोडी हवा मिळाल्याने राहुल गांधी यांच्या भाषणात देखील पूर्वीपेक्षा जोश दिसत आहे. भाजपच्याच नजरेतून पाहिले तर शिवसेनेच्या रुपाने हिंदुत्ववादी मतांच्या फोडाफोडीचे तिसरे आव्हान उभे ठाकले आहे.

हार्दिक पटेल हे पाटीदार समाजाचे नेते असून यांचे शिवसेना आणि काँग्रेस दोघांबरोबर चांगले संबंध आहेत. पाटीदार समाजाने गुजरातच्या राजकारणामध्ये नेहमीच निर्णायक भूमिका बजावली आहे . त्यामुळे भाजपाची डोकेदुखी आणखी वाढली आहे. शिवसेना गुजरातमध्ये तीस ते चाळीस जागांवर उमेदवार उभे करणार आहे. गुजरातच्या सूरज आणि राजकोटमध्ये मराठी भाषिकांची संख्या मोठी आहे. या पट्टयात शिवसेना आपले उमेदवार उभे करेल असे कडून सांगण्यात येत आहे .

गुजरातमध्ये भाजपाच्या विरोधात सर्वच जण एकवटल्याने अटी-तटीचा सामना होण्याची चिन्हे आहेत. थोडयाशा फरकाने जागा गमावणे भाजपाला अजिबात परवडणारे नाही. २०१९ ला होणा-या लोकसभा निवडणुकीआधी गुजरातच्या निवडणुकीकडे सेमीफायनल म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे गुजरातची सत्ता टिकवून ठेवणे हे भाजपाच्या पुढील मोठे आव्हान असणार आहे.

कालपर्यंत मोदींना अपशकुन करणार नाही असे म्हणणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांचा आज अचानक सूर बदलला असून, शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांच्याकडे गुजरातची जबाबदारी देण्यात आली आहे . त्यासाठी ते अहमदाबादमध्ये देखील दाखल झाले आहेत.

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?