श्रीपाद छिंदमच्या राजीनाम्याचे वृत्त खोटे , पेशवाईचा छिंदमला पाठिंबा : नगरकर रस्त्यावर

By | April 4, 2018

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणारा भाजपचा निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदम याला महाराष्ट्रातून हद्दपार करा या मागणीसाठी हजारो शिवप्रेमीनी मंगळवारी नगर शहरात मोठा शिवसन्मान मोर्चा काढला. यात सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते सहभागी झाले होते . प्रशासन श्रीपाद छिंदमला राज्याबाहेर हाकलणार नाही याची खात्री असल्याने मोर्चेकऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला दिले नाही . चौपाटी कारंजा इथे महाराजांच्या चरणी निवेदन ठेवले. राजे माफ करा, असे फलक हाती घेत शिवप्रेमींनी प्रशासनाचा निषेध नोंदवला. ह्यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन वाचून प्रशासनाच्या दारी न देता महाराजांच्या चरणी ठेवण्यात आले.

राजकीय वरदहस्त मिळत असल्याने श्रीपाद छिंदम हा बिनधास्तपणे फिरत आहे. तो गुन्हेगार असून त्याच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत . ज्यावेळी तो नगरमध्ये आला तेव्हा त्याने काही नगरसेवकांना शिवीगाळ देखील केलेली आहे . त्याचा राजीनामा घेण्यात येईल असे भाजपच्या नगरसेवकांनी महासभेत सांगितले होते. मात्र त्याने अद्याप देखील राजीनामा दिलेला नाही , अशा आशयाचे वृत्त दिव्य मराठीमध्ये देण्यात आलेले आहे. त्याने फक्त उपमहापौर पदाचाच राजीनामा दिलेला आहे मात्र भाजपमधून अद्याप देखील त्याची हकालपट्टी झालेली नाही किंवा भाजपच्या सदस्यत्वाचा त्याने राजीनामा दिलेला नाही . उलट श्रीपाद छिंदमच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या कार्यकर्त्यांवर राजकीय दबावाला बळी पडत तब्बल ४५ दिवसांनी गुन्हे दाखल करण्यात आले. श्रीपाद छिंदम याच्या पाठी वरतून हात असल्याची चर्चा नगर शहरात आहे. श्रीपाद छिंदमला राज्यातून तडीपार करण्याची मागणी फडणवीस यांच्य्याकडे करण्यात आलेली होती ,मात्र श्रीपाद छिंदमने आपले राजकीय वजन वापरत कारवाई थांबवली . त्यामुळे मोर्चेकरी प्रशासनावर देखील नाराज आहेत . ही पेशवाई आहे, शिवशाही नाही, त्यामुळे प्रशासनाकडून काही कारवाई होण्याची आशाच नाही, अशी टीका मोर्चेकऱ्यांकडून होत होती. त्यामुळे प्रशासनाला निवेदन देखील देण्यात आले नाही. मोर्चामध्ये संभाजी ब्रिगेड सह इतरही संघटना सहभागी झालेल्या होत्या त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मात्र कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

श्रीपाद छिंदमच्या तडीपारीच्या मागणीसाठी सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील केली.श्रीपाद छिंदमला सपोर्ट करणारांचे करायचे काय .? खाली डोके वर पाय ..तुमचं आमचा नातं काय जय जिजाऊ जय शिवराय , ना जातीसाठी ना धर्मासाठी आपल्या छत्रपतींची अशा घोषणांनी मिरवणूक मार्ग दणाणून सोडला होता . छिंदमच्या राजीनाम्याचे वृत्त खरे असेल आणि श्रीपाद छिंदम सारख्या प्रवृत्ती अद्याप देखील जर भाजपमध्ये असतील तर ज्या शिव छत्रपतींच्या आशीर्वादाने आपण मतांची भीक मागून सत्तेत आलोय त्या शिव छत्रपतींना देखील वैयक्तिक स्वार्थापुढे न्याय देण्याची दानत भाजपमध्ये नाही असे म्हणावे लागेल. पारदर्शी पनाचा डांगोरा पिटणारे सरकार छिंदम सारख्या प्रवृत्ती केवळ मतांसाठी लाचार होऊन सांभाळत आहे असेच म्हणावे लागेल.

अण्णा हजारे यांची प्रतिमा डागाळण्याचे उद्योग सुरु : २०१४ चा फॉर्मुला फोटो मॉर्फ आणि खोटारडेपणा

नगरचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम आता बाहेर : न्यायालयात काय म्हणाला ?

हेच बघायचं बाकी होत : भाजपाचा माजी उपमहापौर छिंदम याचे तृतीयपंथी होर्डिंग ‘ ह्या ‘ ठिकाणी

भाजपचा निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदमची जेलमधील दशा दुर्दशा : आता ठेवायचे तरी कुठे ?

शिवभक्तांचा संताप श्रीपाद छिंदमला भोवला : आणखी ‘ इतके ‘ दिवस जेलमध्ये खितपत पडणार

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा