तर मग राज ठाकरे यांनाच का शिवसेनेत घेत नाही ? : शिवसेनेला खडा सवाल

By | February 13, 2018

घाटकोपरमध्ये शिवसेनेतील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेत घेण्यापेक्षा राज ठाकरेंनाच शिवसेनेत का घेत नाही? असा थेट सवाल नाराज शिवसैनिकांनी उपस्थित केला आहे.

शिवसेनेतील नवीन नियुक्तींवरुन रविवारी (11 फेब्रुवारी) घाटकोपरमध्ये शिवसैनिकच आपापसात भिडले होते . ही घटना ताजी असताना आता याच परिसरात शिवसैनिकांनी पक्षाविरोधी पोस्टरबाजी केली आहे. मनसेतून शिवसेनेत आलेल्यांना पद दिल्यानं शिवसैनिकांनी उघडउघड आपली नाराजी व्यक्त केली आहे. ‘राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेत घेण्यापेक्षा राज ठाकरेंनाच शिवसेनेत का घेत नाही? असा थेट सवाल नाराज शिवसैनिकांनी पोस्टरद्वारे विचारला आहे. मनसेकडून शिवसेनेत आले कि मोठी पदे दिली जातात आणि यामुळे शिवसेनेच्या निष्ठवंत शिवसैनिकांवर अन्याय होतो, अशी शिवसेना कार्यकर्त्यांची कायम ओरड असते . त्यातूनच हे पोस्टर लावले गेल्याचे बोलले जातंय.

शिवसेनेतील नवीन नियुक्त्यांवरुन घाटकोपरमध्ये शिवसैनिकच आपापसात भिडल्याची घटना घडली होती. शाखाप्रमुख पदावरुन दोन गटातील शिवसैनिकांचा राडा झाला. घाटकोपर पश्चिममधील शाखा क्रमांक 129 च्या बाहेर शिवसैनिकांचा राडा झाला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीत स्वबळाची घोषणा करुन हिंमतीने लढण्याची भाषा केलेली असताना, तर दुसरीकडे शिवसैनिकच एकमेकांविरोधात उभे ठाकल्याचे यावेळी पाहायला मिळाले.

ईशान्य मुंबई विभाग प्रमुख मा. श्री. राजेंद्र राऊत साहेब यांच्या धोरणानुसार ईशान्य मुंबई विभाग क्र. 8 च्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची उपविभाग प्रमुख, विधानसभा संघटक, सहसंघटक व शाखाप्रमुख यांची यादी नुकतीच जाहीर झाली. त्याचवेळी लक्षात आले की, यातील नियुक्त्या करण्यात आलेले बरेच जण अनेक पक्ष फिरुन संघटनेच्या विरोधात निवडणूक लढवून किंवा विरोधात काम करणाऱ्यांना मा. विभाग प्रमुखांनी संघटनेची सन्मानाची पदे बहाल केली आहेत.

इतर पक्षातून आलेल्या पदाधिकाऱ्यांची सध्याची पदे व पूर्वीचे पक्ष पुढीलप्रमाणे

  • मा. बाबू दरेकर (उपविभागप्रमुख) – पूर्वी – मनसे
  • मा. विजय पडवळ (उपविभागप्रमुख)- पूर्वी – मनसे भाजप
  • मा. ज्ञानेश्वर वायाळ (विधानसभा संघटक) – पूर्वी – मनसे
  • मा. बाबू साळुंखे (शाखाप्रमुख) – पूर्वी – मनसे/राणे समर्थक
  • मा. शिवाजी कदम (वय वर्ष 65 शाखाप्रमुख) पूर्वी – मनसे
  • मा. नाना ताटेले (शाखाप्रमुख) – पूर्वी – राष्ट्रवादी-मनसे-भाजप
  • मा. शरद कोथरे (शाखाप्रमुख) – पूर्वी – मनसे

ईशान्य मुंबईची ‘नवनिर्माण शिवसेना’ असे नाव देत नाराज शिवसैनिकांनी घाटकोपरमध्ये फलकबाजी केली. ‘राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना घेण्याऐवजी राज ठाकरेंनाच पक्षात का घेत नाही?’ असा सवाल शिवसैनिकांनी फलकाच्या माध्यमातून केला आहे. मनसेतून शिवसेनेत आलेल्या कार्यकर्त्यांना पद वाटल्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. ‘शिवसेनेला निष्ठावंतांची गरज नाही, चार घरे फिरुन आलेल्या लोकांची पक्षाला गरज आहे, असे म्हणत शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

पदर ढळल्यावर ऑफर यायचीच ह्या टीकेला एकनाथ खडसे यांचे ‘ हे ‘ प्रत्युत्तर

धर्मा पाटील यांची हत्या भाषण माफियांनी केली.. मुख्यमंत्री परदेशी गुंतवणूक काय चाटायची आहे?

‘ ही ‘ एक गोष्ट राष्ट्रवादी विसरून गेली : बावनकुळे व रावल यांच्यावर ३०२ लावण्याची मागणी

सरकारी कार्यालयाबाहेरील असंख्य धर्मा पाटील कोणी जन्माला घातले ? : लेख नक्की वाचा

इंटरनेटवर धमाल उडवून देणारी ही पोरगी आहे तरी कोण ? : पूर्ण माहिती

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा