अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांना हटवल्याने मयताच्या कुटुंबियांचे उपोषण मागे : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

By | May 16, 2018

shivsainik family uposhan stopped after promise to handover matter to cid

केडगाव (अहमदनगर ) येथील दोघा शिवसैनिकांच्या हत्येच्या तपासाबाबत तक्रारी करत मयत संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या कुटुंबीयांनी शनिवारपासून सुरु केलेले उपोषण मंगळवारी तब्बल ४ दिवसांनी मागे घेतले आहे. मात्र उपोषणमागे घेतेवेळी देखील त्यांची प्रकृती खालावलेली होती. हत्याकांडाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकातून अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांना हटवण्यात आले असून , त्यांचा जागी मालेगाव येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची तपास पथकाच्या प्रमुखपदी नेमणूक करण्यात आलेली आहे. तसेच या हत्याकांडाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांनी पोलीस महासंचालकाकडे पाठविला असल्याचे सांगण्यात आल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

केडगाव इथे महापालिकेच्या पोट निवडणुकीच्या वादातून ७ एप्रिल रोजी सेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची हत्या झाली. ह्या घटनेला सव्वा महिना उलटून देखील हत्याकांडाच्या तपासाला गती मिळत नसल्याचा आरोप करत मयताच्या कुटुंबीयांनी तपस पथकावर नाराजी व्यक्त करत केडगाव इथे उपोषण सुरु केले होते . वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानी वारंवार विनंती करून देखील उपोषण मागे घेण्यात आले नव्हते . मात्र मयत ठुबे यांची पत्नी अनिता यांची प्रकृती खालावली होती. त्यांना उपोषणस्थळीच सलाईन लावण्यात आले होते .

शिवसेना नेते अनिल राठोड व शशिकांत गाडे यांच्याकडून गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याशी फोनवरून संपर्क करण्यात आला . तपास यंत्रणा बदलावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली होती. यावर घनशाम पाटील ( अतिरिक्त पोलीस अधीक्षक ) यांनी पोद्दार यांची नियुक्ती केल्याचे सांगत ह्या गुन्ह्याचा तपास सीआयडी कडे वर्ग करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच हत्याकांडातील सर्व आरोपीना लवकरात लवकर अटक करण्यात येईल असे देखील स्पष्ट करण्यात आले त्यानंतरच हे उपोषण मागे घेण्यात आले.

  • काय असेल पुढील तपासाची दिशा

हत्याकांडातील फरार आरोपी लवकरच पकडले जातील . हत्याकांडाचा तपस दुसऱ्या यंत्रणेकडे द्यावा अशी मयताच्या कुटुंबीयांची मागणी होती. त्यानुसार तपास सीआयडीकडे वर्ग करावा, असा प्रस्ताव पोलीस महासंचालक यांच्याकडे पाठवण्यात आला असून, तेथून हा प्रस्ताव पुढे गृह विभागात जाऊन त्याला मंजुरी मिळेल.

मारेकरी संदीप गुंजाळ व भानुदास कोतकर यांच्यात ‘ इथे ‘ झाली होती भेट : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

सुवर्णा कोतकरांनी फोन केल्यानंतरच केडगाव हत्त्याकांडाचे आदेश मिळाले ? : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

न्यायालयाची परवानगी न घेता आमदार जगताप अमरधाममध्ये कसे ? : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

नगरच्या केडगाव परिसरात रेल्वे कटिंगसह अन्य अकस्मात मृत्यू का थांबले ? शिवाजी शिर्के यांचा लेख : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज

केडगावचा नगरसेवक विशाल कोतकरने ‘असा ‘ सांगितला घटनाक्रम : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

बाळासाहेब पवार यांच्या सुसाईड नोट मधील मजकूर का लपवला जातोय ?: नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज

बाळासाहेब पवार यांच्या पेट्रोल पंपावर कोणाचा होता डोळा ? : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज

रहस्यमयरीत्या डीव्हीआर गायब होण्याची घटना ? : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

‘ ह्या ‘ व्यक्तीच्या सांगण्यावरून झाली केडगावमध्ये हत्या : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

नात्यागोत्यांनी एकत्र येऊन नगरमध्ये माजवलेली दहशत आणि गुंडगिरी : पत्रकार पांडुरंग बोरुडे यांचा निर्भीड लेख

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा