साईबाबा होणार इजी ऍक्सेसेबल : शिर्डी आता हवाई नकाशावर

By | September 23, 2017

जगभरातील भक्तांच्या श्रद्धेचे स्थान असलेले श्रीसाईबाबांचे शिर्डी आता हवाई नकाशावर आले असून नागरी हवाई महासंचालनालयाने (डीजीसीए) शिर्डी विमानतळाला उड्डाण परवाना गुरुवारी जारी केला. श्रीसाईबाबांच्या समाधी शताब्दी वर्षांचा प्रारंभ या विमानतळाच्या उद्घाटनाने होत असून ते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते १ ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे.

राहता तालुक्यातील काकडी गावामध्ये असलेल्या विमानतळाचा रनवे अडीच हजार मीटरपेक्षा जास्त असून तो ए-३२० आणि बोइंग ७३७ जातींच्या विमानांसाठी आहे. राष्ट्रपतींचा दौरा जवळपास निश्चित झाल्याने डीजीसीएने उड्डाण परवाना देण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण केल्याचे समजते. या विमानतळावर २७५० चौरस मीटरची टर्मिनल इमारत असून चार विमानांना पुरेल एवढय़ा हँगरची सुविधा आहे. मात्र रात्रीच्या उड्डाणासाठी मात्र अद्याप परवाना मिळालेला नाही.

श्रीसाईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव असून प्रारंभीच्या टप्प्यात मुंबई, दिल्ली आणि हैदराबादला शिर्डी जोडले जाईल. मुंबई आणि दिल्लीमधून अलायन्स एअरलाइन्स, तर हैदराबादहून ट्रजेटची सेवा असेल.

३० सप्टेंबरला श्रीसाईबाबांची पुण्यतिथी आहे आणि त्यांचे समाधी शताब्दी वर्ष चालू होत आहे. ते निमित्त साधून शिर्डी हवाई नकाशावर आले आहे. जगभरातील भक्तांना त्याचा मोठा लाभ होईल. .

?पोस्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा ?