शौचालय असेल तर शौचालय म्हणू नये : केंद्राने सुचवले ‘ हे ‘ नवीन नाव

By | October 18, 2017

shauchalaya will not be called as shauchalaya instead call it as ijjat ghar

स्वच्छ भारत अभियानांतर्गत बांधल्या जात असलेल्या शौचालयांना यापुढे शौचालय म्हणू नये, असे पत्र केंद्राने सर्व राज्यांना लिहले आहे . मोदी सरकारची महत्वाकांक्षी योजना स्वच्छ भारत अभियानांतर्गत बांधल्या जात असलेल्या शौचालयांचं नाव बदलून ‘इज्जत घर’ ठेवलं जाऊ शकतं.अर्थात प्रत्येक राज्याला आपापल्या मातृभाषेप्रमाणे हे नाव ठेवण्याचा अधिकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीत वाराणसीत दौ-यात शौचालयाचं नाव ‘इज्जत घर’ ठेवल्याने कौतुक केलं होतं. पुढे केंद्र सरकारने सर्व राज्यांना पत्र लिहून शौचालयांना ‘इज्जत घर’ म्हणून संबोधले जावे असे सुचवले आहे. मात्र , भारतात अनेक भाषा असून त्या त्या राज्यांनी , ‘इज्जत घर’शी समांतर असे दुसरं नाव ठेवू शकतात, असंही सांगण्यात आलं आहे.

केंद्राने पत्रात लिहिलं आहे की, शौचालय एका कुटुंबात प्रतिष्ठा आणि अभिमान तयार करतो त्यामुळे त्याला इज्जत घर म्हटल्यास काही चुकीचं नाहीये. त्यामुळे देशामधील अन्य ठिकाणीही शौचालयाचं नाव ‘इज्जत घर’च्या पार्श्वभुमीवर ठेवले जाऊ शकते. वाराणसी दौ-यात नरेंद्र मोदी यांनी तेव्हा एका शौचालयाचं उद्घाटन करताना शौचालयाचं नाव ‘इज्जत घर’ ठेवल्याबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केलं होतं. ज्यांना आपल्या इज्जतची चिंता आहे ते नक्कीच इज्जत घर बांधतील, असेही मोदी यावेळी म्हणाले होते.

स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात करत स्वच्छतेचा संदेश देणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शौचालयासाठी खड्डा खोदून भूमिपूजनही केलं होतं. यावेळी त्यांनी स्वत: शौचालयासाठी विटा रचल्या. पशुधन आणि आरोग्य मेळाव्याचं उद्धाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातील शहंशाहपूरमध्ये आले होते.

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?

--Ads--

Leave a Reply