गोव्यामध्ये चक्क ‘ ह्या ‘ गोष्टीसाठी देखील होती आहे आधार कार्डची मागणी

By | December 17, 2017

maharashtra government plans to allow beach shack in kokan districts

सरकारच्या वेगवेगळ्या स्कीम आणि योजनांचा फायदा घ्यायचा असेल तर आधार कार्ड ची सक्ती केलेली आहे . अर्थात ३१ मार्च पर्यंत बहुतांश अशा स्कीम तसेच मोबाईल, बँकिंग, पॉलिसी साठी देखील लिंकिंग गरजेचे राहणार आहे . मात्र आता काही ठिकाणी चक्क पेड सेक्स साठी देखील दलाल आधार कार्डची मागणी करू लागले आहे. मुळातच देहव्यापार हा भारतात कोठेही अधिकृत नाहीये तरीदेखील अशा स्वरूपाची मागणी विचित्रच म्हणावी लागेल. हा चमत्कारिक प्रकार घडलाय गोव्यामध्ये.

वेश्याव्यवसायातही (पेड सेक्स) आता आधार कार्डची मागणी होऊ लागली आहे. त्यामुळे गोव्याला जाऊन असे काही करायचे असेल तर आधार कार्डची मागणी तुमच्याकडे केली जाऊ शकते. बँक, मोबाईल कंपन्या आणि सरकारी कागदपत्रांची जुळवाजूळव करण्यासाठी आधार कार्डची मागणी होणे आता नवे नाही मात्र चक्क ह्या गोष्टीसाठी देखील आधारची मागणी केल्याचा अनुभव दिल्लीतील ५ तरुणांना आला .

दिल्लीतील हे ५ तरुण गोव्यामध्ये फिरायला गेले होते. बॅचलर पार्टीसाठी त्यांनी गोवा हे ठिकाण निवडले. तिथे त्यांनी एका हॉटेलमध्ये मुक्काम केला. गोव्यात भटकल्यावर या तरूणांना ‘पेड सेक्स’ करण्याची इच्छा झाली, त्यास्तही आणि एका कॉन्टॅक्टवर संपर्क केला व तिथून प्रतिसाद येताच त्यांनी त्या गोष्टीची मागणी केली. समोरच्या कॉन्टॅक्टला काही वेळ दिल्यानंतर त्याने व्यवस्था केल्याचा परत यांना फोन केला व मुलांचे नाव, लोकेशन इत्यादी गोष्टीची माहिती घेतली व परत एकदा फोन करून ह्या मुलांकडे आधार कार्ड ची मागणी केली .

मुळातच गैरकानूनी काम त्यात देखील आधार कार्ड गरजेचे झाल्याचा अनुभव त्यांना देखील प्रथमच आला असेल . सुरुवातीला हे तरुण गोंधळून गेले. मात्र पुढे संबंधित तरुणाने यामागचे वास्तव त्यांना सांगितले. मुळातच देहव्यापार हा भारतात कोठेही मान्यता प्राप्त व्यवसाय नाही त्यामुळे पोलीस देखील अशा गैरकानूनी व्यवसायांवर बारीक नजर ठेवून असतात त्यामुळे थोडीशी जरी माहिती लागली तरी, पोलीस छापे टाकून कायदेशीर कारवाई करतात.सुरुवातीला बोगस गिऱ्हाईक पाठवून खात्री करतात, म्हणून हे दलाल लोक देखील सावध असतात त्यामुळे अशी काळजी दलाल लोकांकडून देखील घेतली जाते.

गोव्यात होणाऱ्या लूटीला पर्यटक वैतागले..’ ह्या ‘ गोष्टीला केली सुरुवात

आपल्या कोकणातही अनुभवता येणार गोव्याची मजा : सरकारने केला ‘ हा ‘ मास्टरप्लॅन

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?