आता मनसे जिल्हा अध्यक्षाने खाल्ला विदर्भात मार : ‘ हे ‘ आहे कारण

By | December 6, 2017

santosh-badre-beaten-by-bachchu-kadu-supporters-in-nagpur

आमदार बच्चू कडू यांना फोनवर अर्वाच्च भाषेत धमकी देणारे मनसेचे जिल्हा अध्यक्ष संतोष बद्रे यांच्यावर मंगळवारी सायंकाळी नागपूरमधील लोकमत चौकात प्राणघातक हल्ला करण्यात आला. याआधी संतोष बद्रे यांनी बच्चू कडू यांना अर्वाच्च भाषेत धमकी दिली होती. राज ठाकरे यांच्यावर टीका केल्याने संतोष बद्रे यांनी आमदार बच्चू कडू यांना फोनवर धमकी दिली होती .ही क्लिप इंटरनेटवर व्यायरल झाली होती. आमदार बच्चू कडू यांना याआधी देखील अशा अनेक धमक्या आल्या आहेत मात्र त्यांनी संयमित शब्दातच प्रत्युत्तर दिले आहे . मनसेची शिवराळ भाषा ही पक्षप्रमुखांपासून तर तळागाळातल्या पुढाऱ्यापर्यंत अशीच राहिलेली आहे .

आमदार बच्चू कडू यांचा एकेरी केलेला उल्लेख तसेच राज ठाकरे याच्याशी केलेली बच्चू कडू यांची तुलना यामुळे बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला आणि मनसेचे जिल्हा अध्यक्ष संतोष बद्रे यांना लोकमत चौक इथे गाठण्यात आले. बद्रे यांना गाडीत कोंबून त्यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न होता मात्र पोलिसांनी मध्ये हस्तक्षेप केला व आरोपींकडून संतोष बद्रे यांची सुटका केली तर तुषार पुंडकर नावाच्या व्यक्तीला रंगेहात पकडले.तुषार पुंडकर हे बच्चू कडू यांचे समर्थक मानले जातात .

बच्चू कडू यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती ,त्यांची टीका मनसेचे संतोष बद्रे यांना चांगलीच झोंबली आणि फोनवर अर्वाच्च भाषेत त्यांनी बच्चू कडू यांना दमदाटी केली. लोकशाहीमध्ये बोलण्याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे मात्र फोनवरून धमकी देणे आणि याची त्याची लायकी काढणे हे प्रकार देखील तितकेच निंदनीय आहेत.

आमदार बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्याकडून जबर मार खाल्लेले संतोष बद्रे यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. याआधी देखील तुषार पुंडकर यांनी संतोष बद्रे यांना अमरावतीमध्ये येऊन तुम्ही बच्चू कडू यांची माफी मागा असा सल्ला दिला होता पण मोठ्या मनाने माफी मागतील तर ते मनसे वाले कसले ? त्यामुळे शेवटी बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांचा यांचा संताप अनावर झाला आणि संतोष बद्रे यांना मार खावा लागला.

अशी घडली घटना

मंगळवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास बद्रे आपल्या दोन मित्रांसोबत बाईकवर लोकमत चौकाकडे जात असताना आरोपी बोलेरो वाहनातून आले, बद्रेच्या यांच्या दुचाकीला ओव्हरटेक करून गाडी थांबविली. आणि गाडीतून उतरून संतोष बद्रे यांना मारहाण करायला सुरुवात केली. संतोष बद्रे यांना मारहाण करायला सुरवात झाल्यावर त्यांच्या सोबतचे मित्र पळून गेले. शेवटी रस्त्यावरचा एक माणूस मध्ये पडला मात्र त्याला आरोपींची बाजूला जायला सांगितले आणि संतोष बद्रे यांना तोंडाला कापड बांधुन बोलेरोमध्ये कोंबले आणि तिथून निघून गेले. दरम्यान,अमरावती मार्गावर गस्तीवर तैनात असलेल्या पोलीस पथकाला अलर्ट करण्यात आले होते . पोलिसांनी कृपलानी चौकात बोलेरोला थांबविले. पोलिसांना बघून हल्लेखोर पसार झाले. मात्र तुषार पुंडकर हे पोलिसांच्या हाती लागले. याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढे तपास चालू आहे.

संतोष बद्रे यांच्यावरील हल्ला हा सुनियोजित होता. काही हल्लेखोर बोलेरोतून तर काही दुचाकीने आणि पायीसुद्धा होते. त्यामुळे सर्व काही व्यवस्थित नियोजनबद्ध होते. बद्रेला धडा शिकविण्यासाठी सकाळीच नागपुरात आले होते. ते संधीच्या शोधात होते. अमरावतीला परततानाच बद्रेला धडा शिकविण्याचा त्यांचा इरादा होता. बद्रे यांचा अमरावतीत आॅनलाईन लॉटरी व प्रॉपर्टी डीलिंगचा व्यवसाय आहे.

दरम्यान, मी कार्यकर्त्यांना आवरण्याचा बराच प्रयत्न केला तरीही काही कार्यकर्ते परस्पर संतोष बद्रेच्या मागावर गेले. त्याला चोख उत्तर दिले. मनसेने अशा चारित्र्यहीन लोकांना दूर ठेवायला हवे. माझ्या प्रेमापोटी हे पाऊल उचलणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे. अशा संयमी शब्दात बच्चू कडू यांनी आपल्या कार्यकर्त्यांची पाठराखण केली आहे.

बच्चू कडू यांच्याबद्दल माहित नसलेल्या ११ गोष्टी

शिवसेनेचे वाघ विधानसभेत मांजर बनले : आ. बच्चू कडू

वारीस पठाण मूर्ख माणूस .. लॉटरी लागून आमदार झालाय : मनसेचा पलटवार

अखेर ‘ तो ‘ हल्ला मनसेकडूनच : इट का जवाब पथ्थर से मिलेगा

मनसेचे सुशांत माळवदे यांच्यानंतर दुसरा हल्ला ” यांच्यावर ” : मराठी पाट्यासाठी देत होते निवेदन

धक्कादायक: सत्ताधारी तसेच पालिका अधिकारी आणि झिरो नंबरची समांतर हफ्तेवसुली यंत्रणा

फेरीवाल्यांविरोधात मनसेचे आंदोलन आता पुण्यातही : रस्त्यावर फेकून दिला परप्रांतीयांचा माल

?पोस्ट आवडली तर लाईक करा .. शेअर करा ?