मारेकरी संदीप गुंजाळ व भानुदास कोतकर यांच्यात ‘ इथे ‘ झाली होती भेट : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

By | May 16, 2018

main accused in kedgaon murder case ahmednagar information

केडगाव इथे दोन शिवसैनिकांची हत्या करणारा आरोपी संदीप गुंजाळ हा हत्याकांडापूर्वी काही दिवस आधी भानुदास कोतकर याला भेटला होता, अशी माहिती पोलीस तपासामध्ये समोर आली आहे .

केडगाव हत्याकांड प्रकरणात विशेष पोलीस पथकाने सोमवारी कोतकर याला पुणे येथून अटक केलेली आहे . मंगळवारी त्याला न्यायालयात हजार करण्यात आले.न्यायालयाने त्याला १९ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत असे तपासी अधिकारी दिलीप पवार व सरकारी वकील एस.एस.चव्हाण यांनी सांगितले आहे . केडगाव हत्याकांड होण्याआधी शिरूर इथे गुंजाळ व कोतकर यांची भेट झाली होती, अशी माहीती विशाल कोतकर याने पोलीस तपासादरम्यान दिली आहे . ७ एप्रिल रोजी भानुदास कोतकर व त्याची सून सुवर्णा कोतकर यांचा फोन झाला होता . विशाल कोतकर हा भानुदास कोतकर याचा पुतण्या आहेत . तर सुवर्णा कोतकर ही सध्याचे राहुरीचे आमदार शिवाजी कर्डीले यांची कन्या आहे. कोतकरकडून एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे . त्याचे कॉल डिटेल्स तपासायचे आहेत . त्यामुळे त्याला आत दिवसाची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी करण्यात आली होती. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी.स. कोलते यांनी कोतकरला पाच दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे .

  • थोडे काँग्रेसी गुंड भानुदास कोतकर याच्याविषयी

अशोक लांडे खून प्रकरणामध्ये सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला भानुदास कोतकर हा सध्या पॅरोलवर बाहेर आहे . मात्र घटना घडल्यानंतर तो फरार झालेला होता . शिवसेनेचे उप शहरप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या खून प्रकारामध्ये भानुदास कोतकर ह्याच्यावर देखील गुन्हा दाखल आहे .मात्र त्याला पुन्हा अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

एके काळी काँग्रेस पक्षाचा नेता असलेल्या भानुदास कोतकर याची केडगाव परिसरात गेल्या कित्येक दिवसांपासून दहशत राहिलेली असून जागा बळकावणे, उद्योजकांकडून हफ्ते गोळा करणे अशा स्वरूपाचाच त्याचा इतिहास राहिलेला आहे . परिसरातील नागरिक तसेच उद्योजक यांच्यावर दहशत निर्माण करणे. बांधकामासाठी एका ठराविक व्यक्तीकडूनच साहित्य घेण्यासाठी धमकावणे असे अनेक प्रकार भानुदास कोतकर पूर्वीपासून करत आलेला आहे . अशोक लांडे खून प्रकरणामध्ये जेव्हा अटक झाली तेव्हा त्याच्याबद्दल नकारात्मक बातम्या छापणाऱ्या एका वृत्तपत्राच्या विक्रीस देखील कोतकरची दहशत असलेल्या केडगावमध्ये मज्जाव करण्यात आला होता . वृत्तपत्र विक्रेत्यांना सुद्धा त्यावेळी धमकावण्यात आले होते . नगरमध्ये कोतकर, कर्डीले आणि जगताप ह्या तिन्ही घराण्यांमध्ये सोयरिकी करून प्रत्येक घराण्याने एका एका पक्षात स्थान मिळवलेले असून काहीही झाले तरी नगरमध्ये आमच्याच नात्यागोत्याची सत्ता राहणार, याचा अनुभव नगरकर गेल्या कित्येक दिवसांपासून घेत आहेत.

काँग्रेसचा देखील अशा लोकांना मोठे करण्यात मोठा हात राहिलेला आहे . ह्याच कोतकरचा मुलगा संदीप कोतकर यांनी नगरचे महापौरपद देखील भूषवले आहे . पुढे भानुदास कोतकर अशोक लांडे खून प्रकरणात भानुदास कोतकर अडकला आणि काही काळ केडगाव परिसरातील गुंडाराज थांबले मात्र कोतकर बाहेर येताच पुन्हा केडगावमध्ये गुंडाराज सुरू झाले आहे अशी नगरकराची प्रतिक्रिया आहे.आता परत कोतकर पोलिसांच्या जाळ्यात आला असल्याने त्यावर काय कारवाई होणार यावर नगरकरांचे लक्ष लागून आहे.

सुवर्णा कोतकरांनी फोन केल्यानंतरच केडगाव हत्त्याकांडाचे आदेश मिळाले ? : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

न्यायालयाची परवानगी न घेता आमदार जगताप अमरधाममध्ये कसे ? : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

नगरच्या केडगाव परिसरात रेल्वे कटिंगसह अन्य अकस्मात मृत्यू का थांबले ? शिवाजी शिर्के यांचा लेख : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज

केडगावचा नगरसेवक विशाल कोतकरने ‘असा ‘ सांगितला घटनाक्रम : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

बाळासाहेब पवार यांच्या सुसाईड नोट मधील मजकूर का लपवला जातोय ?: नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज

बाळासाहेब पवार यांच्या पेट्रोल पंपावर कोणाचा होता डोळा ? : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज

रहस्यमयरीत्या डीव्हीआर गायब होण्याची घटना ? : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

‘ ह्या ‘ व्यक्तीच्या सांगण्यावरून झाली केडगावमध्ये हत्या : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

नात्यागोत्यांनी एकत्र येऊन नगरमध्ये माजवलेली दहशत आणि गुंडगिरी : पत्रकार पांडुरंग बोरुडे यांचा निर्भीड लेख

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा