रातोरात पोल्ट्री उभी ,झाले बागायत आणि नारळाच्या बागा : अतीचतुर शेतकऱ्यांना अखेर दणकाच

By | January 11, 2018

samruddhi mahamarg farmers sinnar tries to cheat government for valuation of land

एका बाजूला विकास होत नाही म्हणून ओरडत राहायचे आणि दुसऱ्या बाजूला सरकारची फसवणूक करून स्वतःचा फायदा साधायचा असा दुटप्पी उद्योग बहुतांश लोकांकडून केला जातो. मग त्याला शेतकरी तरी अपवाद कसे राहतील ? . शेतकरी गरीबच हे चित्र साधारण उभे केलं जात मात्र सगळीकडे तशी परिस्थिती नाही . सरकारचा ड्रीम प्रोजेक्त असलेला समृद्धी महामार्ग महाराष्ट्रात तयार होणार आहे . मुंबई ते नागपूर अशा ह्या महामार्गाची जमीन संपादनाचे काम जोरात सुरु असून काही ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी अडथळा आणत आहेत तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या आडून सरकारला कोंडीत पकडण्याचे देखील राजकीय उद्योग सुरु आहेत. विरोध करायचा म्हणून शेतकऱ्याच्या खांदयावर बंदूक ठेवून निशाणा साधला जात आहे. अर्थात शेतकऱ्यांना देखील हे माहित असून, दुभत्या म्हशीच्या लाथा गोड, म्हणून ते देखील मिळेल ती जास्तीत जास्त रक्कम राजकीय पुढाऱ्यांना मध्ये घालून पदरात पडून घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

मात्र प्रकरण याही पुढे गेले असून,समृद्धी महामार्गासाठी जमिनी जात असलेल्या सिन्नर तालुक्‍यातील पूर्व भागातील काही शेतकऱ्यांकडून संयुक्त मोजणीच्या अगोदर व नंतर जमिनीचे मूल्यांकन म्हणजे व्हॅल्युएशन वाढून मिळावे म्हणून रातोरात शेतात पोल्ट्रीचे शेड उभारले जात आहे. तसेच काही जणांनी शेतात विहिरी खणून घेतल्या, तर काहींनी लांबून पाइपलाइन आणून कोरडवाहू जमीन बागायती असल्याचे दाखविण्याचे प्रयत्न केले. पडीक शेतात आंबा आणि नारळांची झाडे लावली गेली आणि हा सर्व प्रकार जमिनीला सरकारकडून चांगला मोबदला मिळावा म्हणून केला गेला. समृद्धीसाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळवून देण्याचे सांगून एजंटही या कामी सक्रिय झाले व त्यांनी तर काही ठिकाणी स्वत: देखील गुंतवणूक केलेली आहे.

  • संबंधित बातम्या

जमिनीवर बसलेले राज ठाकरे पहिले का कधी ? : नाशिकमध्ये संवाद

नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन चिघळले : मावळची पुनरावृत्ती करत पोलिसांचा गोळीबार

लेख नक्की वाचा : जिग्नेश मेवाणी उमर खालेद आताच डोके का वर काढताहेत ?

मात्र सरकारच्या ही गोष्ट लक्षात आली असून, हे सगळे फंडे व त्यातले अर्थकारण यावर सरकारी अधिकारी बारीक नजर ठेवून आहेत. त्यामुळे अशा शेतकऱ्यांची जमीन खरेदी रोखण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.ज्या ज्या शेतकऱ्यांनी जमिनीच्या संयुक्त मोजणीनंतर मूल्यांकनाच्या दरम्यान शेतात नवीन बांधकामे केली आहेत, अशा शेतकऱ्यांच्या गटांची खरेदीच समृद्धी महामार्गासाठी न करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय जमिनीतील पूर्वपरिस्थिती पाहण्यासाठी उपग्रहाची मदतही घेण्याचे निश्‍चित केले आहे.

शेतकऱ्यांकरवी केल्या जात असलेल्या अतिहुशार प्रयत्नांवर अधिकारी लक्ष ठेवून असून, त्यातील काही शेतकऱ्यांची माहिती व पुरावे देखील सरकारकडे आलेले आहेत . ज्या शेतकऱ्यांनी हा प्रकार केला अशांची खरेदी करण्यात येणार नाही.मात्र ह्यामुळे झटपट डबल टिबल करण्याचे काही लोकांचे स्वप्न भंगले असून, काही जणांनी आता आहे त्या भावात तरी घ्या असे देखील सांगत तगादा सुरु केला आहे मात्र आता उपग्रहाच्या छायाचित्राची मदत घेऊनच पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजते.

  • संबंधित बातम्या

तब्बल २० शेतकऱ्यांचा मृत्यू ..४०३ जणांना विषबाधा : आता आली सरकारला जाग

लेख नक्की वाचा : निखिल वागळे यांच्या मुलाखतीमधून कसा खोटारडेपणा आणि लपवाछपवी

तर लोकशाही न मानणाऱ्यांना सोबत घ्यायला तयार : प्रकाश आंबेडकर

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा