अतिथी देवो भव फक्त जाहिरातीत : ‘ म्हणून ‘ आली रशियन टुरिस्टला भीक मागण्याची वेळ

By | October 11, 2017

russian tourist becomes begger due to atm pin lock

अतिथी देवो भव अशी जाहिरात करून पर्यटन वाढवण्याचे प्रयत्न भरपूर करून झाले,पण आलेल्या पर्यटकांची सुरक्षा आणि त्यांना भारतात मिळणारी वागणूक याविषयी काही ठोस पावले उचलली जात नाहीत . कधी विदेशी महिलांवर बलात्कार होतो तर कधी लूटमार .. असाच एक इवेन्जलिन हा रशियन टुरिस्ट भारत भ्रमंती करायला भारतात आला खरा .पण पाऊल ठेवताच त्याला इथल्या कारभाराचा जो काही अनुभव आला तो कदाचित ह्या जन्मात विसरू शकणार नाही.

भारतात पर्यटनासाठी आलेल्या रशियन पर्यटकाच्या एटीएम पिन लॉक झाले. बँक अधिकाऱ्यांच्या बाबूगिरीचा त्यालाही चांगला फटका बसला. जवळ पैसे राहिले नाही, त्यात भारत जवळंच असं कोणीच नाही म्हणून चक्क मंदिराबाहेर भीक मागण्याची वेळ त्याच्यावर आली. खर्चासाठी पैसे नसल्याने हा रशियन तरुण कांचीपुरम येथील श्री सुब्रमण्यम स्वामी मंदिराच्या बाहेर भीक मागत होता. ही गोष्ट परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना समजली . त्या तात्काळ त्या तरुणाच्या मदतीसाठी त्या देवासारख्या धावून आल्या.

इवेन्जलिन हा रशियन टुरिस्ट तरुण भारतात आला होता. पण भारतात आल्यानंतर त्याच्या एटीएमचा पीन लॉक झाला. बँकेशी संपर्क साधला तर नेहमीप्रमाणे उडवाउडवीची उत्तरे मिळाली. एक अनोळखी माणूस भारतात पैशासाठी भटकू लागला . पण शेवटी, होते ते पण पैसे संपले पुढे खाण्यासाठीसुद्धा त्याच्याजवळ पैसे नव्हते. पीन लॉक झाल्याने त्याला पैसेही काढता येईना.

शेवटी काय करावे हे सुचेना, त्याने कांचीपुरम येथील श्री सुब्रमण्यम स्वामी मंदिराच्या बाहेर भीक मागायचं ठरवलं. मंदिराबाहेर विदेशी पर्यटक भीक मागत असल्याचे पाहून स्थानिक लोकांना सुद्धा समजेना, त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्याच्याजवळ सर्व कागदपत्रं होती पण आर्थिक अडचणींमुळे भीक मागत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आलं.

पुढे अनेक जणांनी हा मेसेज ट्विट करत सुषमा स्वराज यांना पाठवला.सुषमा स्वराज त्याच्या मदतीला धावून आल्यात. ”रशिया हा आमचा जुना मित्र आहे. चेन्नईमधील अधिकारी तुला सर्वोतोपरी मदत करतील’ असं ट्विट करत स्वराज यांनी मदतीचे आश्वासन दिले आहे.

भारतात आलेल्या पर्यटकांवर ही वेळ येणे ही भारतासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे.

? पोस्ट आवडली तर लाईक शेअर करा ?

--Ads--

Leave a Reply