लवकरच येणार १० रुपयाची नवीन नोट : पहा फर्स्ट लुक

By | January 6, 2018

rs10 note first look released by rbi

५०० व २००० रुपयांच्या नवीन नोटांनंतर ५० रुपयाची व २०० रुपयाची देखील नवीन नोट चलनात आलेली आहे. त्या पाठोपाठ आता १० रुपयाची देखील नवीन नोट आपल्याला काहीच दिवसातच हातामध्ये पडणार आहे. ह्या नोटेवर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल सही सोबतच महात्मा गांधी यांचा देखील फोटो राहणार आहे. तसेच कोणार्क च्या सूर्यमंदिराचे देखील चित्र या नोटेवर राहणार आहे .

भारतीय संस्कृतीचे परिपूर्ण चित्र असलेली ही नोट लवकरच आपल्या चलनामध्ये येणार आहे. सध्या ह्या नोटेची छपाई सुरु आहे. आरबीआय कडून ह्या नोटेचा फर्स्ट लुक जरी करण्यात आलेला आहे.

मागील आठवड्यामध्ये ह्या नोटेचे डिझाईन तयार केलं गेलं होत आता छपाईला वेग आलेला आहे . मोठ्या नोटांच्या तुलनेत लहान नोटा चालनामध्ये जास्त वापरल्या जातात त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ही छपाई होणार आहे. यापूर्वी 2005 मध्ये दहाच्या नोटेत बदल करण्यात आला होता. त्यानंतर जवळपास 13 वर्षांनी पुन्हा या नोटेची रचना परत बदलण्यात येत आहे.

ह्या नोटेचा रंग डार्क चॉकलेट ब्राऊन असणार आहे. याआधी फिकट नारंगी रंगाची २०० रुपयांची नोट व फिकट मोरपंखी रंगाची आधीच चलनात आलेली आहे.

  • दहा रुपयाच्या नोटेची काही खास वैशिष्टये
  • नोटेच्या मध्यभागी महात्मा गांधींचे चित्र राहणार आहे.
  • नोटेवर अंकी इंग्रजी आणि देवनागरी लिपीत 10 लिहिलेलं असेल.
  • नोटेवर उजव्या बाजूला अशोकस्तंभाचं चित्र राहील.
  • नोटेवर ‘RBI’, ‘भारत’, ‘INDIA’ आणि ’10’ सूक्ष्म अक्षरात लिहिलेलं असेल.
  • नोटेच्या पाठीमागे डाव्या बाजूला प्रिंटिंगचं वर्षं लिहिलेलं असेल.
  • नोटेवर स्वच्छ भारतचा नाराही छापलेला राहील.

नोटबंदी केल्यानंतर चलनावर लगेचच जास्त लोड येऊ सुरुवातीला ५०० व २००० च्या नोटा चालनामध्ये आणण्यात आलेल्या होत्या. काही दिवसापूर्वी २०० व ५० च्या नोटा देखील बाजारात आल्या. जुन्या नोटा पाह्यची सवय लागल्यामुळे नवीन नोटा देखील नागरिकांमध्ये कुतूहल पाहायला मिळत आहे. ह्या १० रुपयांच्या नोटेची लांबी १२३ एमएम असून रुंदी ६३ एमएम राहणार आहे. लहान नोटांच्या माध्यमांतून देखील काळ्या पैशाला लगाम कसण्याचे सरकारचे हे प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. मात्र जुन्या नोटा देखील पुर्वीप्रमानेच चलनात राहणार असल्याचे सरकार कडून सांगण्यात आले आहे.

फेसबुकवर व्हायरल होणाऱ्या ‘ ह्या ‘ बिलामध्ये आहे एक अशी गोष्ट जी आयुष्यभर लक्षात राहील

आपणसुद्धा भारी मशरूम खाऊन गोरे होऊ शकतो का ? : ‘ हे ‘ आहे उत्तर

मी चहा विकला पण ………. : मोदी काँग्रेसवर भडकले

एकाच घरातील सासू व सुनेवर करत होता भोंदूबाबा अत्याचार :असा झाला पर्दाफाश

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा