चोरी करण्याआधी दुकानाच्या समोर केला मिथुन स्टाईल डान्स :सीसीटीव्हीत झाले कैद

By | July 11, 2018

robbery in computer hardware shop with dance

चोर रोज करण्यासाठी नवीन नवीन शक्कल लढवत असतात म्हणजे आपली चोरी कोणाच्या लक्षात येऊ नये . अशीच एक चोरी नवी दिल्लीच्या सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यामध्ये झाली आहे .इथे चोरांनी मुद्दाम दुकानासमोर डान्स केला त्याचवेळी त्याच्या इतर साथीदारांनी तब्बल पाच दुकानांमधून मोबाईल लुटले आहेत सोबतच रोकड तसेच हार्ड डिक्स देखील लंपास केल्या आहेत. अर्थात त्यांना सीसीटीव्हीचा अंदाज असावा म्हणूनच मुद्दामच हा प्रकार केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट दिसते आहे.

मंगळवारची ही घटना असून पाच चोरट्यांनी रस्त्यावर डान्स केला. यावेळा एकजण सीसीटीव्हीच्यासमोर तोंडावर रुमाल बांधून मिथुन स्टाईलने डान्स करत होता. सीसीटीव्हीच्या फूटेजमधून असे दिसून येत होते की तो मुद्दाम डान्स करत होता. त्याचवेळी त्याच्या बाकीच्या साथीदारांनी पाठिमागे असणा-या दुकानांची शटर उघडली आणि त्या दुकांनामधून रोकड, हार्ड डिक्स, मोबाइल लंपास केले, मात्र इतर सीसीटीव्ही मध्ये हा सगळा प्रकार कैद होत होता .

चोरी लक्षात आल्यावर मालकाने सीसीटीव्ही फुटेज पाहिले, त्यावेळी हा सारा अजब प्रकार लक्षात आला. सगळ्या दुकानांमधून मिळून त्यांनी तब्बल अडीच लाख रोकड, 10-20 हार्ड डिक्स, 20-25 रॅम आणि मोबाइल लंपास केले. त्यानंतर याच गल्लीतील दुकान नं. 917, 1232 आणि 1226 चे शटर तोडून चोरी केली. ही घटना दिल्लीतील नॉव्हल्टी सिनेमाच्या पाठिमागे असलेल्या महल गल्ली घटली. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे.