रविशंकर प्रसाद यांची मार्क झुकरबर्गला धमकी : फेसबुक डेटा चोरी प्रकरण

By | March 21, 2018

facebook cleans up newsfeed with new algorithm 2018

फेसबुकच्या डेटा लीकचं वारं आता भारतापर्यंत येऊन पोहोचले आहे. ज्या सोशल मीडिया मॅनेजमेंट कंपनीने फेसबुकचा डेटा लीक केल्याचा आरोप केला जात आहे, त्या कंपनीला 2019 सालासाठी काँग्रेसने कॅम्पेनिंगसाठी निवडल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे नेटकऱ्यांकडून ट्विटरवर #DataChorCongress हॅशटॅग वापरुन काँग्रेसला ट्रोल केले जात आहे.

काँग्रेसने भारतीयांची माहिती परदेशी कंपनीला दिली असल्याचा आरोप करत, राहुल गांधींसह काँग्रेसवर निशाणा साधला जात आहे. विशेष म्हणजे, हा हॅशटॅग ऑल इंडिया ट्रेण्ड होत असल्याने त्याबद्दल सोशल मीडियावरील चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान फेसबुक व कॅम्ब्रिज अॅनॅलिटिका ह्या दोन्ही कंपन्या ह्या प्रकारामध्ये सामील असल्याचे देखील बोललं जातंय. तर माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी चक्क मार्क झुकरबर्ग यांना एक अघोषित धमकी दिलीय असे म्हटल्यास वावगे ठरू नये . आपल्या पोस्ट मध्ये रविशंकर प्रसाद म्हणतात.“मिस्टर मार्क झुकरबर्ग, भारताच्या माहिती आणि तंत्रज्ञान मंत्र्यांचं निरीक्षण काय असतं, हे तुम्हाला चांगलं ठाऊक आहे. त्यामुळे जर भारतीयांची माहिती चोरली गेली, तर ते सहन केले जाणार नाही. आमच्याकडे तंत्रज्ञानविषयक कायदे कठोर आहेत.”,

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेसला देखील कॅम्ब्रिज अॅनॅलिटिका आणि काँग्रेस पक्ष यांच्यात काय संबंध आहे, हे स्पष्ट करावे असे म्हटले आहे. किती भारतीयांची माहिती काँग्रेसने केम्ब्रिज अॅनॅलिटिकासारख्या परदेशी कंपनीला दिली आहेत?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.मात्र काँग्रेसच्या सोशल मीडिया आणि डिजिटल कम्युनिकेशन विभागाच्या प्रमुख दिव्या स्पंदना यांनी या आरोपांनी ट्विटरवरुनच उत्तर दिले आहे. त्यांनी स्वतंत्र ट्वीट करुन म्हटले आहे की, “काँग्रेस आणि केम्ब्रिज अॅनॅलिटिका यांचा संबंध असल्याच्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या आहेत.”

  • केम्ब्रिज अॅनॅलिटिका काय आहे?

केम्ब्रिज अॅनॅलिटिका ही सोशल मीडिया मॅनेजमेंट आणि डिजिटल सपोर्ट या क्षेत्रात काम करणारी कंपनी आहे. गेल्या 25 वर्षांपासून ही कंपनी कार्यरत असून, जगातील अनेक देशांमध्ये सुमारे 100 हून अधिक कॅम्पेन्स या कंपनीने केले आहेत. राजकीय निवडणुकांमध्ये एखाद्या विशिष्ट पक्षासाठी काम करत, त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचे व त्यांच्या मतामध्ये परिवर्तन करण्याचे काम कॅम्ब्रिज अॅनॅलिटिका करते.नेटकरी काय शोधतात ? काय करतात? त्यांचे मित्र व परिवार ह्या सर्वांचा अभ्यास करून त्यांची मते आपल्या बाजूला कशी वळवता येतील ? यासाठी आजवर ह्या कंपनीचा राजकीय पक्षांनी वापर केलेला आहे.

  • फेसबुक लीकचं नेमकं काय प्रकरण आहे?

2017 साली अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना मदत करणाऱ्या ‘केम्ब्रिज अॅनालिटिका’ या कंपनीने जवळपास 5 कोटी फेसबुक यूजर्सची वैयक्तिक माहिती चोरली, असा आरोप करण्यात आला होता. ही माहिती ‘ आपले व्यक्तिमत्व कसे आहे ? ‘ तुमचे लग्न कधी होणार ? असे प्रश्नवालीसाठी ऐप बनवून फेसबुकचे लॉगिन वापरून हा डेटा चोरण्यात येतो ( अर्थात हे फेसबुक करत नाही मात्र फेसबुकवर वेगवेगळे अँप बनवून इतर कंपन्या करतात ) व मग ही माहिती कंपन्या व्यावसायिक कारणासाठी वापरतात अथवा विकतात. अशाच चोरलेल्या माहितीचा निवडणुकीत वापरही केला गेला, असाही आरोप आहे. यावरुन अमेरिकेसह जगभरात आता खळबळ उडाली आहे.चौथ्या तिमाहीत अमेरिका आणि कॅनडात फेसबुक युजर्सची संख्या तब्बल एक कोटीने घटली आहे. अमेरिकन राष्ट्रपती निवडणुकीच्या काळात पाच कोटी युजर्सची माहिती फेसबुककडून लीक झाली होती. या काळात गमावलेला युजर्सचा विश्वास फेसबुकला अद्याप संपन्न करता आलेला नाही.

फेसबुक फ्रेंडच्या पहिल्या भेटीमध्ये झाले ‘ असे ‘ काही .. कल्पना पण करू शकत नाही

२०१८ पासून फेसबुक आक्रमक : ‘ हे ‘ महत्वाचे बदल नक्कीच तुम्हाला प्रभावित करतील

बंद झालेली तुमची लाडकी सोशल मीडिया वेबसाईट ‘ ह्या ‘ नावाने येणार परत

आजपासून करा सुरुवात युट्युबवर पैसे कमवायला : पूर्ण माहिती सोप्या मराठीत

ही ४१ अॅप चोरतात फोटो व्हिडिओ कॉन्टॅक्टस आणि लोकेशन्स : गृहमंत्रालयाकडून अलर्ट जारी

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा