इगतपुरी येथे रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा, उच्चभ्रू घरातील नऊ तरुणांसह काही तरुणी रंगेहाथ धरल्या

By | October 4, 2017

rave -party-racket-igatpuri-nashik-busted-by-police

इगतपुरी: मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकून काही तरुण आणि तरुणींना ताब्यात घेतलं आहे. मुंबई – आग्रा महामार्गापासून काही अंतरावर असलेल्या इगतपुरी तालुक्यातील बलायदुरी शिवारात असणा-या रेन फॉरेस्ट नामक पंचतारांकित हॉटेलात पोलिसांना छापा टाकून ही कारवाई केली.

इगतपुरी पोलिसांनी नऊ तरुण आणि काही तरुणींना ताब्यात घेतले आहे. रेव्ह पार्टी सुरु असून स्थानिक नागरिकांना त्याचा त्रास होत होता. त्यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली . छापा टाकला असता हॉटेलात राहणीमानावरून उच्चभ्रू वाटावेत असे काही तरुण आणि तरुणी मद्याच्या नशेत अर्धनग्न अवस्थेत रेव्ह पार्टी करीत असल्याचे आढळून आले.

मात्र हे तरुण आणि तरुणींची माहिती पोलीस मिळवत असून कोठून आले आहेत याबद्दल अजून ठोस अशी माहिती हाती लागलेली नाही . निर्जनस्थळी असलेल्या या हॉटेलात गेल्या काही वर्षांपासून रेव्ह पार्टीचे प्रकार सुरू होते. मात्र रात्रभर चालणाऱ्या या धांगडधिंग्याला ग्रामस्थही त्रस्त झाले होते. पोलिसांनी याबाबत कारवाई करावी अशी मागणीही यापूर्वी अनेकदा करण्यात आली होती. मात्र तिची दखल आजपर्यंत का घेतली नाही असाही एक प्रश्न आहे .

अखेर मंगळवारी या रेव्ह पार्टीची कल्पना पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी कारवाई केली.

@@पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा @@