‘ ह्या ‘ रुग्णालयात उंदीर पेशंटचा चावा घेतात : लागोपाठ २ घटना

By | October 10, 2017

rat bite people in mumbai kandivali hospital

महापालिकेच्या रुग्णालयांमधील सुधारणा होत नाही हेच खरे. मुंबई , कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात उंदरांनी हाहाकार माजवला असून उपचारासाठी गेलेल्या दोन महिला रुग्णांचा चावा घेतला आहे. एकीच्या पायाला आणि दुसरीच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाल्याने दोघींवरही उपचार सुरू आहेत.

विशेष म्हणजे ११ दिवसांच्या आत या दोन घटना घडल्या असून, पहिली घटना घडल्यानंतरही काहीच प्रतिबंधात्मक उपाय न केल्याने दुसरी घेताना घडल्याचे बोलले जाते . रुग्णांना नुकसानभरपाई मिळावी,अशी मागणी होत आहे.

शीलाबेन या ८ आॅक्टोबरला उपचारांसाठी शताब्दी रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्याच रात्री त्यांच्या डाव्या पायाचा उंदराने चावा घेतला. शीलाबेन या पायाला फ्रॅक्चर झाल्यामुळे रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. त्यांना डायबेटीस आहे. त्यातच उंदराने पायाचाच चावा घेतल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. रात्री ही घटना घडली. हा प्रकार सकाळी लक्षात आल्याने तातडीने त्यांच्या पायावर उपचार करण्यात आले. शिवाय, आणखी काही दिवस त्यांना रुग्णालयातच उपचार घ्यावे लागतील अशीमाहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली.

दुसरी घटना ३० सप्टेंबरलाच घडली होती . प्रमिला नेरुरकर ही महिला २९ सप्टेंबरला शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती. दुसºयाच दिवशी त्यांच्या डाव्या डोळ्याचा उंदराने चावा घेतला. कदाचित याच वेळी काही प्रतिबंधात्मक उपाय केले असते तर दुसरी घटना टाळता आली असती.

महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांची होत असलेली हेळसांड कायमचीच आहे. त्यात इतका निष्काळजीपणा समोर आल्याने आता महापालिका काय पावले उचलते, हे बघणे महत्वाचे आहे.

? पोस्ट आवडली तर लाईक करा .. शेअर करा ?