रामदास आठवलेच यापुढे पॉवरफुल राहण्याची शक्यता : ‘ ही ‘आहेत कारणे

By | January 5, 2018

ramdas athawale will be more powerful in future

कोरेगाव भीमाच्या दुर्दैवी घटनेनंतर पुकारलेल्या बंदला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता प्रकाश आंबेडकरांच्या रूपाने एक दलित चळवळीत परिवर्तन होत आहे का ? प्रकाश आंबेडकर यांच्या रूपाने दलीत चळवळीमध्ये नव्या नेतृत्वाचा उदय होतोय का ? अशा स्वरूपाच्या चर्चेला ऊत आला आहे . मीडियाच्या ह्या चर्चेत म्हणावा असा दम नाही. वरकरणी जरी अशा स्वरूपाचे चित्र उभे केले जात असले, तरी प्रकाश आंबेडकर हे याआधी देखील राजकीय क्षेत्रात कार्यरत होतेच. त्यामुळे नवीन नेतृत्व असे काही नाही.

राज्यातील दलित चळवळीत सध्या रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकर या दोनच नेत्यांची जास्त ताकद आहे. हे दोन्ही नेते परस्परांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत असतात. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप या पक्षांशी वेळोवेळी मैत्री केलेले रामदास आठवले हे सध्या भाजपच्या बरोबर असून, केंद्रात भाजपमुळे त्यांना राज्यमंत्रिपद मिळाले आहे. रामदास आठवले हे केंद्रीय राज्यमंत्री असल्याने त्यांच्यावर आता मर्यादा आल्या आहेत. ही संधी साधत प्रकाश आंबेडकर यांनी आठवले यांना शह दिला. आज मीडियामध्ये प्रकाश आंबेडकर याची चर्चा असली तरी हिंसेला महाराष्ट्र फार काळ दाद देत नाही,हा इतिहास आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे, रामदास आठवले यांचा जनसंपर्क प्रकाश आंबेडकर यांच्यापेक्षा जास्त आहे . रामदास आठवले लोकांमध्ये जितके मिसळतात व त्यांचे प्रश्न समजावून घेतात तितकासा वेळ प्रकाश आंबेडकर देत नाहीत, असे देखील कार्यकर्त्यांकडून उघडपणे बोलले जाते .अर्थात वेळ देणे आणि प्रश्न सोडवणे याचा फारसा संबंध नसला तरी लोक ह्या गोष्टीचा देखील विचार करतात . दरम्यान , ६ जानेवारीला रामदास आठवलेंच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची बैठक आयोजित करण्यात आलीय. प्रकाश आंबेडकर यांची राजकीय ताकद वाढल्याची कुजबूज सुरु झालेय. त्यामुळे आठवले गटाने यावर विचारविनिमय करण्यासाठी ही बैठक आयोजित केल्याचे बोलले जात आहे.

आम्ही सुरूवातीपासून अत्याचारग्रस्तांच्या बाजूनं आहोत. त्यामुळं याचा फटका आमच्या पक्षाला बसणार नाही, असं आठवले गटाचे ज्येष्ठ नेते अविनाश महातेकर म्हणाले असले तरी कुठेतरी आठवले गटाला प्रकाश आंबडेकर यांच्याकडून शह देण्याचा प्रयत्न झालाय म्हणून ही बैठक आयोजित केली असल्याची शक्यता आहे.

  • आठवलेंच्या ह्या प्रश्नांना प्रकाश आंबेडकर काय उत्तर देणार ?

ज्या देशाचे संविधान बाबासाहेबांनी लिहले त्याच देशाचे तुकडे होवोत, अशांच्या साथीला प्रकाश आंबेडकर (संबंधित वक्त्यांचा इतिहास माहित असताना देखील ) बसलेले जनतेला पाहायला मिळाले.ह्या एल्गार परिषदेमध्ये नक्षलवाद्यांशी संबंधित असे काही नेते उपस्थित होते. बंदच्या काळात फक्त एस.टी. चे २० कोटीचे नुकसान झाले तसेच २१७ एस .टी. बसेस फोडण्यात आल्या. अहिंसेची बाबासाहेबांची शिकवण मोडीत काढली गेली. काही प्रमाणात तरुण वर्ग सोडल्यास जुन्या जाणत्या आंबेडकरी कार्यकर्त्यांकडून आज देखील ह्या गोष्टीचे समर्थन केले जात नाही . या सर्व गोष्टींचे आठवले गटाकडून भांडवल केले गेल्यास प्रकाश आंबेडकर यास कसे उत्तर देणार हे देखील पाहावे लागेल. शिवाय आठवले सत्तेत असल्याने जास्त प्रमाणात जनतेचे प्रश्न सोडवू शकतात त्यामुळे आज जरी आठवले काहीसे बॅकफूटवर गेल्याचे चित्र उभे केले जात असले तरी कालानुरूप लोक आठवले यांचेच नेतृत्व मान्य करण्याची जास्त शक्यता आहे.

कोरेगाव भीमाच्या हिंसाचारामागील अदृश्य हात कुणाचे ? : तपास यंत्रणांचा काय अंदाज

लेख नक्की वाचा : जिग्नेश मेवाणी उमर खालेद आताच डोके का वर काढताहेत ?

अखेर मुख्यमंत्र्यांनी कोरेगाव भीमा प्रकरणावर नाव न घेता केला ‘ ह्यांचे ‘ कडे इशारा

२०० वर्षांपूर्वी कोरेगाव भीमाला झाले काय होते ? : वाद का तयार झाला

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा