गुरमीत बाबा आणि हनिप्रीतच्या पापांचा पर्दाफाश करणारी ‘ ही ‘ वस्तू पोलिसांच्या ताब्यात

By | October 13, 2017

honeypreet breaks silence on panchkula violence

बाबा राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीतची जिल्हा न्यायालयाकडून सुखदीप कौर सोबतच 23 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे . हनीप्रीत पोलीस कोठडीमध्ये असताना पोलिसांना तपासकार्यात मदत करत नसल्याचे देखील समोर आलेले आहे .

यापुढे हनीप्रीत आणि सुखदीप अंबाला कारागृहात बंद असणार आहे. हनीप्रीतकडून एक मोबाइल फोन जप्त करण्यात आला आहे. मात्र पोलिसांना कोणताही लॅपटॉप मिळाल्याचे वृत्त पोलिसांनी फेटाळून लावले. हनीप्रीतला याआधी पोलीस कोठडीत होती. मात्र चौकशीदरम्यान हनीप्रीतने पोलिसांना कोणतंही सहाकार्य केलं नाही. पोलीस मात्र हनीप्रीतच्या मोबाइलचा कसून शोध घेत होते. अखेर हनीप्रीतचा मोबाईल मिळाला असून तो पोलिसांच्या ताब्यात आहेत . हनीप्रीतच्या मोबाइलमुळे डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीमचे बरेचसे सिक्रेट ओपन होणार आहेत तसेच डेरा मध्ये किती लोकांना पोहचवले याचा देखील पर्दाफाश होणार आहे .

आम्ही आपल्याला सांगू इच्छितो कि, राम रहीमला बलात्कार प्रकरणी शिक्षा सुनावल्यानंतर हनीप्रीत फरार झाली होती. यानंतर पोलिसांनी शोध घेत तब्बल 38 दिवसांनी हनीप्रीतला अटक केली.पोलिसांनी नेपाळपर्यंत हनीप्रीतचा शोध घेतला होता ,मात्र अखेर पंजाबमधून हनीप्रीतला अटक करण्यात आली . अटक केल्यानंतर दुस-या दिवशी तिला न्यायालयात हजर करण्यात आलं. हनीप्रीतवर पंचुकलामध्ये हिंसा भडकावणे याशिवाय अन्य आरोप ठेवण्यात आले आहेत. त्यापैकी हनीप्रीतने पंचकुला हिंसा भडकावण्यामध्ये आपला सहभाग मान्य केला आहे .

दरम्यान पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर हनीप्रीत हिला आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयाने हनिप्रीत आणि तिची साथीदार सुखदीप कौर हिला 23 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. ती हरियाणा पोलिसांच्या ताब्यात आहे. हनीप्रीत बाबा गुरमीत राम रहीमची दत्तक मुलगी आहे. गुरमीत बाबा राम रहीम २ साध्वींवरील बलात्कार प्रकरणात २० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे.

मात्र मी आणि राम रहीम पूर्णपणे निर्दोष असल्याचा हनीप्रीतचा दावा आहे . वडिलांबरोबर आपल नातं पवित्र असल्याचं हनीप्रीतने या मुलाखतीत सांगितलं. मात्र हनीप्रीतचा पूर्वपती विश्वास गुप्ताने हनीप्रीतचे राम रहीमबरोबर अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला होता. त्याने राम रहीम आणि हनीप्रीतला एकत्र नेकेड, सेक्स करताना बघितले होते असे विश्वास गुप्ताने पत्रकारांना सांगितले होते.

25 ऑगस्टला पंचकुला न्यायालयाने राम रहीमला साध्वींवरील बलात्कार प्रकरणात दोषी ठरवले. त्यानंतर हरियाणा, पंजाब आणि दिल्लीमध्ये जोरदार हिंसाचार झाला. ह्या सर्व हिंसाचारात मोठी भूमिका बजावून पुढे हनीप्रीत गायब झाली. मागच्या आठवडयात दिल्ली उच्च न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळून लावला होता.

हनिप्रीत फरार असताना एका कॉंग्रेस नेत्याने हनिप्रीतला मदत केल्याचे बोलले जाते . हनिप्रीतचा मोबाईल अजून काय नवीन सिक्रेट ओपन करणार हे बघणे गरजेचे आहे

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?

--Ads--

Leave a Reply