कर्नाटक सत्तास्थापनेत नवीन ट्विस्ट..हा ‘ राम ‘ देऊ शकतो काँग्रेसला सत्तेची चावी : उद्याची मोठी बातमी

By | May 17, 2018

ram jethmalani supporting congress to form goverment in karnataka

काँग्रेस आणि जेडीएसकडे जास्त संख्याबळ असतानाही, कर्नाटकात राज्यपालांनी भाजपाला सत्तास्थापनेसाठी आमंत्रित केल्यानं विरोधक चांगलेच खवळलेत. ते भाजपावर कडाडून टीका करताहेत. पण, त्यांना सत्तेपासून रोखण्यासाठी काय करायचं, कायद्याच्या कचाट्यात कसं पकडायचं, याचा विचार कॉंग्रेस करत आहे. मात्र ह्या संकटसमयी त्यांच्या मदतीला ‘राम’ धावून आला आहे. देशातील सर्वात यशस्वी वकील राम जेठमलानी यांनी, कर्नाटकात जे घडलं त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.राम जेठमलानी हे भाजपचेच राहिलेले असून त्यांनी मोदी सरकार आणि भाजपाला देखील खडे बोल सुनावले आहेत . काळ्या पैशाबाबत मोदी सरकार प्रामाणिक नाही असे देखील त्यांनी ठणकावले होते. मोदी यांच्या हुकुमशाहीपासून मुक्ती मिळावी, हेच आपले आयुष्याचे ध्येय असल्याचे देखील राम जेठमलानी म्हटलेले आहेत.

लोकशाहीला आणि जनमताला ठेंगा दाखवत कर्नाटकच्या राज्यपालांनी राजधर्म निभावलेला आहे. असाच राजधर्म गोवा व मणिपूर इथे देखील भाजप पुरस्कृत राज्यपालांनी निभावलेला आहे. राम जेठमलानी हे देखील भाजपाशीच जोडलेले आहेत त्यामुळे ते कितपत न्याय देणार हे पाहावे लागले. राज्यपालांपासून सुप्रीम कोर्टापर्यंत आपल्या विचारसरणीच्या माणसांची अशी भरती करून भाजपने लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम कधीच सुरु केले आहे .

राज्यपालांना घटनेनं दिलेल्या अधिकारांचा कर्नाटकात दुरुपयोग केला गेला आहे. भाजपाने राज्यपालांना असं काय सांगितलं की त्यांनी बहुमत नसतानाही त्यांना सत्तास्थापनेचं आमंत्रण दिलं, याचा खुलासा राज्यपालांनी करावा, अशी विचारणा करत राम जेठमलानी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती ए एम खानविलकर आणि न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी त्यांच्या मुद्द्यांवर विचारविनिमय केला. उद्या, १८ मे रोजी न्यायमूर्ती ए के सिकरी यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठापुढे काँग्रेसच्या याचिकेवर पुढील सुनावणी होणार आहे. त्यावेळी आपलं म्हणणं मांडण्याची परवानगी जेठमलानी यांना देण्यात आली आहे. हा काँग्रेससाठी मोठा आधार ठरण्याची चिन्हे आहेत.

कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला यांनी आज भाजपाच्या बीएस येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. वास्तविक, भाजपाकडे बहुमत नसताना आणि आपल्याकडे आवश्यक संख्याबळ असताना येडियुरप्पा मुख्यमंत्री होऊच कसे शकतात, असा आक्षेप काँग्रेस-जेडीएसनं घेतला होता. त्याबाबत त्यांनी सर्वोच्च न्यायालयातही दाद मागितली होती. त्यांच्या याचिकेवर, न्या. सिकरी, न्या. एस ए बोबडे आणि न्या. अशोक भूषण या विशेष खंडपीठाने आज पहाटे सुनावणी केली. येडियुरप्पा यांच्या शपथविधीला स्थगिती देता येणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आता याबाबतची सविस्तर सुनावणी उद्या होणार आहे. त्यावेळी काँग्रेसचीच भूमिका जेठमलानीही मांडतील. कायद्यातील बारीक तरतुदीही त्यांना तोंडपाठ असल्यानं काँग्रेसला त्याचा फायदा होणार आहे. काँग्रेसच्या वकिलांच्या आणि जेठमलानींच्या युक्तिवादानंतर खंडपीठ काय निकाल देतं, हे पाहावं लागेल.

मात्र सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेली संख्या गाठण्यासाठी भाजपाचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. राज्यपालांनी त्यांना तब्बल १५ दिवसांची मुदत दिली आहे.राज्यपालांकडून तब्बल १५ दिवसांच्या मुदतीवर देखील काँग्रेसने आक्षेप घेतलेला आहे . १५ दिवस हा बहुमत सिद्ध करण्यासाठी मोठा कालावधी असून त्यामुळे घोडेबाजारला ऊत येईल असे काँग्रेसचे म्हणणे होते मात्र त्यांचे म्हणणे धुडकावून लावण्यात आले. त्यामुळे कर्नाटकपासून दिल्लीपर्यंतचे नेते याच ‘मिशन’वर काम करताहेत. दुसरीकडे, आपले आमदार फुटणार नाहीत, यासाठी काँग्रेस आणि जेडीएसनं रिसॉर्ट गाठली आहेत.

राज्यपालांचा ‘ असा ‘ राजधर्म, येडियुरप्पा यांचा उद्या शपथविधी मात्र ? : कर्नाटक विधानसभा निवडणूक

तसं नाही तर ‘ असं ‘ ..सत्तेसाठी हपापलेल्या भाजपचा मास्टरप्लॅन : कर्नाटक विधानसभा निवडणूक

कर्नाटकच्या निकालावर राज ठाकरे काय म्हणाले ? : भाजपच घोड अडलय ‘ इतक्या ‘ सीटवर

भाजपाकडून एकही मुस्लिम उमेदवार नसताना मुस्लिम समाजाचे मतदान कोणाला ? : कर्नाटक विधानसभा निवडणूक

कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता स्थापनेकडे वाटचाल : काय आहे सध्याची ताजी परिस्थिती ?

मोदी यांच्या फेकूपणाचे नाव काय ? : दैनिक लोकमतमधून मोदी यांचे अज्ञान केले उघडे

कर्नाटकमध्ये भाजपला मिळतील ‘ इतक्या ‘ जागा : अमित शाह यांचा विश्वास

काँग्रेसच्या इंदिरा कॅन्टीनमध्ये ताव मारुन भाजपा कार्यकर्त्यांचा प्रचार : ६० वर्षे काय केले ?

लोकनिती-सीएसडीएस एबीपी न्यूजच्या एक्सिट पोलनुसार ‘ हा ‘ पक्ष सत्तेचा दावेदार ? : कर्नाटक विधानसभा निवडणूक

भाजपचा चोरटा नगरसेवक सीसीटीव्ही मध्ये झाला कैद : कुठे घडली ही घटना ?

बळीराजाच्या डोक्यावर पाय ठेवण्याची परंपरा भाजपने राखली : लाज वाटावी ‘ असे ‘ उचलले पाऊल ?

काँग्रेसने कुत्र्यांकडून देशभक्ती शिकावी , पंतप्रधान मोदी यांची भाषा घसरली

आणि भाजपाने शहीद म्हणून गौरवलेला ‘ तो ‘कार्यकर्ता चक्क जिवंत : काय आहे बातमी ?

स्टार प्रचारक आणि संस्कारी शोकांतिका : मुकेश माचकर यांचा अप्रतिम लेख

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा