सुपरस्टार रजनीकांत यांचा पक्ष आम्हाला पाठिंबा देईल : ‘ ह्या ‘ नेत्याचा दावा

By | January 1, 2018

rajnikant will support us says bjp in tamilnadu

सुपरस्टार रजनीकांत यांनी स्वत:चा राजकीय पक्ष काढण्याची फक्त घोषणाच केली मात्र पूर्ण तामिळनाडूमधील राजकारण ह्या घोषणेने ढवळून निघाले. रजनीकांत यांनी 2021 मध्ये होणार्‍या तमिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीत सर्व 234 जागा लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र २०१९ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकांबद्दल नंतर निर्णय घेण्यात येईल असे समजते.

रजनीकांत हे तामिळनाडूच्या राजकारणामध्ये हुकुमी एक्का मानले जातात . रजनीकांत यांचा ज्या पक्षाला पाठिंबा तो पक्ष मोठ्या प्रमाणात यश मिळवू शकतो याची तेथील राजकारण्यांना चांगली कल्पना आहे. त्यामुळे रजनीकांत नावाचे वादळ आपल्या पक्षात येऊन स्थिरावे म्हणून सगळ्या पक्षांच्या वतीने जोरदार प्रयत्न सुरु आहेत. अर्थात , रजनीकांत यांनी स्वतःचा पक्ष काढला असला तरी त्यांचा विरोध देखील परवडण्याजोगे नाही अशी बहुतांश राजकारण्याची भूमिका आहे. जयललिता यांच्या मृत्यूनंतर तामिळनाडूच्या राजकारणामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ही भरून काढायचे काम आपला पक्ष पूर्ण करेल , तामिळनाडूच्या जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही असे रजनीकांत यांनी म्हटले आहे .

महाराष्ट्रामध्ये सेलेब्रिटी आणि राजकारण यांचा राजकारणावर फार प्रभाव पडत नाही मात्र दक्षिणेकडील राज्यामध्ये सेलेब्रिटी राजकारणात येतात आणि प्रचंड यशस्वी देखील होतात . जयललिता ह्या देखील आधी चित्रपटातच काम करायच्या, पुढे त्या राजकारणामध्ये आल्या आणि अभूतपूर्व अशी ओळख त्यांनी स्वतःची तयार केली. रजनीकांत यांची क्रेझ आज जयललिता यांच्यापेक्षा कमी नाहीये., त्यामुळे ‘हुकुमाचा इक्का असलेल्या रजनीकांत यांचा फायदा आपल्या पक्षाला कसा होईल यावर तेथील राजकारण आधारलेले आहे. अर्थात, काळ बदलला असून सेलेब्रिटीला लोक यापुढे कितपत स्वीकारतात हे देखील पाहावे लागेल.

तमिळनाडूचे भाजपाध्यक्ष तमिलिसै सौदरराजन यांनी ट्वीट करून दावा केला की, ‘तमिळनाडूमध्ये 2021 मध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकीत रजनीकांत आपले उमेदवार उभे करणार आहे. परंतु त्याआधी म्हणजे 2019 मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकीत ते नरेंद्र मोदींना पाठिंबा देतील. भाजपसोबत युती करतील.रजनीकांत हे भाजपचे नॅचरल पॉलिटिकल पार्टनर आहेत. सार्वत्रिक निवडणुकीत रजनीकांत हे भाजपला पूर्ण पाठिंबा देतील.

मात्र रजनीकांत यांच्याकडून याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र रजनीकांत यांचा इतिहास पहिला तर त्यांचे नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याशी पूर्वीपासूनच चांगले संबंध राहिलेले आहेत. त्यामुळे रजनीकांत यांनी जर भाजपला पाठिंबा दिला तर कमल हसन व प्रकाश राज हे रजनीकांत यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतील, कारण कमल हसन व प्रकाश राज हे सध्या भाजप सरकार व मोदींच्या विरोधात सतत टीका करत असल्याने चर्चेत आहेत.

रजनीकांत यांच्या म्हणण्यानुसार , मी राजकारणात पैसा वा प्रतिष्ठेसाठी आलेलो नाही. आज लोकशाही आडून राजकीय पक्ष जनतेची लूट करत आहेत. तामिळनाडूतील परिस्थिती तर फार वाईट आहे. अशा वेळी मी काही करू शकलो नाही तर काय उपयोग? ही राजकीय व्यवस्थाच बदलायची आहे. जाती-धर्मापासून मुक्त राजकारणाची आज गरज आहे…

अखेर ट्रिपल तलाक होणार हद्दपार :ओवेसी यांना मिळाली लाजिरवाणी मते

एकाच घरातील सासू व सुनेवर करत होता भोंदूबाबा अत्याचार :असा झाला पर्दाफाश

सेल्फी स्टीकच्या मदतीने शेजाऱ्याचे खाजगी क्षण रेकॉर्ड करून करत होता ब्लैकमेल : महाराष्ट्रातील घटना

केरळमधील लव्ह जिहादचे वारे पुणे नगरमध्ये : विकृत प्रेमवीरास पुणेमध्ये धरले

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?