ईव्हीएममशीन हा भाजपचा सत्तेत जाण्याचा रस्ता : राज ठाकरे यांचे नवीन व्यंगचित्र

By | December 4, 2017

raj thakare new cartoon on bjp for electronic polls

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपल्या व्यंगचित्राने भाजपवर निशाणा साधला आहे. ईव्हीएममशीन हा भाजपचा सत्तेत जाण्याचा रस्ता असल्याची टीका राज ठाकरे यांनी व्यंग चित्राच्या माध्यमातून केली आहे. नुकत्याच उत्तर प्रदेश मधील महापालिका निवडणुकांमध्ये भाजप मोठ्या प्रमाणावर यश मिळाले होते. हे यश ईव्हीएम मशीनचीच करामत असल्याची टीका याआधी मायावती यांनी देखील केली होती आणि उत्तर प्रदेश मधील समाजवादी पक्षाने खऱ्या अर्थाने ही निवडणूक लढलीच नाही असे म्हटले तरी चालेल कारण जाणीवपूर्वक कमजोर उमेदवार समाजवादी पक्षाने उभे केले होते.

राज ठाकरे यांनी दिवाळीच्या वेळी देखील असेच एक कार्टून काढले होते त्यात ,लक्ष्मीच मोदी व अमित शाह यांना पैसे मागते आहे अशा आशयाचे ते कार्टून होते. आता ह्या कार्टून मधून भाजपचा सत्तेचा मार्ग हा ईव्हीएममशीनच्या माध्यमातून आहे असे राज ठाकरे यांना सुचवायचे आहे. ह्या व्यंगचित्राच्या बाजूला यूपी पालिका निवडणुकीत मतदार याद्यांत आणि ईव्हीएममध्ये घोळ झाल्याची बातमी देण्यात आली आहे. या बातमीचा संदर्भ हा व्यंगचित्रासाठी देण्यात आला आहे. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे.

मतदारांची मतदान यांद्यामधून नावे उडवणे, तसेच ईव्हीएममध्ये गडबड झाल्याची कबुली देताना राज्याचे निवडणूक आयुक्त एस के अग्रवाल यांच्या संतापाचा भडका पत्रकार परिषदेत उडाल्याचा, संदर्भ बातमीत देण्यात आलेला आहे.तसेच उत्तर प्रदेशातील पालिका निवडणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

एकंदरीत भाजपने उत्तरप्रदेशात पालिका निवडणुकीत बहुमताने जिंकलेल्या जागा, या ईव्हीएममशीनच्या मदतीने भाजपचा सत्तेत जाण्याचा रस्ता उघडतात, अशी टीका राज ठाकरे यांनी या व्यंगचित्राच्या माध्यमातून केली आहे.हे व्यंगचित्र अपलोड केल्यानंतर ह्या चित्राला १८ तासामध्ये २०००० पेक्षा जास्त लाईक व २२०० पेक्षा जास्त लोकांनी हे शेअर केले आहे. अर्थात काही जणांनी राज ठाकरे यांना आधी स्वत:च्या एरीयामधून मनसेचा उमेदवार निवडून आणा आणि मग बोला तर काही जणांनी याआधी तुमचे १३ आमदार असेच निवडून आले होते का ? तेव्हा घोटाळा वाटला नाही का ? असेही म्हटले आहे तर काही जणांनी हरले कि सगळे पक्ष ईव्हीएम वर खापर फोडतात असे देखील म्हटले आहे. तर एकजनाने काही महीन्यांपुर्वी निवडणूक आयोगाने सर्व पार्ट्यांना ईवीएम हँकींग साठी बोलावलं होत…पण कुणीही तिथं गेलं नाही.आणि आता ईवीएम च्या नावाने का गळे काढता असाही प्रश्न विचारला आहे.

जेव्हा लक्ष्मी अमित शाह व मोदी यांना पैसे मागते ?: राज ठाकरे यांचे व्यंगचित्र

राज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा, हिम्मत असेल तर भायखळ्यामधे तोडफोड करून दाखवा

अखेर ‘ तो ‘ हल्ला मनसेकडूनच : इट का जवाब पथ्थर से मिलेगा

मनसेचे सुशांत माळवदे यांच्यानंतर दुसरा हल्ला ” यांच्यावर ” : मराठी पाट्यासाठी देत होते निवेदन

धक्कादायक: सत्ताधारी तसेच पालिका अधिकारी आणि झिरो नंबरची समांतर हफ्तेवसुली यंत्रणा

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?