माझ्या तडाख्यातून सुटलो असे कोणाला वाटत असेल तर चूक : राज ठाकरे याचा हल्लाबोल

By | January 10, 2018

nigude grampanchayat manse win in kokan

राज ठाकरे हे आपल्या मुलाचा साखरपुडा झाल्यापासून कोरेगाव भीमा प्रकरणावर किंवा हिमाचल , गुजरात निकालावर जास्त सक्रिय दिसत नव्हते..त्याच दरम्यान मुंबईसह राज्यात ब-याच घटना घडल्या. मोजोस पबसह कोरेगाव भीमाची दुर्घटनाने संपूर्ण राज्य हादरले. मात्र, राज ठाकरे शांत होते.डिसेंबर महिन्यात त्यांनी थोडा ब्रेक घेतला होता मात्र, आता पुन्हा एकदा राज ठाकरे आपल्या व्यंगचित्रांच्या आणि भाषणाच्या माध्यमातून हल्लाबोल करण्याच्या तयारीत आहेत.

काही गोष्टी मी पाहत होतो, समजून घेत होतो. यातील बारकावे लक्षात घेत होतो. त्यामुळे माझा बॅकलॉग वाढलाय हे खरं आहे पण लवकरच हा बॅकलॉग भरून काढणार आहे असे राज यांनी म्हटले आहे. आता अधिक काही बोलत नाही. लवकरच व्यंगचित्रांची मालिका पुन्हा सुरु होईल. तुम्हाला आवडेल नक्की. ज्यांना त्रास व्हायचाय त्यांना होईल. बाकी सर्वांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा,. गेल्या 20 दिवसात बरंच काही घडलं आहे. माझ्या व्यंगचित्रांचा बॅकलॉग (अनुशेष) वाढला आहे. पण मी अनुशेष ठेवणा-यातला मी नाही. लवकरच तो बॅकलॉग भरून काढणार आहे. माझ्या तडाख्यातून सुटलो असे कोणाला वाटत असेल तर चूक, व्यंगचित्रातून तडाखे बसणारच अशा इशारा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दिला आहे.

लवकरच राज्यात आणि देशात झालेल्या घटनांवर राज व्यंगचित्रांच्या माध्यमातून बोलतील अशी आशा आहे. कोरेगाव-भीमा येथे झालेला हिंसाचार, त्यानंतर पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंद, त्यावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया यावर राज आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून हल्लाबोल करण्याची शक्यता आहे. घरगुती कार्यक्रम असल्यामुळे राज ठाकरे मीडियापासून काहीसे दूर होते . कोरेगाव भीमाची दुर्दैवी घटना , त्यांनतर राज्यात उसळलेला हिंसाचार, तसेच गुजरात व हिमाचल प्रदेश मधील निवडणूक यावर राज ठाकरे लवकरच बोलण्याची अपेक्षा आहे.

 संबधित बातम्या :

वारीस पठाण मूर्ख माणूस .. लॉटरी लागून आमदार झालाय : मनसेचा पलटवार

अखेर ‘ तो ‘ हल्ला मनसेकडूनच : इट का जवाब पथ्थर से मिलेगा

मनसेचे सुशांत माळवदे यांच्यानंतर दुसरा हल्ला ” यांच्यावर ” : मराठी पाट्यासाठी देत होते निवेदन

काय म्हणतात राज ठाकरे ? (पोस्ट सुरु ) 

सस्नेह जय महाराष्ट्र.

बरेच दिवस आपली भेट नाही, व्यंगचित्रांतून पण आपल्याशी बोलणं झालं नाही. गेल्या वीस दिवसांत इतकं काही घडलंय की व्यंगचित्रांचा बॅकलॉग (अनुशेष) जरा जास्तच वाढलाय हे मलाही मान्य आहे.

पण कोणत्याही सत्ताधाऱ्यांसारखा अनुशेष तसाच ठेवणाऱ्यातला मी नाही.

मी गोष्टी पाहत होतो, त्यातले बारकावे समजून घेत होतो. आता व्यंगचित्रांचा हा बॅकलॉग भरुन काढणार आहे.
यांच्या तडाख्यातून सुटलो असं कोणाला वाटलं असेल तर तसं काही समजून घेऊ नका. ज्यांना व्यंगचित्रातून तडाखे द्यायचेत त्यांना ते देणारच.

आता अधिक काही बोलत नाही. लवकरच व्यंगचित्रांची मालिका पुन्हा सुरु होईल. तुम्हाला आवडेल नक्की. ज्यांना त्रास व्हायचाय त्यांना होईल.

बाकी सर्वांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा.

आपला नम्र

राज ठाकरे.

(पोस्ट समाप्त )

धक्कादायक: सत्ताधारी तसेच पालिका अधिकारी आणि झिरो नंबरची समांतर हफ्तेवसुली यंत्रणा

फेरीवाल्यांविरोधात मनसेचे आंदोलन आता पुण्यातही : रस्त्यावर फेकून दिला परप्रांतीयांचा माल

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा