राष्ट्रपतींची भेट घेऊन एक खून माफ करण्याची विनंती करणार : राज ठाकरे

By | November 11, 2017

Raj-Thackeray-says he will ask president to forgive me from killing the person who put camera in mobile

६ नगरसेवक शिवसेनेने पळवले, सर्वच निवडणुकीमध्ये म्हणावे असे कोणतेही यश पदरात पडले नाही. जवळचे बहुतांश सवंगडी पक्ष बदलून दुसऱ्या पक्षात गेले. मात्र अजूनही मनसेचे नेतृत्व राज ठाकरे यांच्या विचारांमधील नकारात्मकता आहे तशीच आहे . कायम वादग्रस्त व द्वेषपूर्ण अशा भाषणांमध्ये आता आणखी एका वाक्याची भार पडली आहे , ती म्हणजे राष्ट्रपतींची भेट घेऊन एक खून माफ करण्याची विनंती करणार.

हल्ली प्रत्येक तरुणांच्या हाती मोबाईल आल्यामुळे काही चांगले परिणाम आहेत तर काही दुष्परिणाम देखील दिसू लागले आहेत . पण यातील चांगल्या गोष्टी कायम डोळेझाकच करायची मनसेला बहुदा सवय झाली असावी. सध्याची तरुणाई ही सेल्फी प्रेमी असल्याने याचा राज ठाकरे यांना देखील काही प्रमाणात नाशिक दौऱ्यात त्रास झाला. भेटायला आलेले लोक मुद्द्याचं बोलण्याऐवजी मोबाईल कॅमेऱ्यातून सेल्फी काढत राहतात असे राज ठाकरे यांचे म्हणणे आहे , आणि याबद्दल मी राष्ट्रपतींची भेट घेणार आहे आणि मला एक खून माफ करा अशी विनंती करणार आहे असे राज ठाकरे पुढे म्हणाले. कायम मारहाण , हाणामारी आणि प्रत्येक पुढाऱ्यांची टिंगल करणारे राज ठाकरे खुनाची भाषा बोलू लागल्याने कार्यकर्ते देखील चकित झाले.

राज ठाकरे सध्या नाशिकमधील मनसे कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. त्यांनी मोबाईल आणि सोशल मीडियाच्या वाढत्या दुष्परिणामांची कार्यकर्त्यांना जाणीव करुन दिली. ‘मी बाहेर निघताना कोणीही फोटो काढायला आणि सेल्फी घ्यायला येऊ नका, अशी ताकीद त्यांनी कार्यकर्त्यांना दिली. मोबाईल कॅमेरा ज्याने बनवला त्याचा हा खून असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. राज यांच्या वक्तव्यानंतर सभागृहात हशा पिकला.राज ठाकरे हे गमतीत बोलले असले, तरी कार्यकर्त्यांना योग्य तो संदेश गेला आणि त्यांनी मोबाईल खिशात ठेवले.

अर्थात राज ठाकरे यांचे हे वैयक्तिक मत असू शकेल, मात्र टेक्नॉलॉजी ला कोणी थांबवू शकत नाही आणि नवीन शोध लागतात त्याला विरोध करणारे आपण कोण ? अर्थात मोबाईल कॅमेरा मुळे तितकी महत्वाचे क्षण आपण योग्य वेळेला टिपू शकतो. महाराष्ट्रातील रस्त्यावरील खड्ड्यांचे फोटो हे राष्ट्रवादीचे कॅम्पेन देखील जर मोबाईल ला कॅमेरा नसता तर कसे सुरु झाले असते ?. पाणीपुरी वाल्याचा तो वादग्रस्त व्हिडीओ , ज्याच्या पुराव्यावरून मनसे कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केली. जर मोबाईलला कॅमेरा नसता तर हे शक्य झाले असते का? हा देखील एक प्रश्न आहे.

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?