शिवसेनेच्या ‘ ह्या ‘ आमदारावर जैविक वडील असल्याचा आरोप : डीएनए टेस्टसाठी कोर्टात धाव

By | November 7, 2017

raj korde blames shivsena leader prakash surve as biological father of him

यापूर्वी काँग्रेसचे नेते नारायण दत्त तिवारी यांच्यावर रोहित शेखर ह्या व्यक्तीने नारायण दत्त तिवारी हेच आपले जैविक वडील असल्याचा दावा केला होता . हे प्रकरण भयानक गाजले होते. नारायण दत्त तिवारी यांचे आयुष्य हे तसेही वादातच राहिले आहे .तिवारी यांची अशीच एक सी.डी. चे सेक्स स्कँडल देखील वादग्रस्तच होते. तिवारी यांच्या केससी साधर्म्य दाखवणारा एक प्रकार महाराष्ट्रात देखील उघडकीला आलाय. अर्थात त्याची शहानिशा झाल्यावरच खरे सत्य समोर येईल.

मुंबईतील शिवसेनेचे मागाठाणे विधानसभेचे आमदार प्रकाश सुर्वे हेच माझे जैविक बाबा असल्याचा आरोप राज कोरडे ह्या युवकाने करून पूर्ण मुंबईतल्या राजकीय वर्तुळात हडकंप उडवून दिला आहे . राज कोरडे यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उच्च न्यायालयात प्रकाश सुर्वे यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे तसेच सुर्वे यांच्या डीएनए टेस्टची मागणीही केली आहे.अशा स्वरूपाचे वृत्त दैनिक लोकमत मध्ये प्रकाशित झाले आहे.

राजची आई आणि सुर्वे यांच्या कथित पत्नी उज्ज्वला म्हणाल्या की, १९८९ साली सुर्वे यांनी वज्रेश्वरी येथे लग्न केले. मात्र, दुसऱ्या ठिकाणी लग्न ठरल्यावर त्यांनी माझी व मुलाची जबाबदारी नाकारली. मुलगा लहान असल्याने त्यावेळी माझा एकटीचा विरोध तोकडा पडला. मात्र, आता तो मोठा झाला असून, त्याच्या हक्कासाठी मी पुढे आले आहे. मला सुर्वे यांची मालमत्ता नको असून, केवळ त्यांचे नाव मुलाला द्या. अशी मागणी उज्ज्वला यांनी केली , तर राज कोरडे यांनी सुर्वे यांच्या साथीदाराने मला बंदूक दाखवून धमकावले असून, डीएनए टेस्टसाठी आपले बळजबरीने रक्त काढल्याचा आरोप केला आहे म्हणूनच उच्च न्यायालयात धाव घेत सुरक्षेसह सुर्वे यांच्या डीएनए टेस्टची देखील मागणी मी केली आहे. असे राज कोरडे यांचे म्हणणे आहे.

मात्र सुर्वे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या प्रतिक्रियेत वरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपली राजकीय प्रतिमा मलीन करण्यासाठी हे षडयंत्र असल्याचे स्पष्टीकरण सुर्वे यांनी दिले आहे.हे सर्व आरोप खोटे असून आरोप करणाऱ्यांच्या विरोधात मी अब्रू नुकसानीचा खटला भरणार असल्याचेही त्यांनी सांगितले. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून, सर्व आरोपांना तेथेच प्रत्युत्तर देत सत्य समोर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

खरे खोटे काय ते बाहेर येईलच मात्र राज कोरडे यांच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे हे नक्की.

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?