‘ ह्या ‘ कारणावरून मी केला प्रतीक्षाचा खून : आरोपी राहुल भड काय म्हणतो ?

By | November 26, 2017

rahul bhad tells police that i love her so i killed her

१० ऑक्टोबर २०१३ रोजी मी आणि प्रतिक्षाने पुरोहितांच्या साक्षीने आपण परस्परांच्या गळ्यात लग्नाची माळ घातली.आम्ही अधिकृतरीत्या विवाहबद्ध झालो आहोत मात्र तरीही प्रतीक्षा ऐकायला व माझ्यासोबत राहायला तयार नव्हती.माझे तिच्यावर खूप प्रेम होते. पण ती माझ्यासोबत राहण्यास सतत नकार देत असल्याने मी हेलावलो, विमनस्क झालो, तडपलो, त्याच प्रेमासाठी तीही तडपावी, यासाठी तिला केवळ ‘जखम ’द्यायची होती, तिला मारण्याचा माझा उद्देश मुळीच नव्हता, अशी कबुली आरोपी राहुल भड याने राजापेठ (अमरावती ) पोलिसांना दिली. प्रतीक्षा मेहेत्रे ह्या युवतीला रस्त्यात गाठून सपासप वार करून तिचा खून केल्याचा आरोप राहुल भड ह्या युवकावर आहे. आरोपी राहुलला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने 23 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

अमरावतीमधील ह्या घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले होते. दरम्यात राहुल याने प्रतिक्षाशी विवाह केला होता मात्र ती नांदायला येत नव्हती असे राहुलचे म्हणणे आहे. शेवटी त्याने गाठून तिच्यावर (23 नोव्हेंबरला ) चाकूने वार केले व यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रतीक्षा मृत्युमुखी पडल्यावर राहुल तिथून पळून गेला व दुचाकी घेऊन दारव्हा इथे गेला. दरम्यान पोलीस मोबाईलवर त्याचे लोकेशन ट्रेस करत होते. मोबाइल लोकेशनच्या आधारे त्याला गुरुवारी उशिरा रात्री मूर्तिजापुरातून ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने विष घेतलेले होते. जिल्हा सामान्य रुग्णालायात उपचारार्थ दाखल केल्यानंतर त्याला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले.न्यायालयाने त्याला पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. आत्महत्येसाठी राहुलने मूर्तिजापूरमधील ज्या दुकानातील कीटकनाशक खरेदी केले त्या दुकानमालकाची देखील साक्ष महत्वाची ठरणार आहे.

मी प्रतीक्षाशी प्रेमविवाह केला असून तिचेदेखील माझ्यावर जीवापाड प्रेम होते. मात्र, तिची आई व मामाच्या भूलथापांना ती बळी पडली व तिने लग्नानंतरही नांदण्यास नकार दिला असे राहुल भड चे म्हणणे आहे. दुसरीकडे, राहुलकडची प्रमाणपत्रे खोटी आहेत असे प्रतिक्षाच्या वडिलांचे म्हणणे आहे. यापूर्वी देखील, प्रतीक्षाने ऑक्‍टोबर महिन्यात फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात राहुलविरुद्ध तक्रार करून त्याने सोशल मीडियावर आपले फोटो अपलोड करून राहुल माझी बदनामी करत असल्याचे म्हटले होते. या प्रकरणात राहुलविरुद्ध आय. टी. ॲक्‍टनुसार गुन्हासुद्धा दाखल झाला होता, मात्र ठोस काही कारवाई न झाल्याने ह्यात नाहक प्रतिक्षाचा बळी गेला.

लग्नाच्या वादातून भरदिवसा तरुणीवर केले सपासप वार : तरुणीचा जागीच मृत्यू

तू मला का फसवलेस असा व्हाटसऍप संदेश टाकून तिने जीवन संपले : प्रेमप्रकरणातून केली आत्महत्या

विवाहबाह्य संबंधास अडथळा ठरणाऱ्या बायकोचा पाचव्या मजल्यावरून ढकलून खून

प्रेमप्रकरणातून तरूणाचा आत्याच्या मुलीवर ब्लेडने हल्ला

महिलांकडे एक खाजगी मालमत्ता म्हणून बघण्याची पुरुषसत्ताक मानसिकता जोवर संपत नाही तोवर असे दुर्दैवी हल्ले कमी होणार नाहीत. महिला ह्या सुद्धा माणूस आहेत ही भावना अशा विकृत लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.

? सहमत असाल तर लाईक करा शेअर करा ?