सरकारमधून बाहेर पडण्याच्या इशाऱ्यांच्या शतक पूर्तीसाठी उद्धव ठाकरेंना ‘ यांच्या ‘ शुभेच्छा

By | December 11, 2017

arjun-khotkars-assembly-membership-canceled-by-high-court

ओखी वादळामुळे जेवढे नुकसान झाले नाही तेवढे नुकसान युती सरकारच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात झाले आहे. तसेच या सरकारचे दोन लाभार्थी आहेत एक म्हणजे भाजप आणि दुसरे उद्धव ठाकरे अशा शब्दात राधाकृष्ण विखे यांनी सरकारला खडे बोल सुनावले आहेत. नागपूर येथे ते बोलत होते . आजपासून राज्य सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. सरकारमधून बाहेर पडण्याच्या इशाऱ्यांचे शतक पूर्ण करण्यासाठी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देतो असा टोमणा देखील या प्रसंगी राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेनेला लगावला.

वाशीम येथील शेतकरी ज्ञानेश्वर मिसाळ यांनी विषप्राशन करुन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी ज्ञानेश्वर मिसाळ यांनी राज्य कृषीमंत्री सदाभाऊ खोत आणि सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोलेंची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेष्टा समजून त्याकडे दुर्लक्ष केले गेले. आणि शेवटी त्यांनी आत्महत्या केली.आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती त्यात त्यांनी पुढील मजकूर लिहिला होता , ‘आम्हाला मेट्रो नको आहे, आम्हाला जगण्याचा मार्ग पाहिजे, मेट्रो मार्गानं पोट भरत नाही. कर्जमाफी म्हणजे नुसती मलमपट्टी वाटते. राज्यातला कष्टकरीच संपला तर डिजिटल भारताची भाषा योग्य वाटते काय?, आम्हाला चीन-पाकिस्तानची भीती वाटत नाही, कष्टकरी मरतोय त्याचीच जास्त भीती वाटते. मला या विचारामध्ये जगणे कठीण वाटतंय’

ह्या दुर्दैवी प्रकाराबद्दल बोलताना देखील विखे पाटील म्हणाले, सरकारमधील मंत्र्यांना भेटूनही त्यांच्यावर त्याचा विश्वास बसला नाही. तीन वर्षांच्या कारकिर्दीत १० हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. ज्या ४१ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याचा दावा राज्य सरकारने केला त्यांची नावे राज्य सरकारच्या वेबसाईटवर तातडीने प्रसिद्ध करावीत म्हणजे खरे काय आहे ते समोर येईलच

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या या संयुक्त पत्रकार परिषदेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीदेखील सरकारवर जोरदार हल्लाबोल केले.ते म्हणाले, विदर्भातला एकही शेतकरी समाधानी नाही, राज्यातल्या शेतकऱ्यांचीही अवस्था काही वेगळी नाही. या सरकारची प्रत्येक योजना ऑनलाइन आहे कारण या सरकारचा माहिती तंत्रज्ञान विभाग हाच भ्रष्टाचाराचा अड्डा झाला आहे. एवढेच नाही तर जसा गुजरातमध्ये विकास वेडा झाला आहे तशी महाराष्ट्रात पारदर्शकता वेडी झाली आहे.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील युती सरकारच्या काळात राज्य दिवाळखोरीच्या दिशेने चालले असलायची टीका केली.

मराठी अस्मितेचे ढोंगी राखणदार ‘ दशक्रिया ‘ चित्रपटाबाबतीत गप्प का ? विखे पाटलांचा सवाल

दानवेंच्या XXX वर गोळी मारण्याची वेळ आली आहे : धनंजय मुंडेचे वादग्रस्त विधान

जिभेला हाड नसणाऱ्या अशाच काही भाजपपासून ते काँग्रेसपर्यंतच्या नेत्यांची ‘ वादग्रस्त ‘ विधाने

अबकी बार इव्हेन्ट सरकार..अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ? :लेखाजोखा

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?