अखेर पुरोहित संघाने कायदा हातात घेत औरंगाबादच्या प्रोझोन मॉल मधील ‘ दशक्रिया ‘ चा शो थांबवला

By | November 17, 2017

purohit mahasangh oppose dashkriya movie in aurangabad prozone mall

राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेल्या दशक्रिया ह्या चित्रपटाला ब्राह्मण महासंघाकडून कडाडून विरोध होत आहे .मात्र संभाजी ब्रिगेड ह्या चित्रपटाचा शो झाला पाहिजे यासाठी आग्रही आहे.अर्थात ह्या चित्रपटातून धार्मिक विधीच्या नावाखाली इतर हिंदू समाजाची कशी ससेहोलपट होते हे दाखवण्यात आलेले आहे .

ब्राह्मण आणि हिंदू परंपरांचा अपमान केल्याचे सांगत ब्राह्मण महासंघ आणि पैठणमधील पुरोहितांनी या चित्रपटाला दर्शवला होता. ब्राह्मण सोडून अजून कोणत्याही हिंदू समाजच्या वतीने ह्या चित्रपटाला कोणताही विरोध करण्यात आलेला नाही, हे विशेष , मात्र हा चित्रपट समस्त हिंदू विरोधी असल्याची पद्धतशीर ओरड सुरु करण्यात आली आहे .

ह्या चित्रपटावर बंदी घालण्याची याचिका कोर्टात दाखल करण्यात आली होती, मात्र चित्रपटाच्या बाबतीत एका दिवसात निर्णय देणे शक्य नसल्याचे सांगत न्यायालयाने हस्तक्षेप करणे टाळल्यानंतर चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला. सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्याचा अधिकार कोणालाही नाही. त्यामुळे ‘दशक्रिया’ प्रदर्शित होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही, असे देखील कोर्टाने म्हटलं मात्र एका दिवसात निर्णय हवा असेल तर सुप्रीम कोर्टात जाण्याचा सल्ला देखील देण्यात आला. दिग्दर्शकाला आपले मत मांडण्याचा अधिकार असल्याचेदेखील कोर्टाने म्हटले. साहित्यिक बाबा भांड यांनी १९९४ मध्ये लिहिलेल्या ‘दशक्रिया’ या कादंबरीवर आधारित या चित्रपटाची निर्मिती कल्पना विलास कोठारी यांनी केली असून, पटकथा, संवाद आणि गीते संजय पाटील यांनी लिहिली आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन देखील संदीप पाटील यांनी केले आहे.

पैठण येथील पुरोहित समीर शुक्ल, सोहम पोहेकर, समीर धर्माधिकारी तसेच संतोष छडीदार, गोवर्धन छडीदार यांनी ही याचिका सादर केली होती. पुरोहित संघाच्या मते , दशक्रिया’ चित्रपटातील अनेक संवाद, उल्लेख हे मानहानिकारक, भावना दुखावणारे व संदर्भहीन असल्याने ते वगळावेत आणि चित्रपट प्रदर्शनाला बंदी आणावी. जे पुरोहित दशक्रिया विधी करतात त्यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली आहे .धार्मिक स्वातंत्र्य आणि व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य हे मूलभूत अधिकार आहेत. गरुडपुराण, निर्णयसंहिता, धर्मसिंधू, अंत्येष्टी संस्कार आदी ग्रंथांमध्ये याबाबत लिहिलेले आहे. हे थोतांड नसून, हिंदू संस्कृती आणि परंपरेने चालत आलेला महत्त्वाचा विधी आहे. धार्मिक भावनेने लोक हा विधी करण्यासाठी येतात, पुरोहितवर्ग त्यांच्याकडे जात नाही. या विधीला लूट असे चित्रपटात म्हटले गेले आहे, धार्मिक विधी हे उपजीविकेचे साधन आहे आणि यात आक्षेप घेण्यासारखे काही नाही.

पुरोहित संघाचे म्हणणे खरे मानले तर, सरसकट हिंदू धर्मावर जर टीका केली असेल तर हिंदू धर्मातल्या इतर जातीतील लोकांनी याला अद्याप विरोध का केला नाही ? जन्माला येताना जितके विधी होत नाहीत, त्यापेक्षा जास्त विधी मृत्यूनंतरच्या 13 दिवसात करुन घेतले जातात. त्यावर ब्राह्मण महासंघाकडून ‘ब्र’ ही काढलं जात नाही. विधीच्या नावावर हे इतकी लूट करतात की, त्या गरीब ब्राह्मणाचं कुटुंबच कर्जबाजारी होतं. त्याला सोडवण्यासाठी कोणी येत नाही. केवळ सर्व येऊन सांत्वन करुन, चांगलं दहा दिवस खाऊन जातात. अन् या दुकानदारीवर सिनेमातून भाष्य केलं तर त्याला विरोध का व्हावा? हे विचित्रच म्हणावं लागेल. अशा शब्दात एबीपी माझाचे प्रतिनिधी , प्रसन्न जोशी यांनीदेखील ताशेरे ओढले आहेत.

दरम्यान शुक्रवारी औरंगाबाद येथील प्रोझोन मॉलच्या चित्रपटगृहात ‘दशक्रिया’चा पहिला शो प्रदर्शित करण्यात आला. मात्र, चित्रपटाला विरोध करत पुरोहितांकडून शो बंद पाडण्यात आला. मात्र, यावेळी संभाजी ब्रिगेडने चित्रपटाच्या प्रदर्शनाला संरक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला. यावेळी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद झाले. संभाजी ब्रिगेडने आम्ही संरक्षण देऊ मात्र शो चालू ठेवा असा आग्रह केला परंतु धोका न पत्करता शो बंद करण्यात आला.

अर्थात,असे शो बंद पडून समाज प्रबोधन थांबणार नाही. आज लोक युट्युब वापरतात ,फेसबुक वापरतात .सर्वच धर्माचे ज्ञान हे फक्त मूठभर लोकांकडे आहे अशी परिस्थिती नाही. त्यामुळे हा विरोध क्षणिकच आहे. कोर्टाकडून फटकारल्यानंतर देखील कायदा हातात घेऊन जो धिंगाना घातला गेला तो निषेधार्ह आहे.

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?