अखेर अडीच वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून खून करणारा नराधम सापडला :पोलिसांचे मोठे यश

By | October 24, 2017

pune police finds out rapist of kid in dhayari

अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याप्रकरणी एकजणाला पोलिसांनी अटक केली आहे. वडगाव धायरीमध्ये घडलेल्या ह्या घटनेने पूर्ण पुणे हादरून गेले होते .अडीच वर्षाची मुलगी घरात वडिलांसोबत झोपलेली असताना आरोपीनं तिला घरात घूसून उचलून नेलं. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिचा गळा दाबून खून केला.

पुणे पोलीस गेले ३ दिवसांपासून ह्या नराधम आरोपीचा शोध घेत होते. अखेर आरोपीला काल रात्री अटक करण्यात आली. आरोपीचं नाव आकाश पारधी ( वयं २८ वर्षे) असे असून, तो रंगकामाचा व्यवसाय करतो. तो मानसिकदृष्ट्या विकृत असल्याचे समजते. हा नराधम ही चिमुकली राहात होती त्याच इमारतीत राहत होता.आणि ह्या मुलीवर पाळत ठेवून होता. आरोपी ओळखीतलाच असल्याचा पोलिसांचा संशय अखेर खरा ठरला.

विजय शिवनगे व त्यांच्या पत्नी विद्या शिवणगे हे कुटुंब मूळचे लातूर येथील असून ते रोजगारासाठी पुण्यात आले होते . विजय शिवनगे हे धायरी येथे भाजीपाल्याचा व्यवसाय करतात. लगडमळा येथे एका इमारतीच्या तळमजल्यावर ते भाड्याने राहत होते . पुण्यात येऊन त्यांना फक्त दोन महिने झाले होते. श्रुती ही त्यांची अडीच वर्षाची मुलगी होती. भाऊबीजेच्या सुट्टी असल्याने ते सर्व घरीच होते. त्या दिवशी त्यांच्या पत्नीचे मामा त्यांच्याकडे आले होते .त्यांनी शनिवारी रात्री सोबतच जेवण केले. रात्री नऊ च्या सुमारास श्रुती झोपली आणि सगळे कुटुंब रात्री ११ च्या सुमारास झोपी गेले. पावणेबाराच्या सुमारास विद्या यांना जाग आली असता , त्यांना श्रुती आढळून आली नाही म्हणून त्यांनी पतीला विचारले तर त्यांनी ती इथेच झोपली होती, असे सांगितले.

आई वडील आणि मामा तिघांनी मिळून श्रुतीचा शोध चालू केला, मात्र बराच वेळ त्यांना श्रुती न सापडल्याने त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी देखील घरच्या जवळपास शोध घेतला मात्र ती आढळून आली नाही . रविवारी सकाळी ६ च्या सुमारास नागरिकांना घरापासून काही अंतरावर श्रुतीचा मृतदेह आढळला. तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड झाले होते . मात्र पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली व आरोपीस जेरबंद केले.

महिलांच्या केवळ तोकडे कपडे घालण्याने बलात्कार होतात , अशी पोपटपंची जर खरी मानली तर अशा कित्येक नवजात अर्भकांवर किंवा लहान लहान मुलींवर देखील अत्याचार झाल्याचे उघड झाले आहे . पुरुषप्रधान समाजाच्या मनातली, स्त्री ही एक उपभोगाची वस्तू आहे ही मानसिकता जोवर जात नाही तोपर्यंत आपल्या देशात कोणत्याच महिला व अल्पवयीन मुलीदेखील सुरक्षीत नाही असेच म्हणावे लागेल.ह्या घटनेनंतर मात्र आपल्या आजू बाजूला अशा काही विकृत प्रवृत्ती राहत आहे का ? या बद्दल देखील पालकांनी सजग राहण्याची गरज आहे .

?पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?

--Ads--

Leave a Reply