पुण्यातला पंक्चर स्कॅम अशी करतो आपली फसवणूक

By | October 12, 2017

मोठे मोठे घोटाळे आपल्या भारतीय लोकांना काही नवीन नाहीत . कॉमन वेल्थ गेम असो वा २ जी घोटाळा . अर्थात हे घोटाळे मोठ्या मोठ्या लोकांचे असतात त्यामुळे त्याला प्रसिद्धी तेवढी मिळते . मात्र सर्वसामान्यांची लूट करणारा एक घोटाळा स्कॅम पुण्यामध्ये चालू आहे . ह्या स्कॅम मधून गोर गरीब सुद्धा सुटत नाहीत . तुमची गाडी कर्जाची असून हप्ते थकलेले असले तरी तुम्हाला यांचे पैसे मात्र द्यावेच लागतात . श्री. सोमनाथ यांच्या अनुभवावरून ही पोस्ट लिहली आहे . पंक्चरवाल्यांकडून होणाऱ्या लुटीचं हे प्रतिनिधिक उदाहरण आहे. यासंदर्भात सोशल मीडियात शोध घेतला असता पुणे परिसरात अनेक ठिकाणी असे प्रकार सर्रासपणे सुरु असल्याचं निदर्शनास येतं.

आपल्याकडे दुचाकी असो वा चारचाकी, बहुतेक वेळा टायर पंक्चर झाल्यानंतर कधी एकापेक्षा जास्त पंक्चर्स आढळून येतात. तर काही वेळा ट्यूब बदलण्याशिवाय पर्यायच उरत नाही. आणि अशा प्रत्येक वेळी आपल्या मनात शंकेची पाल जरूर चुकचुकते, पण आपण करू काहीच शकत नाही.कारण पुढे जायची घाई आपल्याला असते . महत्वाचं म्हणजे या पंक्चरच्या धंद्याचं रेकॉर्ड म्हणून असं काहीच उपलब्ध नसतं. आणि आपली अडवणूक होऊ नये म्हणून आपण विश्वास ठेवून किंवा ना इलाजाने पैसे देतो .

पण आता याचाच फायदा येऊन पुण्यामध्ये एक नवीन स्कॅम सुरु झालाय तो म्हणजे पंक्चर स्कॅम . हा अशा पद्धतीने चालतो ,तुम्ही तुमची कार किंवा दुचाकी घेऊन घेऊन चालला आहेत , पाठीमागून दोन जण येतात . गाडीत हवा कमी आहे बहुतेक पंक्चर असेल असे सांगतात . तुम्ही थांबता , ते दोघे पण थांबतात. हवा कमीच असते मग तुम्ही त्यांना पंक्चर चे दुकान विचारले कि ते दुकानाचा पत्ता देतात . तुम्ही दुकानावर गेले , कि गाडीची ट्यूब काढून आत जाऊन चेक करता करता आणखी पंक्चर केले जातात . आणि तब्बल १० -१५ असे पंचर करून तब्बल १०००-२००० रुपये उकळले जातात . एकदा ट्यूब फिट झाली कि आपण परत बघत नाही , त्याचाच फायदा घेऊन हा स्कॅम सुरु झाला आहे . कदाचित तुमच्या गाडीची हवा सोडणारे देखील तेच असू शकतात, ज्यांनी तुम्हाला गाडिची हवा कमी असल्याचे सांगितले होते .

असा अनुभव सोमनाथ यांना सिंहगड रस्त्यावर आला होता . त्यांच्याकडून तब्बल ३५०० रुपये उकळवून ३५ पंचर असल्याचे त्यांना सांगितले होते . त्यांनी पैसे दिले पण पुढे जाऊन पोलिसात तक्रार दिली मात्र ते येईपर्यंत पंचर वाला फरार झाला होता .

असाच अनुभव पुण्यामध्ये जरी नाही आला तरी कोणत्याही शहरात येऊ शकतो म्हणून आपण सावध राहण्याची गरज आहे .

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?

--Ads--

Leave a Reply