अवघ्या दीड तासात केली ६ जणांची लोखंडी रॉडने हत्या : ‘असा ‘ आला पोलिसांच्या जाळ्यात

By | January 2, 2018

psyco killer arrested in harayana after killing 6 persons

रमण राघव चित्रपटामध्ये सायको किलर दाखवला होता . त्याला लोकांच्या हत्या करण्याचे व्यसन होते . तो त्यासाठी लोखंडी रॉड चा वापर करायचा. अशीच काहीशी सत्य घटना हरियाणा यामध्ये घडली आहे. मंगळवारी पहाटे २:३० ते ४ वाजेपर्यंत ह्या नराधमाने तब्बल ६ जणांना मारून टाकले. विशेष म्हणजे हा सैन्यातील निवृत्त जवान असून त्याच्याकडून असे कृत्य घडल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तो निवृत्त सैनिक असल्याचे ट्रिब्यून ने म्हटले आहे.

नरेश डांखड असे या आरोपीचे नाव असून तो सैन्यातील निवृत्त जवान असल्याचे समजते . ही घटना हरिणामधील पलवल शहरातील असून ह्या सगळ्या घटना मंगळवारी पहाटे झाल्या आहेत . पहाटे २:३० ते ४ ह्या दरम्यान एका लोखंडी रॉड ने याने ह्या हत्या केल्या. पोलीस त्याला पकडण्यासाठी गेले असता त्याने पोलिसांवर देखील हल्ला केला मात्र पोलिसांनी त्याला जेरबंद केले. ह्या झटापटीत त्याला देखील दुखापत झाली असून त्याला दवाखान्यात भरती करण्यात आले आहेत. इथून डिस्चार्ज मिळाला कि त्याच्यावर कायदेशीर पद्धतीने कारवाई करण्यात येईल. मात्र ह्या सायको किलर मुळे परिसरात काही वेळातच प्रचंड भीतीचे वातावरण तयार झाले होते .

आश्चर्य म्हणजे , पोलीस ठाण्यापासून १०० मीटर अंतरावर असलेल्या परिसरातच सायको किलरने ह्या सहा जणांची हत्या केल्या आहेत. यात रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका महिलेचा समावेश आहे.तो रुग्णालयामध्ये कसा पोहचला याचा तपास चालू आहे. लागोपाठ होत असलेल्या ह्या हत्येमुळे पोलीस देखील चक्रावून गेले होते. पोलिसांनी शहरातील सीसीटीव्ही तपासायला सुरु केले आणि त्यात एक माणूस हातात लोखंडी रॉड घेऊन फिरताना आढळला. त्याच्या आधारे आणि तपास सुरु केला व त्याला धरण्यात आले. ह्या झटापटीत काही पोलीस तसेच तो देखील जखमी झाला. त्याचे वय ४५ असून तो मानसिक रुग्ण असल्याचे समजते . याआधी देखील त्याने पोलिसांवर हल्ला केला होता. नरेश हा मूळचा फरिदाबाद जिल्ह्यातील रहिवासी असून गेल्या काही महिन्यांपासून तो पलवल येथे राहत होता.नरेश हा सैन्यातील निवृत्त जवान असल्याचे वृत्त ‘ट्रिब्यून’ या वृत्तपत्राने दिले आहे.

सायको किलरच्या ह्या हत्येची बातमी सोशल मीडियावर मोठ्या वेगाने पसरली, त्यामुळे बऱ्याच जणांनी घरी बसणेच पसंत केले. नरेश का खरोखरच मनोरुग्ण आहे का ? आणि ह्या सर्व हत्या त्यानेच केल्या आहेत का ? याची देखील चौकशी सुरु आहे. तूर्तास नरेशला अटक केल्यानंतर तरी परत खून झाल्याची बातमी आलेली नसल्याने लोकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.

मुजोर रिक्षावाल्याची भलत्या ठिकाणी दादागिरी आली अंगलट : अक्षरश: ठेचून मारले

एकाच घरातील सासू व सुनेवर करत होता भोंदूबाबा अत्याचार :असा झाला पर्दाफाश

अखेर तिने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याला संपवले : पुणे जिल्ह्यातील घटना

प्रेमप्रकरणातून तरूणाचा आत्याच्या मुलीवर ब्लेडने हल्ला

सेल्फी स्टीकच्या मदतीने शेजाऱ्याचे खाजगी क्षण रेकॉर्ड करून करत होता ब्लैकमेल : महाराष्ट्रातील घटना

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?