इंटरनेटवर धमाल उडवून देणारी ही पोरगी आहे तरी कोण ? : पूर्ण माहिती

By | February 12, 2018

priya prakash varrier video goes viral on valentine day information

सोशल मीडियावर कधी कोण प्रसिद्ध होईल काही सांगता येत नाही. फोटोमध्ये आपल्या वेगवेगळ्या अदा दाखवत घायाळ करणाऱ्या त्या तरुणीचे नाव आहे प्रिया प्रकाश वारियनर.. गेल्या काही दिवसांपासून मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियनरने सोशल मीडियावर अगदी धमाल उडवून दिली आहे . दोन दिवसांपूर्वी ही तरुणी कोण असे विचारले असते तर कोणालाही सांगता आले नसते मात्र अवघ्या दोन दिवसात प्रियाचे नाव प्रत्येकाला माहित झाले आहे . प्रिया आपल्या डोळ्यांच्या हावभावांमधून आपले प्रेम सांगताना दिसत आहे .

‘व्हॅलेंटाइन डे’ च्या निमिताने प्रियाचा एक व्हिडिओ व्यायरल होत आहे . हा व्हिडिओ ‘उरू अदार लव्ह’ या आगामी सिनेमातील ‘Manikya Malaraya Poovi’ गाण्यातील आहे. ‘व्हॅलेंटाइन डे’ला काही दिवसच उरले असताना या दिनानिमित्त हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘उरू अदार लव्ह’ हा प्रियाचा पहिलाच सिनेमा आहे. येत्या ३ मार्चला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.त्याच सिनेमातील ‘Manikya Malaraya Poovi’ हे गाणे सोशल मीडियावर सध्या गाजते आहे .

प्रिया प्रकाश वारियनर ही मूळची केरळची असून सध्या त्रिशूर येथे राहायला आहे . ती उत्तम नर्तिका असून तिला फिरण्याची आवड आहे . सध्या ती वाणिज्य शाखेच्या पहिल्या वर्षाला आहे.प्रियाचा हा पहिलाच सिनेमा आहे. या सिनेमात तिने एका शाळकरी मुलीची व्यक्तिरेखा साकारली आहे. सिनेमात शाळेतील पहिल्या वहिल्या प्रेमाची कथा सांगण्यात आली आहे. प्रियाचा हा व्हिडिओ थोड्याच वेळात इतका व्हायरल झाला की तो टॉप ट्रेंडिंगमध्येही आला आणि नंतर फुल्ल धमाल केली . व्हॅलेंटाइन डे’ आणि टिन इज लव्ह अशा स्वरूपाचा हा व्हिडिओ आहे , त्यामुळे तो व्हायरल होण्यास वेळ लागला नाही. एका रात्रीत स्टार होणं काय असतं हे आज प्रिया अनुभवत असेल यात काही शंका नाही.व्हॅलेंटाइन डे , हे गाणे आणि प्रियाचा लूक ही सगळीच भट्टी छान जमून आली आहे त्यामुळे हे गाणे झटपट व्यायरल झाले.

अर्थात प्रियाचे हे गाणे चित्रपटाला कितपत तारून नेईल हे देखील पहावे लागेल.

मॅडम बिकिनीवाला फोटो शेअर करा :निर्लज्ज आरटीओ अधिकाऱ्याचा अभिनेत्रीला सल्ला

माझ्यासाठी सेक्सी होण्याचा अर्थ सेक्सी दिसणं नाहीये तर.. : ‘ ह्या ‘ अभिनेत्रींचे धक्कादायक विधान

पैशासाठी अंगप्रदर्शन करतेस; जवानाने बघितले तर सभ्यता दाखवितेस : लष्करी जवानाचा विद्या बालनवर हल्लाबोल

शासकीय कार्यालयात महिलांसमोर अश्शील चाळे करणारा समाजकल्याण विभागातील वरिष्ठ लिपिक धरला

‘ म्हणून ‘ सनी लिओनी आपल्या पतीला प्रत्येक कार्यक्रमात सोबत घेऊन जाते

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा