ठाकरे चित्रपटाबद्दल नवीन वाद तयार होतोय : ‘ ही ‘ आहेत वादाची कारणे

By | December 24, 2017

pravin tarade questions shivsena over english name in movie poster

कायम मराठी मुद्दा हा हक्काने आपलाच आहे अशी भाषा वापरणाऱ्या शिवसेनेसाठी आता ‘ठाकरे ‘ ह्या चित्रपटाबद्दल एक नवीन वाद सुरु होतो आहे. अर्थात सध्या हा वाद पोस्टर पुरताच असून ‘ ठाकरे ‘ चित्रपटाचे पोस्टर इंग्रजी भाषेत का ? अशा अशा शब्दात ह्या पोस्टरला मराठी अभिनेते-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. त्यांनी आपलाही नाराजी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित असा ठाकरे नावाचा हिंदी सिनेमा येत असून त्याच लेखन संजय राऊत यांनी केले आहे. तर मनसेचे अभिजीत पानसे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी अक्षय कुमार व इरफान खान यांच्या देखील नावाचा विचार झाला होता मात्र अखेर ही भूमिका नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या वाट्याला आली. नुकताच ह्या चित्रपटाचा ट्रेलर देखील रिलीज करण्यात आला, मात्र यामध्ये देखील ठाकरे नाव इंग्रजीमध्येच पाहायला मिळाले.

महानायक अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत ‘ठाकरे’ चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली. त्यावेळी चित्रपटाचा टीझर व पोस्टरही प्रसिद्ध करण्यात आलं. ते पाहून अनेकांच्या मनात चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे , मात्र मराठीचा कैवार हाच मुद्दा धरणाऱ्यांच्या डोळ्यात मराठी अभिनेते-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी अंजन घातले आहे असे म्हटल्यास नवल ठरणार नाही.

आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये तरडे म्हणतात , ‘माझ्या ‘देऊळ बंद’ या चित्रपटाचं पोस्टर मी इंग्रजीत केलं म्हणून शिवसेनेच्या काही मान्यवर नेत्यांनी मला फोन करून पोस्टर मराठीत करायला सांगितलं. मी त्यांचं ऐकलंही होतं. आता ‘ठाकरे’ चित्रपटाच्या पोस्टरचं शिवसेना काय करणार,’ असा प्रश्न प्रविण तरडे यांनी शिवसेनेला विचारला आहे .

अर्थात शिवसेनेची ही दुटप्पी भूमिका आणखी एका गोष्टीने नेटिझन्सला देखील जाणवते आहे . यापूर्वी उत्तर प्रदेश इथे होणाऱ्या रामलीला मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी याला भूमिका वठवण्यास देखील शिवसेनेने जोरदार विरोध केला होता .नवाजुद्दीनला रस असताना देखील काढून शिवसेनेच्या विरोधामुळे टाकण्यात आले होते. मात्र आता त्याच नवाजुद्दीन सिद्दीकीला बाळासाहेबांच्या रोल साठी का फायनल केले ? असे प्रश्न लोक आता विचारत आहेत

तर दुसऱ्या बाजूने कट्टर मराठी असलेल्या बाळासाहेबांच्या रोल साठी कोणी मराठी कलाकार मिळाला नाही का ? अशी देखील सार्वत्रिक टीका शिवसेनेवर होते आहे. मराठी नाट्यसृष्टी ही हिंदीपेक्षा जास्त समृद्ध असून कित्येक दिग्गज असे मराठी कलाकार असताना ही भूमिका एका हिंदी कलाकाराला का दिली ? मराठी अस्मितेचं ढोंग अजून किती दिवस करणार असा देखील प्रश्न लोक आता शिवसेनेला विचारत आहेत.

गुजरातच्या निकालावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘ जळजळीत ‘ प्रतिक्रिया

रमेशभाऊंची गोल्डमॅन स्टाईल कॉपी करणाऱ्या शिवसेनेच्या गुजरातच्या उमेदवाराचे काय झाले ?

मोदींची जादू कायम : गुजरातमध्ये भाजपच तर हिमाचल प्रदेश मध्ये काँग्रेस सत्ता गमावणार

मी चहा विकला पण ………. : मोदी काँग्रेसवर भडकले

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?