जिग्नेशचे बालिश राजकारण..असे किती आले किती गेले : प्रकाश आंबेडकर

By | January 11, 2018

prakash ambedkar makes controversy on democracy in india

दिल्लीमधील जिग्नेशची हुंकार रॅली फ्लॉप झाल्यावर प्रकाश आंबेडकर यांनी देखील जिग्नेश मेवाणीवर तोंडसुख घेतले आहे. दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रॅलीसाठी प्रशासनाने तब्बल १५०० पेक्षा जास्त पोलीस तैनात केले होते मात्र उपस्थित राहणाऱ्या लोकांमध्ये या रॅलीबद्दल उत्साह नव्हता . देशभरातून ह्या हुंकार रॅली साठी फक्त २०० ते ३०० ची उपस्थिती होती. त्यापॆक्षा जास्त पत्रकार आणि पोलिसांची वर्दळ होती. जिग्नेशची ही रॅली सुपरफ्लॉप झाल्याची मीडियामध्ये चर्चा आहे, अशा पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांचे हे वक्तव्य अनेक जणांना आश्चर्यकारक वाटल्यास नवल नाही .

बीबीसी मराठी साठी केलेल्या फेसबुक लाईव्ह मध्ये ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, ” जिग्नेश यांचं राजकारण अजून बालिश आहे. त्यामुळे हवेत जाणं त्याच्यासाठी योग्य नाही. ही सगळी अजून उतावीळ मंडळी आहेत. त्यांचे हेतू चांगले आहेत. त्यांनी त्यांच्याबरोबर काही विचारवंत ठेवले पाहिजेत. जे काही त्यांनी दिल्लीत सांगितलं मनुस्मृती आणि राज्यघटनेबद्दल, हा बालिशपणा आहे असं मी मानतो. या बालिशपणाचे परिणाम तात्पुरते असतात, ते चिरंतन नसतात. त्यामुळे या मंडळींनी चिरंतन राजकारण केलं पाहिजे. त्यापेक्षा उत्तर प्रदेशमध्ये आत्ता जे घडतंय, त्यातून एक परिपक्व लीडरशीप तयार होईल असं मला दिसतंय,”

  • जिग्नेशला सोबत घ्याल का ? काय म्हणाले प्रकाश आंबेडकर

एक लक्षात घ्या की मी प्रस्थापित आहे. माझ्याकडून प्रस्थापित ते होऊ शकतात. इथं अनेक जण येऊन गेले आणि अनेक जण आहेत. मी चाळीस वर्षं या राजकारणात आहे. आहे तिथेच आहे. ज्यावेळेस मला पाहिजे असतं तेव्हा मी उभा राहतो, ज्यावेळेस मला शांत रहायचं असतं तेव्हा मी शांत राहतो. ही जी त्यांची भाषा आहे, त्याच भाषेमुळं ते अनेकांना दुखावतात. मला त्यानं काही फरक पडत नाही. पण मी मोठा नेता आणि मी तुम्हाला एकत्र करतो, असं म्हटलं की मग उरलेले सगळे म्हणतात की कोण टिकोजीराव तू? त्यामुळंच म्हटलं की हे उतावळं नेतृत्व आहे, पब्लिसिटीचं नेतृत्व आहे, ग्रॅबिंगचं नेतृत्व आहे. हे फार काळ टिकत नाही. मी त्याच्याशी बोलतो आहे, सांगतो आहे की, तू या भेगा बुजव (ग्राऊटिंग कर). ज्या मतदारसंघातून तो निवडून आलाय तो मतदारसंघ त्याचा नाही. प्रसिद्धीनं निवडून आणलं आहे त्याला.माझ्यासारखे 3000 कार्यकर्ते सहा महिने गुजरातमध्ये काम करत होते. निवडून आलेली टर्म ही पाच वर्षांची असते. पाच वर्षांनंतरचं काय याचा विचार कर असं मी त्याला म्हटलं.

प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत लपवलेली ‘ ही ‘ गोष्ट तुमच्या लक्षात आली का ?

लेख नक्की वाचा : निखिल वागळे यांच्या मुलाखतीमधून कसा खोटारडेपणा आणि लपवाछपवी

तर लोकशाही न मानणाऱ्यांना सोबत घ्यायला तयार : प्रकाश आंबेडकर

  • प्रकाश आंबेडकर जिग्नेशवर नाराज आहेत का ?

मी त्याच्यावर नाराज नाही. आम्ही देशात तरुणांची नवी फळी तयार करतो आहोत. जिग्नेश त्यातलाच एक आहे. पण तो सध्या माध्यमांच्या तालावर नाचतो आहे. त्यामुळे आम्ही ही अशी कानउघाडणी करत राहणार .

  • झिरो जिग्नेशला आम्ही निवडून आणलं

गुजरातच्या निवडणुकीत जिग्नेश मेवाणी झिरो होता. त्याला आम्ही जिंकून आणलं. माझ्यासारखे 3000 कार्यकर्ते सहा महिने गुजरातमध्ये काम करत होते. त्यात केवळ दलित कार्यकर्ते नव्हते आणि ना भाजपा वा संघ विरोधक होते. ज्यांना मोदींची कार्यशैली पसंत नाही असे लोक काम करत होते. सौराष्ट्रात त्यांचा गड होता, म्हणून तिथे भाजपला कमी करायचं होतं आणि ते झालंही. माझी अपेक्षा आहे की, हे तरुण नेते आहेत, त्यांनी हवेत उडू नयेत. म्हणून आम्ही त्यांच्याशी बोलून त्यांना जमिनीवर ठेवायचा प्रयत्न करतो आहोत. यशस्वी झालो तर तो भविष्यात नेता होऊ शकतो, जर तसं नाही झालं तर तो इतरांसारखा हवेत उडून जाईल.

रामदास आठवले यांनी जिग्नेशची पाठराखण केली होती. मात्र प्रकाश आंबेडकर यांनी जिग्नेश वर तोंडसुख घेणे हे काहीसे बुचकळ्यात टाकणारे आहे . यावेळी देखील प्रकाश आंबेडकर यांनी हिंदू ,अनियंत्रित,हाफिज सईद असे शब्द वापरले मात्र ज्या फेसबुक पोस्टच्या आधारे त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती त्या व्यक्तीच्या पक्षाचे नाव एकदाही घेतले नाही . त्या पक्षाची प्रकाश आंबेडकर पाठराखण का करत आहेत ? असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडल्यावाचून राहणार नाही .

आरोप कशाच्या आधारे ? प्रकाश आंबेडकर यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा

लेख नक्की वाचा : जिग्नेश मेवाणी उमर खालेद आताच डोके का वर काढताहेत ?

शिवरायांच्या महाराष्ट्रावर वाकडी नजर ठेवणाऱ्या जिग्नेश मेवानीला त्यांच्याच भाषेत उत्तर

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा