.. तर हिंदूंच्या घरात देखील हाफिज सईद जन्माला येईल: प्रकाश आंबेडकर

By | January 6, 2018

prakash ambedkar says hafiz saeed will be born in hindu house

भीमा कोरेगावमधील हिंसाचारामागे हिंदुत्त्ववादी संघटना असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला होता.कोरेगाव भीमामधील घटनेसाठी त्यांनी संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांना जबाबदार ठरवले होते. ह्या प्रकारामागे दोषींना कोठवर शिक्षा झाली नाही तर हिंदूंच्या देखील घरात हाफिज सईद जन्माला येईल असे त्यांनी म्हटले आहे . भोपाळमध्ये त्यांनी हे वक्तव्य केले आहे. महात्मा फुले परिषदेतर्फे आयोजित भाजपच्या विरोधातील लाठी रॅलीसाठी ते उपस्थित होते. रॅली झाल्यानंतर त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे

सदर कार्यक्रमासाठी समाजवादी नेते शरद यादव हे देखील उपस्थित होते. त्यांनी देखील सरकारवर सडकून टीका केली. देशातील मागासवर्गीय, दलित बांधव आणि आदिवासींनी सरकारविरोधात एकत्र आले पाहिजे असेही आवाहन यावेळी मंचावरून करण्यात आले.शरद यादव यांनी ह्या वेळी सरकारवर देखील सडकून टीका केली , ते म्हणाले , ७ कोटी युवकांना रोजगार देण्याचे सरकारकडून सांगण्यात आले होते मात्र कोणाला रोजगार मिळाला नाही. सरकारने प्रेमाला लव्ह जिहादचे नाव दिले आहे. काळ्या धनावर बोलणारे आजपर्यंत काळे धन आणू शकले नाही . हे सरकार खोटे व लोकांमध्ये भ्रम पसरवत आहे . भाजप गाय व मुस्लिमांच्या नावाने राजकारण करीत आहे . पेशव्यांना ज्यांनी हरवले यांच्यासारखे आपल्या बहादूर बनायचे आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी देखील भाषणात कोरेगाव भीमा प्रकरणी सरकार दोषींना सोडून पिडीतांवर कारवाई करत असल्याचा आरोप केला. ही कारवाई संघाच्या इशाऱ्यावर होत आहे असेही ते म्हणाले. महाराष्ट्र सरकारला भीमा कोरेगावच्या दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. ही मागणी जर मान्य झाली नाही तर हिंदूंच्या घरातही हाफिज सईद जन्माला येतील हे विसरू नका. हे सरकार जर परत सत्तेत आले तर कदाचित बोलण्याचा अधिकार देखील काढून घेईल त्यामुळे मागास समजल्या जाणाऱ्या जातीच्या बांधवांनी सरकारविरोधात एकत्र यायला हवे असेही आवाहन यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केले.

गुजरातमध्ये जर काँग्रेसने आदिवसी बांधवांपर्यंत त्यांचा अजेंडा पोहचवला असता तर भाजपच्या हातून काँग्रेसने सत्ता हिसकावून घेतली असती. मात्र तसे झाले नाही तसेच भीमा कोरेगावमध्येही २०० वर्षांपूर्वी महारांच्या सैन्याने पेशव्यांची दाणादाण उडवली होती कारण पेशवे स्पृश्य-अस्पृश्य असा भेद मानत होते. ज्या महार बांधवांनी लढाई केली ते हिंदू नव्हते का? असाही प्रश्न आंबेडकरांनी उपस्थित केला.

शिवरायांच्या महाराष्ट्रावर वाकडी नजर ठेवणाऱ्या जिग्नेश मेवानीला त्यांच्याच भाषेत उत्तर

लेख नक्की वाचा : जिग्नेश मेवाणी उमर खालेद आताच डोके का वर काढताहेत ?

अखेर मुख्यमंत्र्यांनी कोरेगाव भीमा प्रकरणावर नाव न घेता केला ‘ ह्यांचे ‘ कडे इशारा

२०० वर्षांपूर्वी कोरेगाव भीमाला झाले काय होते ? : वाद का तयार झाला

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा